
Free Fire Max: प्लेअर्सना मिळालं नवं अपडेट, 'या' कॅरेक्टरसह गेंमिंगची मजा होणार दुपट्ट! असं करा डाऊनलोड
फ्री फायर मॅक्सचा OB52 अपडेट आता अखेर लाईव्ह झाला आहे. प्लेअर्स हे अपडेट गुगल प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करू शकतात. अपडेटची साईज डिव्हाईनुसार बदलण्याची शक्यता आहे. याशिवाय तुम्ही गरेनाच्या ऑफिशिअल वेबसाईटवर जाऊन अपडेट डाऊनलोड करू शकतात. यासाठी तुम्हाला साइटवर उपलब्ध असलेल्या एपीके फाईल्स डाऊनलोड करून इंस्टॉल कराव्या लागणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
फ्री फायर मॅक्स ओबी52 अपडेटसह प्लेअर्ससाठी आणखी एक खास सरप्राईज जारी करण्यात आलं आहे. गेममध्ये एका नवीन कॅरेक्टरची एंट्री झाली आहे. या कॅरेक्टरचे नाव Morse असं आहे. या कॅरेक्टरमध्ये स्टिल्थ बाइट्स पावर आहे. ही पावर अॅक्टिव्ह असल्यास कॅरेक्टरची मुव्हमेंट स्पीड अधिक वाढते. यामुळे दूर असलेल्या शत्रूंना हे कॅरेक्टर ट्रॅक करणं अधिक कठीण होतं. यामुळे प्लेअर्सना लवकर किल मिळवण्यासाठी मदत होते. Morse कॅरेक्टर व्यतिरिक्त गेममधील इतर कॅरेक्टर जसे नीरो, झेयनसह इत्यादी देखील अपग्रेड करण्यात आले आहे. यामुळे कॅरेक्टरची शक्ती वाढली आहे आणि गेममध्ये उपलब्ध असलेली वेपन्स अपडेट झाली आहेत.
अपडेटसह गेममध्ये एक नवीन शहर जोडण्यात आलं आहे. याचे नाव निऑन सिटी असं आहे. यामध्ये नाईट थीम आहे. यामध्ये टेलीपोर्ट गेट्स मिळतात. ज्यामुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी अगदी सहज प्रवास केला जाऊ शकतो.
नवीन कॅरेक्टर आणि लोकेशन व्यतिरिक्त मॅप्स देखील अपडेट करण्यात आले आहे. सेटिंगमध्ये देखील अपग्रेडेशन आहे.