
PHOTO GENERATE AI
नवीन वस्तू घरात आणल्याने सुख-समृद्धी येते, अशी भारतीय संस्कृतीत मोठी श्रद्धा आहे.आकर्षक ऑफर्स आणि डिस्काउंट्स: या काळात इलेक्ट्रॉनिक्स ब्रँड्स आणि विक्रेते मोठ्या सवलती कॅशबॅक, आणि ‘बाय वन गेट वन’ सारख्या ऑफर्स देतात. नो-कॉस्ट ईएमआय महागड्या वस्तू जसे की स्मार्ट टीव्ही किंवा फ्रिज खरेदी करण्यासाठी सुलभ हप्त्यांची सोय उपलब्ध असते.नोकरदार वर्गाला या काळात दिवाळी बोनस किंवा सणांचे भत्ते मिळतात, ज्यामुळे बजेट उपलब्ध होते.
यात अनेक नागरिकांनी खरेदीसाठी आधीच बुकिंग करून ठेवलेली असते. इलेक्ट्रिकल वस्तू दसऱ्याच्या दिवशी घरी घेऊन जाण्यासाठी मोठी गर्दी असते. तसेच इलेक्ट्रिकल मार्केटमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. गेल्या काही महिन्यांत इलेक्ट्रिकल वस्तूंच्या दरात सुमारे 7 ते 8 टक्के वाढ झाली असून दसऱ्याच्या मुहूर्तावर वस्तू खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल वाढला आहे.
येत्या काळात अजून दर वाढणार असल्याने खरेदीसाठी अधिक रक्कम मोजावी लागणार आहेत.यामुळे नागरिक आधीच खरेदी करून दसऱ्याच्या मुहूर्तावर घरात नवीन वस्तू आणण्यासाठी कुटुंबांकडून प्राधान्य दिले जाते.त्यामुळे घरातील जुनी उपकरणे बदलून नवीन खरेदीला प्राधान्य दिले जात आहे. कॉपर आणि प्लास्टिकच्या दरात वाढ झाल्याने इलेक्ट्रिकल वस्तूच्या दरात 8 ते 10 टक्क्यांनी वाढ झाल्याने घरगुती वस्तू महागल्या आहेत. मात्र दसऱ्याच्या मुहूर्तावर नागरिकांचा नवीन वस्तू खरेदीकडे कल वाढला आहे. याला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
इलेक्ट्रॉनिक्स बाजारात ग्राहकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत असून, नागरिक नवीन वस्तू खरेदीला प्राधान्य देत आहेत.आकर्षक डिस्काउंट्स, नो-कॉस्ट ईएमआय आणि कॅशबॅक ऑफर्समुळे स्मार्ट टीव्ही, रेफ्रिजरेटर, 5 जी स्मार्टफोन्स आणि वॉशिंग मशीनला सर्वाधिक मागणी आहे.
Google चा मोठा निर्णय! शेतकऱ्यांपासून शिक्षकांपर्यंत… कंपनीने केली AI उपक्रमांची घोषणा