Pixel 10 Pro vs Pixel 9 Pro: दमदार कॅमेरा की पावरफुल सॉफ्टवेअर? तुमच्यासाठी कोण आहे किंग? वाचा फीचर्स आणि किंमत
Google Pixel 10 Pro आणि Pixel 9 Pro दोन्ही स्मार्टफोन्समध्ये प्रिमियम डिझाईन देण्यात आली आहे. त्यामुळे पहिल्या नजरेत तुम्ही दोन्ही स्मार्टफोनमधील फरक अगदी सहज ओळखू शकत नाही. दोन्ही स्मार्टफोनमध्ये ग्लास बॅक आणि मेटल फ्रेम दिला आहे. यासोबतच IP68 रेटिंग देखील आहे, ज्यामुळे फोन धूळ आणि पाण्यापासून सुरक्षित राहतो. Pixel 10 Pro चे डिझाईन थोडे जास्त रिफाइंड आहे. हा थोडा जड आहे. Pixel 10 Pro च्या तुलनेत Pixel 9 Pro थोडा हलका आहे. त्यामुळे या स्मार्टफोनचा दिर्घकाळ वापर देखील आरामदायक वाटतो. Pixel 10 Pro नवीन कलर ऑप्शन जोडण्यात आले आहे. तर Pixel 9 Pro जास्त क्लासिक टोनमध्ये उपलब्ध आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
परफॉर्मंसबद्दल बोलायचं झालं तर Pixel 10 Pro हा Pixel 9 Pro पेक्षा जास्त पावरफुल आहे. Pixel 10 Pro मध्ये नवीन Tensor G5 प्रोसेसर देण्यात आला आहे, जो जास्त अॅडवांस्ड मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसवर तयार करण्यात आला आहे आणि AI संबंधित टास्क जास्त वेगाने आणि अधिक चांगल्या एफिशिएंसीसह हँडल केले जाऊ शकतात. तर Pixel 9 Pro मध्ये Tensor G4 चिपसेट देण्यात आला आहे, जो डेली यूज आणि मल्टीटास्किंगसाठी दमदार आहे. मात्र AI फीचर्स आणि फ्यूचर अपडेट्समध्ये Pixel 10 Pro ने बाजी मारली आहे. गेमिंग, फोटो प्रोसेसिंग आणि AI-बेस्ड फीचर्समध्ये Pixel 10 Pro जास्त स्मूद आणि फास्ट एक्सपीरियंस ऑफर करतो.
दोन्ही स्मार्टफोनमध्ये 6.3-इंचाचा LTPO OLED डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 120Hz रिफ्रेश रेट आणि हाय रेजोल्यूशनला सपोर्ट करतो. तथापी Pixel 10 Pro ची स्क्रीन ब्राइटनेस आणि कलर ट्यूनिंग थोडी चांगली आहे. ज्याला आउटडोर वापरात आणि HDR कंटेंट पाहण्यात फरक जाणवतो. Pixel 9 Pro चा डिस्प्ले देखील फ्लॅगशिप लेवलचा आहे. मात्र ऊन्हात Pixel 10 Pro जास्त विजिबल असतो.
Pixel 10 Pro लेटेस्ट Android वर्जनसह येतो आणि यामध्ये नवीन AI फीचर्स देण्यात आले आहेत. फोटो एडिटिंग, वॉइस असिस्ट आणि स्मार्ट सजेशन सारखे फीचर्स Pixel 10 Pro मध्ये जास्त एडवांस्ड आहेत. तर Pixel 9 Pro ला दीर्घ कालावधीसाठी अँड्रॉइड अपडेट्स आणि सुरक्षा पॅचेस मिळत राहतील, परंतु नवीन AI क्षमतांचे पूर्ण फायदे फक्त Pixel 10 Pro वरच दिसून येतील.






