Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

X द्वारे वाढणार Elon Musk ची कमाई, मास्टर प्लॅन झाला तयार! आता Grok मध्ये उत्तरांसोबतच दिसणार जाहिराती

एक्समधील ग्रोक प्लॅटफॉर्म वापरणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आता युजर्सना ग्रोकमध्ये केवळ उत्तर आणि सल्लेच नाही तर जाहिराती देखील दिसणार आहे. मस्कने हा निर्णय का घेतला, काय कारण आहे, याबाबत आता जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 10, 2025 | 10:41 AM
X द्वारे वाढणार Elon Musk ची कमाई, मास्टर प्लॅन झाला तयार! आता Grok मध्ये उत्तरांसोबतच दिसणार जाहिराती

X द्वारे वाढणार Elon Musk ची कमाई, मास्टर प्लॅन झाला तयार! आता Grok मध्ये उत्तरांसोबतच दिसणार जाहिराती

Follow Us
Close
Follow Us:

एलन मस्कच्या मालकीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर सतत काही ना काही बदल केले जात आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममधून पैसे कमावण्यासाठी आणि युजर्सचा अनुभव अधिक चांगला व्हावा यासाठी मस्क सतत प्रयत्न करत आहे आणि एक्ससाठी नवीन अपडेट्स घेऊन येत आहे. आता देखील मस्कने एक मास्टर प्लॅन केला आहे. ज्यामुळे आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सद्वारे मस्कची कमाई वाढणार आहे.

Lenovo चा नवा टॅब्लेट भारतात लाँच, 7040mAh बॅटरी आणि AI फीचर्सने सुसज्ज! 16,999 रुपयांपासून किंमत सुरु

मस्कने त्यांच्या सोशल मी  डिया प्लॅटफॉर्म एक्सवर ग्रोक AI जोडला आहे. हे AI इतर प्लॅटफॉर्म प्रमाणेच काम करते. युजर्सना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे प्रश्न अगदी वेगवेगळ्या विषयांवर माहिती देण्यापर्यंत ग्रोक सर्वकाही करू शकते. मात्र आता याच उत्तरांमध्ये यूजर्सना जाहिराती देखील दिसणार आहेत. एक्सची कमाई वाढावी यासाठी मस्कने हा निर्णय घेतला आहे. कारण रिपोर्टनुसार गेला काही वर्षात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सची कमाई घटली आहे. त्यामुळे कंपनीला मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावं लागलं आहे. त्यामुळे आता ही कमाई वाढावी आणि त्याद्वारे युजर्सना चांगले अपडेट्स देता यावेत यासाठी मस्क प्रयत्न करत आहे. केवळ जाहिरातीच नाही तर ग्रोकमध्ये अनेक बदल केले जात आहेत. अलीकडेच या ग्रोकमध्ये एक नवं इमेजिन फिचर जोडण्यात आलं ज्याच्या मदतीने फोटो आणि व्हिडिओ तयार केले जाऊ शकतात.(फोटो सौजन्य – Pinterest)

महागड्या GPU साठी जाहिरातींद्वारे निधी उभारण्याची एलोन मस्कची योजना

एक स्पेसेस डिस्कशनमध्ये मस्कने सांगितलं होतं की, ग्रोकने दिलेल्या उत्तर आणि सल्ल्यांसोबतच आता जाहिराती देखील दिसणार आहेत. ज्यामुळे AI चॅटबॉटद्वारे कंपनी कमाई करू शकते. आतापर्यंत xAI केवळ चॅटबॉटला अधिक चांगलं बनवण्यासाठी प्रयत्न करत होते, मात्र आता या चॅटबोटच्या कमाईकडे देखील लक्ष दिलं जाणार आहे. मस्कने Grok Imagine लाँच करण्याची घोषणा देखील केली होती, जे AI च्या मदतीने फोटो आणि व्हिडीओ तयार करण्यासाठी मदत करणार आहे. हे टूल सध्या अमेरिकेत फ्रीमध्ये उपलब्ध आहे आणि Grok अ‍ॅपमध्ये जोडण्यात आले आहे. जे ऐप स्टोर आणि गूगल प्लेद्वारे डाउनलोड केले जाऊ शकते.

भारत लवकरच अमेरिकेला टाकणार मागे! ChatGPT-5 च्या लाँचिंगवेळी सॅम अल्टमॅनने सांगितलं असं काही… सर्वांचेच उडाले होश

मस्कने दिलेल्या माहितीनुसार, ग्रोक चालवणाऱ्या महागड्या GPU चा खर्च भागवण्यासाठी हे पाऊल आवश्यक आहे. ते म्हणाले की यूजरच्या विशिष्ट प्रश्नाच्या उत्तरात जाहिराती या सल्ले म्हणून देखील येऊ शकतात. तथापि, त्यांनी संपूर्ण कमाई योजनेबद्दल जास्त माहिती दिली नाही. याशिवाय, X प्लॅटफॉर्मवर जाहिरातींना अधिक चांगल्या प्रकारे लक्ष्यित करण्यासाठी xAI च्या तंत्रज्ञानासह अल्गोरिदम देखील ऑप्टिमाइझ केले जातील.

रॉयटर्सने दिलेल्या रिपोर्टनुसार, मस्कने घेतलेला हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण ऑक्टोबर 2022 मध्ये मस्कने ट्विटर विकत घेतल्यापासून आणि ते खाजगी घेतल्यापासून कंपनीच्या जाहिरातींमधून मिळणाऱ्या उत्पन्नात लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळे आता घेतलेल्या या निर्णयामुळे कंपनीचे उत्पन्न वाढू शकते.

Web Title: Elon master plan for social media x now advertisement will show in grok answer tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 10, 2025 | 10:41 AM

Topics:  

  • AI technology
  • elon musk
  • Tech News

संबंधित बातम्या

Made by Google 2025: अवघे काही तास शिल्लक! लवकरच सुरु होणार Google चा सर्वात मोठा टेक ईव्हेंट, हे गॅझेट्स होणार लाँच
1

Made by Google 2025: अवघे काही तास शिल्लक! लवकरच सुरु होणार Google चा सर्वात मोठा टेक ईव्हेंट, हे गॅझेट्स होणार लाँच

Jio युजर्सना झटका! कंपनीने गुपचूप बंद केला हा बजेट-फ्रेंडली प्लॅन, आता दुसरा ऑप्शन कोणता? जाणून घ्या
2

Jio युजर्सना झटका! कंपनीने गुपचूप बंद केला हा बजेट-फ्रेंडली प्लॅन, आता दुसरा ऑप्शन कोणता? जाणून घ्या

Lava Play Ultra 5G: दमदार 5G बजेट स्मार्टफोन लवकरच करणार एंट्री, 64MP कॅमेरासह डेडिकेटेड गेमबूस्ट मोडने सुसज्ज
3

Lava Play Ultra 5G: दमदार 5G बजेट स्मार्टफोन लवकरच करणार एंट्री, 64MP कॅमेरासह डेडिकेटेड गेमबूस्ट मोडने सुसज्ज

सर्वसामान्यांना चुना लावण्यासाठी स्कॅमर्स पुन्हा सज्ज, Screen Mirroring Fraud चुटकीसरशी रिकामं करेल तुमचं बँक अकाऊंट
4

सर्वसामान्यांना चुना लावण्यासाठी स्कॅमर्स पुन्हा सज्ज, Screen Mirroring Fraud चुटकीसरशी रिकामं करेल तुमचं बँक अकाऊंट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.