
फोटो सौजन्य सोशल मिडिया
फ्लिपकार्टने यंदाच्या सेलमध्ये स्मार्टफोन, लॅपटॉप, स्मार्ट टीव्ही, स्मार्टवॉच आणि इतर इलेक्ट्रॉनिक उत्पादनांवर आकर्षक ऑफर्स ठेवलेले पाहायला मिळत आहेत. तूमच्या बजेट नुसार स्मार्टफोन ते अगदी प्रीमियम स्मार्टफोन्सपर्यंत विविध ब्रँड्सवर फ्लिपकार्टने डिस्काउंट डिल्स उपलब्ध केल्या आहेत. काही फोनवर बँक ऑफर्स आणि जुना फोन एक्स्चेंज करण्याचा फायदा देखील मिळू शकतो.
स्मार्टफोन या व्यतिरिक्त टीव्ही, लॅपटॉप, हेडफोन आणि स्मार्टवॉच खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी यंदाच्या फ्लिपकार्टच्या सेलमध्ये अनेक उत्तम पर्याय उपलब्ध आहेत. जर तुम्ही नवीन टीव्ही किंवा लॅपटॉप घेण्याचा विचार करत असाल, तर यंदा सेलदरम्यान मिळणाऱ्या किमती आणि ऑफर्सची तुलना करणे फायदेशीर ठरणार आहे.
ब्रँडेड लॅपटॉप्सवर (HP, Dell, Lenovo, Apple) 30% ते 50% पर्यंत सूट मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थी सवलत: विद्यार्थ्यांसाठी एक्सचेंज ऑफर्स आणि नो-कॉस्ट ईएमआय (No-Cost EMI) चा अतिरिक्त फायदा मिळेल. ॲक्सेसरीज: माऊस, कीबोर्ड, आणि हेडफोन्सवर ७०% पर्यंतचा बंपर डिस्काउंट असणार आहे.
स्मार्ट टीव्ही –
4K टीव्ही बजेट किमतीत: ३२ इंचापासून ते ६५ इंचापर्यंतच्या 4K स्मार्ट टीव्हीवर (Samsung, LG, Sony, Xiaomi) विशेष सवलत.
बँक ऑफर्स: निवडक बँक क्रेडिट किंवा डेबिट कार्ड वापरल्यास १०% पर्यंत इन्स्टंट डिस्काउंट (Instant Discount).
रेफ्रिजरेटर आणि होम अप्लायन्सेस सिंगल डोअर आणि डबल डोअर फ्रीजवर एक्सचेंज बोनससह हजारो रुपयांची सूट असणार आहे. वॉशिंग मशीन आणि एसी, सणासुदीच्या किंवा विशेष सेलच्या निमित्ताने वॉशिंग मशीन आणि एअर कंडिशनरवर मोफत इन्स्टॉलेशन आणि वाढीव वॉरंटी मिळणार
सेल सुरू होण्यापूर्वी किंवा खरेदी करताना हव्या असलेल्या इलेकट्रॅानिक्स उत्पादनाची किंमत इतर वेबसाइटवरही नक्की तपासून बघा, जेणेकरून सेलमध्ये मिळणारा डिस्काउंट खरचं फायदेशीर आहे का? हे स्पष्ट होईल. उत्पादनावर उपलब्ध असलेले बँक डिस्काउंट, एक्सचेंज ऑफर्स आणि प्रॉडक्टची रेटिंग आवर्जून चेक करा.
केवळ मोठे डिस्काउंट ऑफर पाहून वस्तू खरेदी करू नका, तर तुम्ही खरेदी करणारे उत्पादन तुमच्या गरजेचे आहे का ? ते उत्पादन योग्य आहे का ते तपासा. विविध ऑफर्सच्या अटी व शर्ती वाचूनच ऑर्डर फायनल करा.