
OnePlus बंदच्या चर्चांमागचं सत्य आलं समोर! कंपनीच्या इंडिया CEO ने स्वत: च केला खुलासा; म्हणाले, वनप्लस इंडियाचा व्यवसाय...
व्हायरल झालेल्या पोस्ट आणि बातम्यांनंतर आता वनप्लस इंडियाने स्पष्टपणे सांगितलं आहे की, कंपनी भारतात त्यांची सर्विस पूर्वीसारखीच सुरु ठेवणार आहे. एक रिपोर्ट समोर आला होता ज्यामध्ये सांगितलं होतं की, वनप्लस त्यांची सर्विस हळूहळू बंद करण्याच्या मार्गावर आहे. यासोबतच कंपनीने काही प्रोडक्ट्सचे लाँचिंग देखील रद्द केले आहे. यानंतर आता आणखी एक रिपोर्ट समोर आला आहे. ज्यामध्ये सांगण्यात आलं आहे की, वनप्लस पूर्णपणे बंद केले जाणार नाही. तर कंपनी त्यांची सर्विस मर्यादित स्वरुपात सुरु ठेवणार आहे.
I wanted to address some misinformation that has been circulating about OnePlus India and its operations.
We’re operating as usual and will continue to do so.
Never Settle. pic.twitter.com/eAGA7iy3Xs — Robin Liu (@RobinLiuOnePlus) January 21, 2026
रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, 2024 मध्ये वनप्लसच्या विक्रीत मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे पाहायला मिळाले. यानंतर कंपनीने काही नवीन प्रोडक्ट्सचे लाँचिंग देखील रद्द केले होते. या प्रोडक्ट्समध्ये वनप्लसचा फोल्डेबल फोन OnePlus Open 2 आणि फ्लॅगशिप OnePlus 15s सारख्या डिव्हाईसचा समावेश होता. मात्र विक्रीत घट झाल्याने कंपनीने या प्रोडक्ट्सचे लाँचिंग रद्द केले. रिपोर्टमध्ये असं देखील सांगण्यात आलं आहे की, वनप्लसने यूएस आणि यूरोपमध्ये त्यांच्या कार्यालयांमधील कर्मचारीही कमी केले आहेत. याशिवाय कंपनीबाबतचे अनेक निर्णय स्थानिक कार्यालयांऐवजी चीनमधून घेतले जात आहेत. रिपोर्टमध्ये असा दावा केला जात आहे की, टेक कंपनी ओप्पोने असंच काही रियलमीसोबत देखील केलं होतं. कॉस्ट कटिंग आणि कंपनी ऑपरेशन नॉर्मल ठेवण्यासाठी असे निर्णय घेतले जात असल्याचं सांगितलं जात आहे.
तर दुसऱ्या एका रिपोर्टमध्ये असं सांगितलं आहे की, ओप्पो वनप्लसचा व्यवसाय मर्यादित करत आहे, मर्यादित संख्येत फ्लॅगशिप आणि मिड-रेंज डिव्हाइसेस लाँच करत आहे. गेल्या दोन वर्षांपासून कंपनीने त्यांचे नॉर्ड सीरीज फोन अमेरिकन बाजारात लाँच केलेले नाहीत, जे तिथे त्यांचे सर्वाधिक विक्री होणारे फोन होते. वनप्लसबाबत सुरु असलेल्या ओप्पोच्या या रणनीतिला चीन आणि अमेरिकेदरम्यान सुरु असलेल्या युद्धासोबत जोडले जात आहे.
भारतात ही परिस्थिती पूर्णपणे वेगळी असणार आहे. याबाबत वनप्लस इंडियाच्या सीईओ रॉबिन ली यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवर पोस्ट करत माहिती दिली आहे. सीईओ रॉबिन ली यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की, वनप्लस इंडिया नेहमीप्रमाणे काम करेल, असे त्यांनी सांगितले, ज्यामुळे वनप्लस बंद होण्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला. वनप्लस बंद होण्याच्या या चर्चांदरम्यान आता कंपनीने स्पष्टपणे सांगितलं आहे की, इंडिया ऑपरेशन पूर्वीप्रमाणेच सुरु राहणार आहेत. त्यामुळे वनप्लस यूजर्सना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे.