Realme च्या नव्या स्मार्टफोनची मार्केटमध्ये धमाकेदार एंट्री, AI कॅमेरा आणि बाकी फीचर्सही कमाल! किंमत 10 हजारांहून कमी
Realme ने त्यांचा नवीन आणि बजेट स्मार्टफोन लाँच केला आहे. हा स्मार्टफोन Realme C71 या नावाने लाँच करण्यात आला आहे. या नवीन स्मार्टफोनमध्ये अनेक कमाल फीचर्स देण्यात आले आहेत. शिवाय स्मार्टफोनची किंमत देखील बजेट रेंजमध्ये आहे. या स्मार्टफोनची किंमत 10 हजारांहून कमी आहे. त्यामुळे तुम्हाला नवीन स्मार्टफोन खरेदी करायचा असेल आणि तुमचं बजेट कमी असेल तर हा स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट ठरणार आहे.
या स्मार्टफोनमध्ये 45W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 6,300mAh बॅटरी दिली जाणार आहे. ज्यामुळे दिर्घकाळ स्मार्टफोनचा वापर केला जाऊ शकतो. फोनमध्ये Unisoc T7250 चिपसेटचा वापर करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन दोन रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. स्मार्टफोनची किंमत आणि इतर स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – X)
Realme C71 स्मार्टफोन 4GB रॅम + 128GB स्टोरेज आणि 6GB रॅम + 128GB स्टोरेज अशा दोन व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनच्या 4GB रॅम + 128GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत BDT 14,999 म्हणजेच सुमारे 10,000 रुपये आहे. तर या स्मार्टफोनच्या 6GB रॅम + 128GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत BDT 15,999 म्हणजेच सुमारे 12,000 रुपये आहे. हा स्मार्टफोन कंपनीने बांग्लादेश आणि वियतनामसह निवडक ग्लोबल मार्केटमध्ये लाँच केला आहे. हा स्मार्टफोन ब्लॅक नाइट आउल आणि स्वान व्हाइट कलर ऑप्शनमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे.
Realme C71 डिव्हाईसमध्ये 6.67-इंच HD+ (720×1,604 पिक्सेल) डिस्प्ले देण्यात आला आहे. यासोबतच डिव्हाईस डुअल सिम सपोर्टसह Android 15-बेस्ड Realme UI सह लाँच करण्यात आला आहे. स्मार्टफोनची किंमत कमी असली तरी देखील फीचर्सच्या बाबतीत कोणतीही तडजोड करण्यात आलेली नाही. या स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट, 240Hz पर्यंत टच सँपलिंग रेट आणि 725 निट्स ब्राइटनेस देण्यात आली आहे.
Realme C71 स्मार्टफोनमध्ये ऑक्टा-कोर Unisoc T7250 चिपसेट आहे, जो 6GB पर्यंत रॅम आणि 128GB स्टोरेजसह येतो. Realme च्या या फोनमध्ये खास डायनामिक RAM फीचर देखील देण्यात आलं आहे. ज्यामुळे रॅम 18GB पर्यंत वाढवली जाऊ शकते.
डायमंड खर्च न करता मिळणार इमोट आणि लूट क्रेट, हे आहेत आजचे Free Fire Max Codes! आत्ताच करा Redeem
Realme C71 मध्ये 50-मेगापिक्सलचा AI वाला कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉल्ससाठी फ्रंटला 5-मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आल आहे. हा फोन स्मार्ट टच फीचर देखील ऑफर करतो. कंपनीचा दावा आहे की हे डिव्हाईस 1.5 मीटरवरून खाली पडल्यानंतर देखील सुरक्षित राहते. या डिव्हाईसने मिलिट्री स्टँडर्ड शॉकप्रूफ टेस्ट उत्तीर्ण केली आहे.
या फोनमध्ये 45W फास्ट चार्जिंग सपोर्टस 6,300mAh बॅटरी देण्यात आली आहे. जी एका चार्जवर 9 तासांचा गेमिंग टाइम देऊ शकते.