ईमेजवर क्लिक करताच रिकामं होणार बँक अकाऊंट! WhatsApp वर सुरु झालाय नवा Scam, अशी करा तुमची सुरक्षा
सध्याच्या या डिजिटल काळात तंत्रज्ञानाने प्रचंड प्रगती केली आहे. अनेक चांगल्या कामासाठी तंत्रज्ञानाचं वापर केला जात आहे. पण चांगल्या कामांसोबतच लोकांना फसवण्यासाठी आणि लोकांकडून पैसे उकळण्यासाठी देखील WhatsApp चा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. स्कॅमर्स तंत्रज्ञनाच्या मदतीने लोकांची फसवणूक करण्यासाठी नवीन मार्ग शोधत असतात. गेल्या काही महिन्यात इतर नवीन स्कॅम सुरू झाले आहेत, की अगदी सहज साध्या भोळ्या लोकांची फसवणूक करून त्यांच्याकडून पैसे उकळले जाते आहेत.
स्कॅमर्स लोकांची फसवणूक करण्यासाठी सहसा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करतात. टेलिग्रामपासून WhatsApp पर्यंत, स्कॅमर अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लोकांना खोटे कॉल आणि मेसेज पाठवून फसवले जात आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म WhatsApp चा वापर करून लोकांची फसवणूक करण्याचा नवीन मार्ग शोधला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म WhatsApp वर सध्या इमेज स्कॅम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या स्कॅममध्ये स्कॅमर्स लोकांना एक इमेज पाठवतात आणि जेव्हा युजर्स या इमेजवर क्लिक करून ती डाउनलोड करतात, तेव्हा युजर्सची सर्व माहिती स्कॅमर्सकडे जाते आणि युजर्सच बँक अकाउंट रिकामं होतं. सध्या अशीच एक घटना समोर आली आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
स्कॅमच्या नावावरूनच कळते की, हा स्कॅम फोटोंशी संबंधित आहे. WhatsApp वर अनोळखी नंबरवरून आलेल्या फोटोवर क्लिक करून लोकांची लाखो रुपयांची फसवणूक होत आहे. स्कॅमर्स कोणत्याही ओटीपीशिवाय लोकांची बँक खाती रिकामी करत आहेत. त्यामुळे इतर स्कॅम आणि घोटाळ्यापेक्षा हा स्कॅम अधिक धोकादायक मानला जात आहे. कारण WhatsApp चा वापर मेसेजिंग आणि कॉलिंगसोबतच फोटो आणि व्हिडिओ शेअर करण्यासाठी देखील केला जातो. याचाच फायदा आता स्कॅमर्स घेत आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये एक नवीन प्रकरण समोर आले आहे. येथे एका व्यक्तीने अनोळखी नंबरवरून WhatsApp वर पाठवलेला फोटो डाउनलोड केला आणि यानंतर काही क्षणातच त्याच्या बँक खात्यातून 2 लाख रुपये कापले गेले. या घोटाळ्यामध्ये WhatsApp किंवा तत्सम मेसेजिंग अॅप्सद्वारे लपलेल्या मालवेअरसह फोटो पाठवणे समाविष्ट आहे. स्कॅमर स्टेगॅनोग्राफी नावाच्या तंत्रज्ञानाचा वापर करून इमेज फाइल्समध्ये कोड लपवतात. जेव्हा युजर्स स्कॅमर्सनी पाठवलेली इमेज डाउनलोड करतो किंवा त्यावर क्लिक करतो आणि ती उघडतो तेव्हा मालवेअर त्यांच्या डिव्हाइसवर इंस्टॉल केला जातो आणि याबद्दल युजर्सना कळत देखील नाही.
मालवेअर फोनमधील बँक लॉगिन तपशील, ओटीपी आणि पासवर्ड यांसारख्या डेटामध्ये प्रवेश करतो. काही प्रकरणांमध्ये, यामुळे स्कॅमरना डिव्हाइस रिमोटली नियंत्रित करण्याची परवानगी मिळू शकते. काही स्कॅमर्स युजर्सने फोटो उघडला आहे याची खात्री करण्यासाठी फोन कॉल्सचा पाठपुरावा करतात.