Flipkart Big Billion Days 2025: iPad पासून Samsung Galaxy Tab पर्यंत... सेलमध्ये तुमच्या बजेट किंमतीत खरेदी करा 'हे' पाच टॅब्लेट्स
फ्लिपकार्ट बिग बिलीयन डे 2025 हा सेल 23 सप्टेंबरपासून लाईव्ह असणार आहे. या सेलमध्ये स्मार्टफोनसोबतच टॅब्लेटवर देखील जबरदस्त ऑफर्स उपलब्ध असणार आहेत. तुम्ही तुमच्या कामासाठी पावरफुल iPad किंवा एंटरटेनमेंटसाठी Samsung Galaxy Tab खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही एक सुवर्णसंधी आहे. एक अशी संधी जिथे तुम्हाला तुमच्या गरजेनुसार आणि बजेटनुसार टॅब्लेट खरेदी करता येणार आहे. परफॉर्मेंस, डिस्प्ले क्वालिटी आणि बॅटरी बॅकअप सारख्या फीचर्सचा विचार करून तुम्ही नवीन टॅब्लेट खरेदी करू शकता.
Apple चा नवीन iPad A16 चिपसेटसह येतो, जो काम, अभ्यास आणि एंटरटेनमेंटसह सर्वकाही सहजतेने हाताळतो. यामध्ये 11-इंचाचा शार्प डिस्प्ले आहे, जो स्ट्रीमिंग, नोट्स घेण्यासाठी आणि सुरुवातीच्या एडिटिंग टास्कसाठी योग्य आहे. 128GB स्टोरेज स्टूडेंट्स आणि कॅजुअल यूजर्ससाठी योग्य आहे. मात्र या डिव्हाईसमध्ये सेलुलर सपोर्ट उपलब्ध नाही. मात्र वायाफाय वर्जन असल्याने ते अॅपल इकोसिस्टममधील सर्वात परवडणारा एंट्री-लेव्हल पर्याय बनते. (फोटो सौजन्य – X)
हा टॅब्लेट अशा लोकांसाठी डिझाईन करण्यात आला आहे, ज्यांना परफॉर्मेंस आणि पोर्टेबिलिटी दोन्हींची आवश्यकता आहे. 8GB रॅम आणि 5G सपोर्टमुळे हे डिव्हाईस मल्टीटास्किंगसाठी योग्य ठरते. 11-इंचाची स्क्रीन आउटडोर वापरासाठी अतिशय ब्राईट आहे आणि Samsung One UI मुळे डिव्हाईसमधील सॉफ्टवेयर एक्सपीरियंस देखील स्मूथ राहतो. ऑनलाइन क्लासेस, प्रोफेशनल व्हिडीओ कॉल्स किंवा एंटरटेनमेंट या सर्व कामांसाठी Samsung Galaxy Tab A9+ परफेक्ट आहे.
या डिव्हाईसमध्ये 12.1 इंच डिस्प्ले, 8GB रॅम, 256GB स्टोरेज देण्यात आले आहे. POCO चा हा पॅड “मोठ्या स्क्रीनवर अधिक मूल्य” देण्यासाठी डिझाइन केला आहे. या डिव्हाईसमध्ये 12.1-इंच डिस्प्ले आहे, जो बिंज-वॉचिंग, गेमिंग आणि स्प्लिट-स्क्रीन प्रोडक्टिविटीसाठी फायदेशीर आहे. 256GB स्टोरेज आणि 8GB रॅमसह हे युजर्ससाठी एक परफेक्ट डिव्हाईस आहे, जे हेवी ऐप्स आणि फाइल्स हँडल करू शकते. 5G कनेक्टिविटी ऑनलाइन गेमिंग आणि फास्ट डाउनलोड्स अधिक सोपे करते. दीर्घ बॅटरी लाइफमुळे ते एक विश्वासार्ह डिव्हाईस बनते.
या डिव्हाईसमध्ये 12.7 इंचाचा डिस्प्ले, 8GB रॅम आणि Wi-Fi Only ची सुविधा आहे. जर तुम्हाला एंटरटेनमेंट आणि गेमिंगसाठी टॅब्लेट पाहिजे असेल तर Motorola Pad 60 Pro एक चांगला पर्याय आहे. या डिव्हाईसचा 12.7-इंच डिस्प्ले गेमिंग आणि स्ट्रीमिंग एक्सपीरियंस अधिक चांगला बनवतो. 8GB रॅममुळे हाय-फ्रेमरेट गेम्स चालवणे आणि मल्टीटास्किंग हाताळणे सोपे होते. त्यात फक्त वाय-फाय कनेक्टिव्हिटी असल्याने, ते प्रवासापेक्षा घरगुती वापरासाठी अधिक योग्य आहे.
या टॅब्लेटमध्ये 12.1 इंच, 8GB रॅम, 128GB स्टोरेजची सुविधा मिळते. Redmi Pad Pro बजेट-फ्रेंडली यूजर्ससाठी एक बॅलेंस्ड पॅकेज घेऊन येतो. डिव्हाईसचा 12.1-इंचाचा मोठा डिस्प्ले मल्टीटास्किंग, नोट्स आणि स्ट्रीमिंग करण्यासाठी फायदेशीर आहे. MIUI ची स्मार्ट वैशिष्ट्ये विद्यार्थी आणि व्यावसायिक दोघांसाठीही उपयुक्त ठरतात. ते गेमिंग, अभ्यास आणि कामाच्या गरजा उत्तम प्रकारे संतुलित करते.