ब्लूटूथ हेडफोनमुळे वाढतोय कॅन्सरचा धोका? टेक फ्रेंडली युजर्समध्ये निर्माण झालाय गोंधळ! काय आहे सत्य?
ब्लूटूथ हेडफोन आणि वायरलेस हेडफोन आज आपल्या जीवनाचा एक महत्त्वपूर्ण भाग बनला आहे. ज्याप्रमाणे आपण स्मार्टफोनशिवाय एक दिवसही राहू शकत नाही, त्याचप्रमाणे सध्याच्या काळात ब्लूटूथ हेडफोन आणि वायरलेस हेडफोनशिवाय राहणं देखील कठीण झालं आहे. मात्र आता हेडफोन्स युजर्समध्ये सध्या एक गोंधळ निर्माण झाला आहे.
एप्पल एअरपोर्ट, Bose, Beats आणि bone कंडक्शन हेडफोन (Shokz) यांबाबत सध्या एक प्रश्न सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे आणि हा प्रश्न म्हणजे या हेडफोनचा वापर करून कॅन्सर होतो का? ही शंका निर्माण होण्याचं कारण म्हणजे या डिवाइसमधून रेडिओ फ्रिक्वेन्सी रेडिएशन निर्माण होतात. या रेडिएशनमुळे मेंदूच्या पेशींना नुकसान होऊन कर्करोग होऊ शकतो. ही शंका अनेकांनी व्यक्त केली आहे. मात्र अद्याप वैज्ञानिकांना याबाबत कोणताही ठोस पुरावा सापडलेला नाही. (फोटो सौजन्य – Pinterest)
2015 मध्ये करण्यात आलेल्या संशोधनातून असे दिसून आले आहे की, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन म्हणजेच मोबाईल, वाय फाय, मोबाईल टॉवर किंवा वायरलेस बेबी मॉनिटर्सच्या दीर्घकाळ संपर्कत राहिल्यास अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात. ज्यामध्ये मेंदूतील ट्युमर, वंध्यत्व आणि इतर आरोग्य समस्यांचा समावेश आहे. या अभ्यासानंतर जगभरातील 200 गुण अधिक शास्त्रज्ञांनी WHO आणि UN ला EMR वर कठोर नियम लागू करण्याचे आव्हान केले आहे. 2019 मध्ये एअरपोड्स आणि इतर वायरलेस हेडसेटची लोकप्रियता वाढली आणि त्यामुळेच नवा वाद निर्माण झाला. या वाढत्या लोकप्रियतेमुळे युजर्सचं मनोरंजन तर होत आहे. मात्र यामुळे युजर्सच्या आरोग्यावर देखील परिणाम होत आहे का, याबाबत वाद निर्माण झाला आहे.
रेडिएशनचे मुख्य दोन प्रकार आहेत. ज्यामध्ये आयोनायझिंग रेडिएशन, जसे की एक्सरे गॅमा किरण इत्यादी आणि दुसरा प्रकार म्हणजे नॉन अयनिकरण रेडिशन, जसे की रेडिओ मायक्रोवेव्ह ब्लूटूथ. यामध्ये डीएनएला थेट नुकसान पोहोचवण्यासाठी पुरेशी ऊर्जा नसते. तर आयोनायझिंग रेडिएशनमुळे पेशींच्या डीएनए संरचनेचे नुकसान होऊ शकते.
ब्लूटूथ डिवाइसद्वारे निर्माण होणारा RFR खूप कमी असतो राष्ट्रीय कर्करोग संस्थेच्या मते, या लहरी डीएनएला नुकसान पोहोचवण्यासाठी तितक्या शक्तिशाली नसतात. 2019 च्या अभ्यासात असे दिसून आले आहे की ब्लूटूथ रेडिएशन एक्स सगळे सारख्या उच्च ऊर्जा नवीनपेक्षा लाखोपट कमकुवत असतात. अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि युरोपमध्ये मोबाईल फोन किंवा ब्लूटूथ डिवाइसद्वारे मेंदूच्या कर्करोगाच्या प्रमाणात वाढ झालेली नाही.
ब्लूटूथ डिवाइसद्वारे कर्करोगाचा धोका नाही यावर अनेक संस्थांचे सहमत झालेले नसले, तरी देखील युजर्स काळजी घेणे गरजेचे आहे. ब्लूटूथ उपकरणांमुळे कर्करोगाचा धोका नाही यावर सीडीसी, एफडीए आणि एफसीसी सहमत नसले तरी, इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर (IARC) अजूनही RFR ला कदाचित कर्करोगज म्हणून रेट करते.