Tecno Spark Go 3: 9 हजारांहून कमी किंमतीत लाँच झाला नवा स्मार्टफोन! दमदार प्रोसेसर आणि असे आहेत खास फीचर्स
AI-पॉवर्ड गेमिंगचा नवा राजा? HP ने लाँच केला कॉम्पॅक्ट पण पॉवरफुल Omen 16L Shendo Elf 2026 डेस्कटॉप
Tecno Spark Go 3 स्मार्टफोन एकाच स्टोरेज आणि रॅम व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला असून या डिव्हाईसची सुरुवातीची किंमत 9 हजार रुपयांपेक्षा कमी आहे. Tecno Spark Go 3 स्मार्टफोनच्या 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 8999 रुपये आहे. हा स्मार्टफोन 23 जानेवारीपासून अॅमेझॉनवर खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. Tecno ने लाँच केलेला लेटेस्ट स्मार्टफोन टायटॅनियम ग्रे, इंक ब्लॅक, गॅलेक्सी ब्लू आणि ऑरोरा पर्पल कलर ऑप्शनमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. कंपनीने सांगितले की, हा फोन काही दिवसांनी फ्लिपकार्टवर विक्रीसाठी देखील उपलब्ध होईल. (फोटो सौजन्य – X)
Tecno Spark Go 3 स्मार्टफोनमध्ये 6.74-इंच HD+ (720×1,600 pixels) IPS डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. Tecno हा बजेट स्मार्टफोन Unisoc T7250 प्रोसेसरसह लाँच करण्यात आला आहे, जो ऑक्टा-कोर चिपसेट आहे. प्रत्येक कोर 1.8GHz वर क्लॉक केलेला आहे. फोनमध्ये 4GB LPDDR4x रॅम आणि 64GB स्टोरेज आहे. टेक्नोचा हा फोन IP64 रेटिंगसह लाँच करण्यात आला आहे, जो याला धूळ आणि पाण्यापासून सुरक्षा प्रदान करतो.
यासोबतच हा फोन Tecno च्या Ella व्हॉईस असिस्टेंटला देखील सपोर्ट करतो. Tecno Spark Go 3 स्मार्टफोनमध्ये 13 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यासोबतच फोनमध्ये डुअल एलईडी फ्लॅश देण्यात आला आहे. या फोनमध्ये 8 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा देखील दिला आहे. या फोनमध्ये एआय जीसी पोर्ट्रेट, एआय कॅम, पोर्ट्रेट, सुपर नाईट, ब्युटी, ड्युअल व्हिडिओ, व्लॉग, टाइम-लॅप्स, पॅनोरामा, आणि प्रो कॅमेरा फीचर्सचा सपोर्ट देण्यात आला आहे. Tecno च्या या लेटेस्ट लाँच स्मार्टफोनमध्ये ऑफलाइन कॉलिंग फीचर देखील देण्यात आले आहे. हे फीचर फक्त तेव्हाच काम करेल जेव्हा Tecno फोन फोनपासून 1.5 किमी अंतरावर असेल. हा फोन Android 15 वर चालतो.






