OnePlus 15 चा पर्याय शोधताय? हे 4 स्मार्टफोन्स देणार दमदार परफॉर्मन्स आणि जबरदस्त फीचर्स, वाचा यादी
OnePlus 15 ने यावर्षी फ्लॅगशिप स्मार्टफोन मार्केटमध्ये दमदार एंट्री केली आहे. हा स्मार्टफोन प्रिमियम डिझाईन, पावरफुल परफॉर्मंस, जबरदस्त डिस्प्ले आणि प्रो लेव्हल कॅमेरा यामुळे हा स्मार्टफोन यूजर्समध्ये लोकप्रिय आहे. पण जर तुम्ही या स्मार्टफोनसाठी चांगले पर्याय शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आता आम्ही तुम्हाला OnePlus 15 साठी काही चांगले पर्याय सांगणार आहोत.
Vivo ने त्यांच्या X-सीरीजमध्ये Vivo X300 नावाचा एक दमदार स्मार्टफोन लाँच केला होता. हा एक कॅमेरा फोक्स्ड स्मार्टफोन आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.31-इंच LTPO AMOLED डिस्प्ले दिला आहे, ज्यामध्ये 1B कलर्स आणि 120Hz रिफ्रेश रेटचा सपोर्ट दिला आहे. या स्मार्टफोनमध्ये 200MP + 50MP + 50MP चा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप लो-लाइट फोटोग्राफी आणि व्हिडीओमध्ये अतिशय उत्तम रिझल्ट देतो. 6,040mAh बॅटरीसह या स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 9500 चिपसेट दिली आहे. या स्मार्टफोनची किंमत 75,999 रुपये आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
Google Pixel 10 अशा यूजर्ससाठी बेस्ट पर्याय ठरणार आहे, जे कॅमेरा क्वालिटी आणि सॉफ्टवेयर अनुभवाला प्राधान्य देतात. या स्मार्टफोनमध्ये 6.3-इंच OLED डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट आणि 3000 निट्स पीक ब्राइटनेस ऑफर करते. हा एक टॉप-क्लास डिस्प्ले फोन आहे. या स्मार्टफोनमध्ये 48MP + 10.8MP + 13MP चा ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. हा हँडसेट Google Tensor G5 चिपसेट आणि एआई फोटोग्राफी फीचर्सने सुसज्ज आहे. हा स्मार्टफोन Android 16 आधारित क्लीन UI हा याचा सर्वात मोठा प्लस आहे. या स्मार्टफोनची किंमत 69,890 रुपये आहे.
जर तुम्हाला डिझाईन आणि कॅमेरा दोन्हीमध्ये प्रिमियम अनुभव पाहिजे असेल त्यांच्यासाठी Oppo Find X9 एक मजबूत पर्याय आहे.या स्मार्टफोनमध्ये 50MP + 50MP + 50MP ट्रिपल रियर कॅमेरा आणि 32MP फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये 6.59-इंच AMOLED डिस्प्ले आहे, ज्यामध्ये 120Hz रिफ्रेश रेटचा सपोर्ट दिला आहे. या स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 9500 प्रोसेसर ColorOS 16 पर आधारित आहे. हा स्मार्टफोन 84,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला आहे.
Apple चा iPhone 17 अशा लोकांसाठी परफेक्ट ऑप्शन ठरणार आहे, ज्यांना IOS आधारित प्रीमियम फ्लॅगशिप स्मार्टफोन खरेदी करण्याची इच्छा आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.3-इंच LTPO Super Retina XDR OLED डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट आणि 3000 निट्स पीक ब्राइटनेस देण्यात आला आहे. Apple A19 चिपसेटमुळे हा आयफोन अत्यंत पावरफुल बनला आहे. या डिव्हाईसमध्ये 48MP डुअल रियर कॅमेरा आणि 18MP सेल्फी कॅमेरा फोटो आणि वीडियो कंटेंट क्रिएशनसाठी उत्तम कॅमेरा आहे. हा आयफोन 82,900 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला होता.






