
Flipkart Buy Buy 2025: ही संधी सोडू नका! iPhone 16 वर मिळतंय तब्बल 10 हजार रुपयांचं डिस्काऊंट, असा घ्या ऑफरचा फायदा
Flipkart Buy Buy 2025 सेलदरम्यान Apple च्या iPhone 16 वर देखील धमाकेदार डिस्काऊंट देण्यात आला आहे. सेलमध्ये तुम्हाला आयफोन 16 हा 10 हजारांहून अधिकच्या फ्लॅट डिस्काऊंटसह खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. एवढंच नाही तर कंपनी या आयफोनवर बँक ऑफर्स देखील देत आहे. ज्यामुळे या डिव्हाईसची किंमत आणखी कमी होणार आहे. त्यामुळे जर तुम्ही बऱ्याच काळापासून आयफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी एक चांगली संधी ठरणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
Apple ने आयफोन 17 सिरीज लाँच केल्यानंतर आयफोन 16 ची किंमत कमी केली होती. यानंतर फोनची सुरुवातीची किंमत 69,900 रुपये झाली होती. मात्र आता हा आयफोन 16 आणखी डिस्काऊंटसह खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. बाय – बाय सेलदरम्यान ग्राहकांना आयफोन 16 च्या खरेदीवर 10 हजार रुपयांचं डिस्काऊंट ऑफर केलं जात आहे. ज्यामुळे या डिव्हाईसची किंमत 58,999 रुपये झाली आहे. तसेच फ्लिपकार्ट एसबीआय क्रेडिट कार्ड आणि फ्लिपकार्ट क्रेडिट कार्डसह ग्राहकांना आणखी 1 हजार रुपयांचं डिस्काऊंट मिळणार आहे. बँक ऑफर्ससह फोनची किंमत आणखी कमी झाली आहे.
OnePlus 15 चा पर्याय शोधताय? हे 4 स्मार्टफोन्स देणार दमदार परफॉर्मन्स आणि जबरदस्त फीचर्स, वाचा यादी
iPhone 16 च्या काही खास फीचर्सबद्दल बोलायचं झाल तर या डिव्हाईसमध्ये 6.1 इंचाचा सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्ले देण्यात आला आहे. याशिवाय फोनमध्ये पावरफुल A18 चिपसेट देखील आहे, जो 6-कोर प्रोसेसरसह येतो. याशिवाय या आयफोन मॉडेलमध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे, ज्यामध्ये 48 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आणि 12 मेगापिक्सेलचा सेकेंडरी लेंस देखील आहे. फोनमध्ये पुढील बाडूला 12 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे. हा फोन Apple च्या AI फीचर्सला देखील सपोर्ट करतो.
Ans: फ्लिपकार्ट सेल म्हणजे ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Flipkart वर वेगवेगळ्या प्रोडक्ट्सवर मोठ्या प्रमाणात दिल्या जाणाऱ्या डिस्काउंट ऑफर्स.
Ans: सेल डेट्स काही काळाने बदलत असतात, परंतु “Big Billion Days”, “Big Saving Days”, “Diwali Sale”, “Year-End Sale” या प्रमुख सेल्स दरवर्षी ठराविक काळात येतात.
Ans: स्मार्टफोन्स, स्मार्ट टीव्ही, इलेक्ट्रॉनिक्स, फॅशन, होम अप्लायन्सेस, फर्निचर आणि ग्रोसरी यावर मोठे डिस्काउंट मिळतात.