Google ने जारी केली वॉर्निंग! तुमच्या ब्राउझरमधील 'हे' 16 एक्सटेंशन ताबडतोब करा डिलीट, नाहीतर होईल मोठं नुकसान
तुम्ही देखील तुमची कामं सोपी करण्यासाठी तुमच्या ब्राउझरमध्ये एक्सटेंशन इन्स्टॉल केलं आहे का? तर ही बातमी नक्की वाचा. कारण टेक जायंट गुगलने काही धोकादायक एक्सटेंशन्स बद्दल वॉर्निंग जारी केली आहे. यामध्ये एकूण 16 एक्सटेंशन्सचा समावेश आहे. कंपनीने शेअर केलेल्या लिस्टमधील कोणतंही एक्सटेंशन तुम्ही तुमच्या ब्राउझरमध्ये इंस्टॉल केलं असेल तर ते ताबडतोब डिलीट करा. अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं, तसेच ब्राउझरमधील तुमचा वैयक्तिक डेटा देखील धोक्यात येण्याची शक्यता आहे.
लाँच डेट कन्फर्म! या दिवशी लाँच होणार Samsung चा सर्वात पातळ स्मार्टफोन, ‘हे’ असू शकतात खास फीचर्स
बरेच लोकं त्यांचं काम सोपं करण्यासाठी ब्राउझरमध्ये एक्सटेंशन इन्स्टॉल करतात. काही एक्सटेंशन खूप उपयुक्त असतात आणि ते फक्त एका क्लिकवर युजर्सची काम करू शकतात. जर तुम्ही एक्सटेंशनशिवाय तेच काम पूर्ण करण्याचा विचार केला तर तुम्हाला त्यासाठी बराच वेळ लागू शकतो. तुमच्या अनेक कामांंमध्ये तुम्हाला मदत करणारे एक्सटेंशन कधीकधी तुमच्यासाठी धोकादायक देखील ठरू शकतात. आता असाच एक प्रकार समोर आला आहे, ज्याबाबत गुगलने क्रोम युजर्सना इशारा दिला आहे. कंपनीने 16 एक्सटेंशनची यादी जारी केली आहे आणि युजर्सना ते त्वरित डिलीट करण्यास सांगितले आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
गुगलने म्हटले आहे की, स्क्रीन कॅप्चर, अॅड ब्लॉकिंग आणि इमोजी कीबोर्ड सारखी साधने असलेले हे एक्सटेंशन ब्राउझरमध्ये धोकादायक स्क्रिप्ट्स इंजेक्ट करू शकतात, ज्यामुळे डेटा चोरीचा तसेच सर्च-इंजिन फसवणुकीचा धोका निर्माण होतो. खरं तर, गिटलॅब थ्रेट इंटेलिजेंसने त्यांच्या एका अहवालात म्हटले होते की हे एक्सटेंशन जगभरातील 32 लाख लोक वापरत आहेत आणि कोणीतरी ते हायजॅक केले आहेत. ज्यामुळे आता हॅकर्स अगदी सहजपणे युजर्सचा डेटा चोरी करू शकतात आणि इतर अनेक फसवणूक देखील करू शकतात. त्यामुळे आता गुगलने एक इशारा जारी केला आहे.
गुगलने प्रभावित एक्सटेंशनची यादी जाहीर केली आहे. यामध्ये ब्लिपशॉट, इमोजी (इमोजी कीबोर्ड), यूट्यूबसाठी कलर चेंजर, यूट्यूब आणि ऑडिओ एन्हान्सरसाठी व्हिडिओ इफेक्ट्स, क्रोम आणि यूट्यूबसाठी थीम्स, पिक्चर इन पिक्चर, माइक अॅडब्लॉक फॉर क्रोम, सुपर डार्क मोड, क्रोमसाठी इमोजी, कीबोर्ड इमोजी, क्रोमसाठी अॅडब्लॉकर (नोअॅड्स), अॅडब्लॉक फॉर यू, क्रोमसाठी अॅडब्लॉक, निंबल कॅप्चर, केप्रॉक्सी, पेज रिफ्रेश, विस्टिया व्हिडिओ डाउनलोडर आणि वॅटूलकिट यांचा समावेश आहे.
ज्या युजर्सच्या ब्राउझरमध्ये हे एक्सटेंशन आहेत त्यांनी ते ताबडतोब डिलीट करावेत आणि अँटीव्हायरस सॉफ्टवेअरने त्यांची सिस्टम स्कॅन करावी, असे गुगलने म्हटले आहे. हे क्रोम वेब स्टोअरमधून काढून टाकण्यात आले आहेत, परंतु युजर्सना ते ब्राउझरमधून मॅन्युअली हटवावे लागतील. त्यामुळे आताच तुमच्या ब्राऊझरमधील हे एक्सटेंशन डिलीट करा, ज्यामुळे तुमचा डेटा सुरक्षित राहण्यासाठी मदत होणार आहे.