iPhone 17 सीरीज लाँचपूर्वीच घसरली iPhone 16 Pro ची किंमत, खरेदीवर मिळणार आतापर्यंतच सर्वात मोठं डिस्काऊंट! मिस करू नका ही Deal
जगातील मोठ्या टेक कंपन्यांपैकी एक असलेल्या अॅपलने घोषणा केली आहे की, उद्या म्हणजेच 9 सप्टेंबर रोजी त्यांची नवीन आयफोन सिरीज लाँच केली जाणार आहे. कंपनी उद्या आयफोन 17 सिरीज लाँच करणार आहे. मात्र ही सिरीज लाँच होण्यापूर्वीच आता ग्राहकांना आयफोन 16 सिरीजमधील एक मॉडेल कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. नव्या सिरीजच्या लाँचिंगपूर्वी आता iPhone 16 Pro वर जबरदस्त डिल उपलब्ध आहे. ज्यामुळे ग्राहकांना हा आयफोन कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. तुम्ही जर नवीन आयफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही डिल तुमच्यासाठी बेस्ट ठरू शकते. कारण प्रिमियम रेंजमधील आयफोन तुम्हाला आगदी कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.
Free Fire Max: डायमंड्स-गोल्ड कोइनसह या गेमिंग वस्तू मिळणार मोफत, हे आहेत 8 सप्टेंबरचे Redeem Codes
विजय सेल्समध्ये सध्या अॅपलच्या प्रिमियम स्मार्टफोनवर धमाकेदार ऑफर्स उपलब्ध आहेत. त्यामुळे ग्राहकांना हा प्रिमियम स्मार्टफोन अगदी कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. विजय सेल्समध्ये iPhone 16 Pro या प्रिमियम स्मार्टफोनवर 21,700 रुपयांचे बंपर डिस्काउंट दिले जात आहे. त्यामुळे जर तुम्ही तुमचा जुना आयफोन अपग्रेड करण्याचा विचार करत असाल किंवा अँड्रॉईडवरून आयफोनवर स्विच करण्याचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे. विजय सेल्स तुम्हाला iPhone 16 Pro खरेदी करण्याची संधी देत आहे. चला तर मग या ऑफर्सबद्दल जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)
कंपनीने हा प्रिमियम आयफोन भारतात 1,19,900 रुपयांच्या किंमतीत लाँच केला होता. मात्र आता ग्राहकांना हा आयफोन कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळत आहे. ग्राहक विजय सेल्समध्ये हा आयफोन 1,05,690 रुपयांच्या किंमतीत खरेदी करू शकतात. म्हणजेच या डिव्हाईसच्या खरेदीवर प्लॅट 14,210 रुपयांचे डिस्काऊंट दिले जात आहे. त्यामुळे हि जबरदस्त डील मानली जात आहे. एवढेच नाही तर HSBC बँक क्रेडिट कार्ड EMI व्यवहारासह फोनवर 7,500 रुपयांची अतिरिक्त सूट देखील दिली जात आहे.
iPhone 16 Pro च्या फीचर्सबद्दल बोलायचं झालं तर या डिव्हाईसमध्ये 6.3-इंच LTPO OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. यासोबतच फोनमध्ये 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट देण्यात आला आहे. डिव्हाईसमध्ये 2000 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस देखील दिली आहे. फोनमध्ये HDR10 आणि डॉल्बी विजन सपोर्ट देखील दिला आहे. या फोनमध्ये पावरफुल Apple चा A18 Pro चिपसेट देखील आहे.
फोटोग्राफीसाठी हा बेस्ट आयफोन आहे. यामध्ये मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. डिव्हाईसमध्ये 48MP चा प्रायमरी कॅमेरा आहे, तसेच 12MP चा पेरिस्कोप टेलीफोटो कॅमेरा देण्यात आला आहे. या डिव्हाईसमध्ये 48MP चा अल्ट्रा वाइड लेंस देखील देण्यात आला आहे. तसेच सेल्फी लवर्ससाठी या फोनमध्ये 12MP फ्रंट कॅमेरा आहे.
आयफोन 17 सिरीज कधी लाँच होणार आहे?
9 सप्टेंबर 2025
Apple च्या आगामी ईव्हेंटचे नाव काय आहे?
Awe Dropping
iPhone 16 Pro ची किंमत किती आहे?
1,19,900 रुपये