एकनाथ शिंदे - कुणाल कामराची भेट, मोदी विकतायत ऊसाचा रस.... मजेदार AI व्हिडीओ इंटरनेटवर घालतायत धुमाकूळ, तुम्ही पाहिलेत का?
AI ने संपूर्ण जगाला वेड लावलं आहे. सोशल मीडिया आणि इंटरनेटवर तर AI ने प्रचंड धुमाकूळ घातला आहे. AI च्या मदतीने बनवल्या जाणाऱ्य Ghibli ईमेज आणि व्हिडीओंचा ट्रेंड अजूनही सुरु आहे. Ghibli ट्रेंड सोशल मीडियावर सुरु असतानाच आता आणखी काही व्हिडीओ देखील सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. या व्हिडीओ सामान्य व्यक्तिंच्या नाहीत राजकीय नेते आणि सेलिब्रिटीच्या आहेत. आता आम्ही तुम्हाला editedbyazim नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आलेल्या काही व्हिडीओंबद्दल सांगणार आहोत.
या इंस्टाग्राम अकाऊंटवर AI च्या मदतीने तयार करण्यात आलेले काही मजेदार व्हिडीओ शेअर करण्यात आले आहेत. यातील एक व्हिडीओ पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आहे. तर दुसरा व्हिडीओ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कुणाल कामरा यांचा आहे. इतरही काही व्हिडीओ आहेत, जे अतिशय मजेदार आहेत. या सर्व व्हिडीओंना प्रंचड व्ह्युज मिळाले आहेत आणि लोकांनी या व्हिडीओंवर अतिशय मजेदार प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. चला तर मग आता सर्व व्हिडीओंबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Instagram)
पहिला व्हिडीओ आपल्या सर्वांच्या लाडक्या क्रिकेटर्सचा आहे. या व्हिडीओमध्ये क्रिएटर्स त्यांचे आवडते खाद्यपदार्थ खाताना दिसत आहेत. सर्वात पहिला विराट कोहलीला व्हिडीओमध्ये दाखवण्यात आलं आहे. विराट व्हिडीओमध्ये छोले भटूरे खाताना दिसत आहे. तर रोहित शर्मा व्हिडीओमध्ये वडापाव खाताना दिसत आहे. महेंद्रसिंग धोनी व्हिडीओमध्ये बटर चिकन खाताना दिसत आहे. युजवेंद्र चहल व्हिडीओमध्ये त्याच्या मैत्रिणीसोबत पाणीपुरी खात असल्याचं दिसत आहे.
ईमेजवर क्लिक करताच रिकामं होणार बँक अकाऊंट! WhatsApp वर सुरु झालाय नवा Scam, अशी करा तुमची सुरक्षा
व्हायरल झालेला दुसरा व्हिडीओ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कुणाल कामरा यांचा आहे. गेल्या काहि दिवसांपासून कुणाल कामरा आणि शिंदे गटात वाद सुरु आहेत. कुणाल कामरा याने त्याच्या एका गाण्यातून एकनाथ शिंदे यांचा गद्दार असा उल्लेख केला होता. मात्र आता व्हायरल झालेल्या AI व्हिडीओमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कुणाल कामरा एकत्र आनंदात दिसत आहे. हे दोघेही एकमेकांना मिठाई भरवताना दिसत आहेत. हा व्हिडीओ एका लग्नातील असल्याचं दाखवण्यात आलं आहे.
पुढचा व्हिडीओ भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आहे. या व्हिडीओमध्ये नरेंद्र मोदी ऊसाचा रस विकत असल्याचं दिसत आहे. दुसऱ्या व्हिडीओमध्ये बॉलीवूडच्या अभिनेत्री आसामचा पारंपारिक सण रोंगाली बिहू साजरा करताना दिसत आहे. या सर्व व्हिडीओंवर युजर्सनी मजेदार कमेंट शेअर केल्या आहेत. काहींनी या व्हिडीओंच कौतुक केलं आहे. तर काहींनी म्हटलं आहे की, AI चा चुकीचा वापर केला जात आहे.