Elon Musk: टेक दिग्गजाने विकला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X, या कंपनीसोबत तब्बल 33 अब्ज डॉलरमध्ये झाली डील
टेक दिग्गज आणि अब्जाधीश एलन मस्कने यांनी त्यांचं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स विकलं आहे. मस्कने ट्विटर विकत घेऊन त्यांचं एक्स केलं होतं आणि आता हे एक्स विकण्यात आलं आहे. एलन मस्क यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स स्वतःच्या आर्टिफिशियल इंटेलिजेंस कंपनी XAI ला विकला आहे. हा करार सुमारे 33 अब्ज डॉलर्समध्ये पूर्ण झाला आहे. याबाबत एक्सवर घोषणा करण्यात आली आहे. शिवाय अनेकांनी याबाबत अनेक युजर्सनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर मजेदार पोस्ट शेअर केल्या आहे.
एलन मस्कने पुन्हा एकदा आपल्या निर्णयाने जगाला धक्का दिला आहे. ज्या X ने पूर्वी ट्विटरवर खूप वाद निर्माण केले होते ते आता एलन मस्कने विकले आहे. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे एलन मस्कने X ला इतर कोणालाही नाही तर त्यांच्या स्वतःच्या कंपनी xAI ला विकले आहे. हा करार 33 अब्ज डॉलर्समध्ये झाला आहे. हा करार पूर्णपणे स्टॉक-आधारित आहे. xAI या एआय स्टार्टअप कंपनीने X विकत घेतले आहे. हे स्टार्टअप देखील एलन मस्कचे आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
मुख्य म्हणजे, एलन मस्कने हा करार स्वत: सोबतच केला आहे. मस्कने हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म दुसऱ्या तिसऱ्या कोणाला नाही तर स्वत:लाच विकला आहे. म्हणजेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स मस्कच्या मालकीचा होता आणि आर्टिफिशियल इंटेलिजेंस कंपनी XAI देखील मस्कच्या मालकीची आहे. म्हणजेच हा व्यवहार पूर्ण करत मस्कने स्वत:लाच एक्स विकला आहे. या व्यवहाराबाबत घोषणा करताना मस्कने एक्सवर लिहीले आहे की, या हालचालीमुळे X AI च्या प्रगत AI क्षमता आणि कौशल्य X च्या व्यापक पोहोचाशी जोडले जातील आणि यामुळे युजर्सना एक्स आणि X AI अशा दोन्हींच्या फीचर्सचा फायदा घेता येईल. या करारामुळे झाईचे मूल्य 80 अब्ज अमेरिकन डॉलर्स आणि एक्सचे मूल्य 33 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतके आहे.
Good job, guys 😂 https://t.co/9fx1i6Qjrc
— Elon Musk (@elonmusk) March 29, 2025
2022 मध्ये एलन मस्कने ट्विटर नावाची साइट 44 अब्ज डॉलर्सना विकत घेतली. त्यानंतर त्यांनी त्यावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना काढून टाकले आणि द्वेषयुक्त भाषण, चुकीची माहिती आणि युजर्स व्हेरिफिकेशन यावरील धोरणे बदलली. शिवाय मस्कने या प्लॅटफॉर्मचे नाव बदलून एक्स ठेवले. त्यानंतर देखील या प्लॅटफॉर्मवर अनेक बदल करण्यात आले. कंपनीने इथे GROK देखील जोडले. असं देखील सांगितलं जात होतं की, मस्कला एक्सला Everything App बनवायचं आहे. पण आता मस्कने एक्स त्यांच्या स्वत:च्याच कंपनीला विकले आहे.
मस्क म्हणाले की X, AI आणि X चे भविष्य एकमेकांशी जोडलेले आहे. आम्ही अधिकृतपणे डेटा, मॉडेल्स, गणना, वितरण आणि प्रतिभा एकत्रित करण्याचे पाऊल उचलतो. हे संयोजन XAI च्या प्रगत AI क्षमता आणि कौशल्य X सोबत एकत्रित करून आश्चर्यकारक काम करेल. एकत्रित कंपनी अब्जावधी लोकांना अधिक स्मार्ट, अधिक अर्थपूर्ण अनुभव देईल, शोध आणि ज्ञान वाढविण्याच्या आमच्या मुख्य ध्येयाची पूर्तता करेल.