Flipkart - Amazon Sale 2025: विशलिस्ट तयार केली का? सेल सुरु होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक! डिस्काऊंटसह करा मनसोक्त खरेदी
ई कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनवर आज म्हणजेच 23 सप्टेंबरपासून सेल सुरु होणार आहे. या सेलमध्ये ग्राहकांना स्मार्टफोन, लॅपटॉप, फॅशनसह अनेक घरगुती वस्तू देखील कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. कंपनीचा हा सेल आधीच प्लस आणि प्राईम मेंबर्ससाठी लाईव्ह झाला आहे. आता काही वेळातच हा सेल सर्व ग्राहकांसाठी देखील सुरु होणार आहे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या गरजेच्या वस्तू अगदी कमी किंंमतीत खरेदी करता येणार आहेत.
iPhone 17 Vs iPhone 16: हे 5 मोठे बदल आणि लोकं बनले नव्या आयफोन सिरीजचे दीवाने! जाणून घ्या सविस्तर
दोन्ही ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवर स्मार्टफोनच्या खरेदीवर मोठं डिस्काऊंट ऑफर केलं जात आहे. म्हणजेच प्रिमियम आणि महागड्या स्मार्टफोनच्या किंमती प्रचंड कमी झाल्या आहेत. त्यामुळे या स्मार्टफोनच्या खरेदीवर ग्राहकांना बचत करण्याची संधी मिळणार आहे. याशिवाय लॅपटॉप देखील सेलमध्ये अगदी कमी किंमतीत लिस्ट करण्यात आले आहेत. याशिवाय घरगुती वस्तूंच्या खरेदीवर देखील ऑफर्स उपलब्ध आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest)
दोन्ही कंपन्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर ऑफर्सबाबत माहिती देण्यास सुरुवात केली आहे. ज्यांना नवीन स्मार्टफोन किंवा लॅपटॉप खरेदी करायचा आहे. त्यांच्यासाठी ही डिल फायद्याची ठरणार आहे. फ्लॅट डिस्काऊंटसह काही गॅझेट्सवर बँक ऑफर्स देखील उपलब्ध आहेत. त्यामुळे या डिव्हाईसच्या किंमती आणखी कमी होतात. याशिवाय ज्यांना त्यांचा ड्रिम फोन म्हणजेच आयफोन खरेदी करायचा आहे, असे लोकं देखील या सेलमध्ये त्यांचं हे स्वप्न पूर्ण करू शकणार आहेत. कारण सेलमध्ये मोठ्या डिस्काऊंटसह आयफोन लिस्ट करण्यात आले आहेत. याशिवाय दोन्ही कंपन्या सेलदरम्यान अप्लायसेंस आणि फॅशनपासून ब्यूटी प्रोडक्ट्सवर देखील मोठं डिस्काऊंट ऑफर करत आहेत.
सेलमध्ये खरेदी करण्यापूर्वी तुम्हाला ज्या वस्तूंची गरज आहे, त्यांची यादी तयार करा. याशिवाय तुमचं बजेट देखील ठरवा. ज्यामुळे सेल सुरु झाल्यानंतर तुम्हाला खरेदीसाठी जास्त विचार करावा लागणार नाही. दोन्ही कंपन्यांनी त्यांच्या सेलबाबत सोशल मीडियावर पोस्ट आणि जाहिराती शेअर करण्यास सुरुवात केली आहे. मात्र याचा फायदा स्कॅमर्स देखील घेत आहेत. स्कॅमर्स सेलबाबत खोट्या लिंक शेअर करत आहेत. त्यामुळे खरेदी करताना अशा लिंकपासून सावध राहा.
कंपन्यांनी सेलची घोषणा केल्यापासून स्कॅमर्स लोकांना WhatsApp आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून खोटे मेसेज शेअर करत आहेत. मेसेजमध्ये स्क्रीनशॉट्स आणि लिंक पाठवल्या जात आहे. ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की, 40-50 हजार रुपयांचे फोन केवळ 1 रुपयांत खरेदी करू शकता. ही ऑफर पाहून अनेक लोकं क्षणाचाही विचार न करता लिंकवर क्लिक करत आहेत. AI च्या मदतीने खोटे स्क्रिनशॉ, फेक लिंक आणि फ्रॉड वेबसाईट तयार केल्या जात आहेत. त्यामुळे कोणती वेबसाईट खरी आहे आणि कोणती खोटी यातील फरक ओळखणं कठीण झालं आहे.