WhatsApp OTP Scam: OTP साठी तुमच्याही व्हॉट्सअॅपवर मॅसेज आलाय? थांबा, तुमची एक चूक आणि रिकामं होईल बँक अकाऊंट
आपलं WhatsApp अकाऊंट सुरक्षित राहावं आणि कोणीही हॅक करू नये, यासाठी WhatsApp वर व्हेरिफिकेशनची एक सुविधा आहे. जेव्हा आपण कुठेही आपलं WhatsApp अकाऊंट लॉगिन करण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळी WhatsApp एक व्हेरिफिकेशन कोड पाठवला जातो. ज्या नंबरवरून आपण आपलं WhatsApp अकाऊंट सुरु केलं आहे केवळ त्याच नंबरवर हा WhatsApp व्हेरिफिकेशन कोड पाठवला जातो.
MWC 2025: Lenovo ची अनोखी संकल्पना! विजेची कटकट सोडा, आता सूर्यप्रकाशाने चार्ज होणार नवीन लॅपटॉप
जेव्हाही आपल्याला WhatsApp अकाऊंट दुसऱ्या डिव्हाईसमध्ये लॉगिन करायचं असतं, तेव्हा आपल्याला व्हेरिफिकेशन कोडची मागणी करावी लागते. पण जर तुम्हाला कोणत्याही विनंतीशिवाय WhatsApp व्हेरिफिकेशन कोड मिळाला असेल तर सावधगिरी बाळगा. कारण ही सायबर फसवणूक असू शकते ज्यामध्ये स्कॅमर तुमचे WhatsApp अकाउंट हॅक करण्याचा आणि तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधील लोकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करत आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest)
स्कॅमर्सनी सुरु केलेल्या या नवीन पद्धतीमध्ये, व्हेरिफिकेशन कोडमध्ये फेरफार करून कोणत्याही WhatsApp युजरचं अकाउंट हॅक केले जातं, अलीकडेच अनेक लोकं या पद्धतीने स्कॅमर्सच्या जाळ्यात अडकले आहेत. तर चला जाणून घेऊया की स्कॅमर ही फसवणूक कशी करतात आणि आपण ते कसे टाळू शकतो.
स्कॅमर तुमचा फोन नंबर WhatsApp मध्ये एंटर करतो आणि एक व्हेरिफिकेशन कोड जनरेट करतो, जो तुमच्या फोनवर एसएमएसद्वारे येतो. यानंतर स्कॅमर्स बनावट मित्र किंवा नातेवाईक म्हणून WhatsApp युजरला संपर्क साधतात. स्कॅमर तुमच्या ओळखीचा कोणीतरी असल्याचा दावा करणारा संदेश पाठवतात आणि अतिशय चालाखीने WhatsApp च्या व्हेरिफिकेशन कोडची मागणी करतात. स्कॅमर्सनी पाठवलेल्या मॅसेजमध्ये असा दावा केला जातो की, कोड चुकून तुमच्या नंबरवर आला आहे आणि तो कोड पुन्हा शेअर करण्याची विनंती केली जाते.
नए @WhatsApp OTP स्कैम से सावधान! कोई जानने वाला बनकर #OTP मांगे तो रुकें, सोचें और एक्शन लें! सहायता के लिए WhatsApp India Grievance Channel पर जाएँ। साइबर अपराध की शिकायत करने के लिए 📞1930 या https://t.co/pVyjABu4od पर जाएँ। अपने दोस्तों को टैग करें और जागरूकता बढ़ाएं! pic.twitter.com/QqLHqXBY1x
— CyberDost I4C (@Cyberdost) February 28, 2025
जर तुम्ही व्हेरिफिकेशन कोड शेअर केला तर स्कॅमर तुमचे अकाऊंट हॅक करतो आणि तुम्हाला लॉक करतो.
हॅकर्स तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांकडून पैसे मागतात किंवा संवेदनशील माहिती चोरतात. ते तुमच्या WhatsApp चॅटमधून महत्त्वाची माहिती काढू शकतात, ज्यामुळे आणखी नुकसान होऊ शकते. ते अशाच प्रकारे तुमच्या नावावर इतरांना अडकवण्याचा प्रयत्न करतात.
कधीही व्हेरिफिकेशन कोड शेअर करू नका: WhatsApp किंवा इतर कोणालाही व्हेरिफिकेशन कोड मागण्याचा अधिकार नाही.
टू स्टेप व्हेरिफिकेशन सक्षम करा: हे तुमच्या खात्याला अतिरिक्त पिन संरक्षण प्रदान करेल. WhatsApp सेटिंग्ज > खाते > टू स्टेप व्हेरिफिकेशन येथे जाऊन ते सक्षम करा.
अनपेक्षित संदेशांबद्दल सावधगिरी बाळगा: जर एखादा मित्र किंवा नातेवाईक पैसे किंवा कोड मागत असेल तर प्रथम त्यांना कॉल करून खात्री करा.
संशयास्पद नंबर किंवा मेसेजेसची तक्रार करा: WhatsApp मधील कोणत्याही अज्ञात किंवा संशयास्पद नंबरची तक्रार करा आणि त्यांना ब्लॉक करा.
जर तुम्ही या हॅकिंगचे बळी पडला असाल, तर ताबडतोब support@whatsapp.com वर WhatsApp सपोर्टला ईमेल करा आणि आर्थिक फसवणूक झाली असेल तर तक्रार दाखल करा.