ई कॉमर्स कंपन्यांची उडाली झोप! डिलिव्हरी बॉय नाही तर आता Amazon चा रोबोट ठोठावणार तुमचा दरवाजा, कंपनी करतेय मोठं प्लॅनिंग
विचार करा की तुम्ही ई कॉमर्स कंपनी अॅमेझॉनवरून एखादं सामान ऑर्डर केलं आणि तुमच्या या सामानाची डिलीव्हरी घेऊन कोणता डिलिव्हरी बॉय नाही रोबोट आला तर? अॅमेझॉन सध्या ह्यूमनॉइड रोबोट्सची चाचणी करत आहे. हे रोबोट्स आता सामानाची डिलीव्हरी करण्यासाठी मदत करणार आहेत. यापूर्वी अशी माहिती समोर आली होती की, अॅमेझॉनद्वारे सामानाची डिलीव्हरी सुरु करणार आहे. त्यानंतर आता अशी अपडेट समोर आली आहे की, अॅमेझॉन रोबोट्सच्या मदतीने डिलीव्हरी करणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
ड्रोन आणि रोबोट्स या दोन्हींच्या मदतीने जलद डिलीव्हरी केली जाणार असल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. या दोन्ही सेवांची सध्या चाचणी सुरु आहे. या रोबोट्सना पावर मिळावी, यासाठी कंपनी एक खास सॉफ्टवेयर तयार करत आहे. यासाठी लागणाऱ्या फिजिकल मशीन्स इतर कंपन्यांकडून पुरवल्या जाणार आहेत. असं देखील सांगितलं जात आहे की, या रोबोट्सची चाचणी सॅन फ्रान्सिस्कोमधील अॅमेझॉनच्या एका कार्यालयात ‘ह्युमनॉइड पार्क’ नावाच्या एका खास ठिकाणी इनडोअर कोर्समध्ये केली जाईल. रोबोट्स सामानाची डिलीव्हरी करण्यासाठी खरच मदत करू शकतात का, हे डिलिव्हरी बॉयपेक्षा कितीपट जलद कामं करू शकतात, याची चाचणी केली जाणार आहे.
अॅमेझॉनने अद्याप याबाबत कोणतंही अधिकृत वक्तव्य जारी केलं नाही. मात्र कंपनीने घेतलेला हा निर्णय इतर ई कॉमर्स कंपन्यांची झोप उडवणार आहे, यात काही शंकाच नाही. आपल्या ग्राहकांना अधिक चांगला अनुभव मिळावा आणि लवकरात लवकर सामानाची डिलिव्हरी करता यावी, यासाठी आता अॅमेझॉन आर्टिफिशियल इंटेलिजेंसचा वापर करणार आहे. स्मार्ट वेयरहाउस रोबोटपासून AI डिलीवरी सिस्टमपर्यंत, Amazon ई-कॉमर्स स्पेसमध्ये इतर कंपन्यांपेक्षा पुढे राहण्यासाठी टेक्नोलॉजीचा मोठ्या प्रमाणात वापर करत आहे.
कंपनीने सामानाची डिलीव्हरी करण्याबाबतीत मोठी प्रगती केली आहे. 2005 मध्ये कंपनीने प्राईम लाँच केले. त्यानंतर Two-Day शिपिंगची सुरुवात झाली. यानंतर 2019 मध्ये वन डे डिलिव्हरी सुरु करण्यात आली. मात्र आता AI च्या मदतीने सेम डे डिलीव्हरी करण्यासाठी कंपनीचे प्रयत्न सुरु झाले आहेत. गेल्या काही वर्षात सामानाची डिलिव्हरी लवकरात लवकर व्हावी, यासाठी कंपनी सतत प्रयत्न करत आहे. यामुळे अॅमेझॉनची ग्राहक संख्या देखील सतत वाढत आहे.
अमेझॉनचे वाहतूक तंत्रज्ञान आणि सेवांचे उपाध्यक्ष स्टीव्ह आर्माटो यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, अमेरिकेतील टॉप 60 शहरांमध्ये 60 टक्के प्राइम ऑर्डर त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी डिलीव्हर केल्या जातात. कंपनीने सुरु केलेली ही सर्विस ग्राहकांसाठी फायद्याची ठरते.