Free Fire Max: गॅरेनाचा धमाका! बॅटलग्राऊंड गेमचे नवीन रिडीम कोड्स प्लेअर्सना डायमंडशिवाय देणार एक्सक्लुसिव्ह गिफ्ट्स
फ्री फायर मॅक्समध्ये सध्या दिवाळी ईव्हेंट सुरु झाले आहेत. या सर्व ईव्हेंट्समध्ये प्लेअर्सना जबरदस्त रिवॉर्ड्स जिंकण्याची संधी मिळणार आहे. यातीलच एका ईव्हेंटबद्दल आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. हा ईव्हेंट आहे Play Peak: Dawn Of Light. या खास ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना गोल्ड कॉइन (Gold) आणि स्पेशल बॅनर जिंकण्याची संधी मिळणार आहे. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे या दोन्ही वस्तू डायमंडशिवाय क्लेम केल्या जाऊ शकतात. यामुळे प्लेअर्सचा फायदा होणार आहे. कारण डायमंड देखील खर्च करावे लागणार नाहीत आणि प्लेअर्सना प्रीमियम आयटम्स जिंकण्याची देखील संधी मिळणार आहे.
फ्री फायर मॅक्समध्ये सुरु असलेला Play Peak: Dawn Of Light हा एक टास्क बेस्ड ईव्हेंट आहे. या ईव्हेंटमध्ये प्लेअर्स 3000 गोल्ड कॉइन आणि Diwali Theme बॅनर रिवॉर्ड म्हणून जिंकू शकणार आहेत. टास्क पूर्ण केल्यानंतर प्लेअर्सना हे रिवॉर्ड्स जिंकण्याची संधी मिळणार आहे. हा ईव्हेंट गेमर्ससाठी 26 ऑक्टोबरपर्यंत लाईव्ह असणार आहे. दिवाळीचा हा खास ईव्हेंट 9 ऑक्टोबर रोजी लाईव्ह करण्यात आला होता.(फोटो सौजन्य – Pinterest)
तुमच्या माहितीसाठी, गोल्डहे फ्री फायर मॅक्समध्ये आढळणारे गेमिंग करेंसी आहे. ही गेमिंग करेंसी विविध गेमिंग वस्तू खरेदी करण्यासाठी वापरले जाऊ शकते. तथापि, ही गेमिंग करेंसी डायमंडसारख्या खऱ्या पैशाने खरेदी करता येत नाही. ईव्हेंटद्वारे त्यावर दावा करता येतो.
फोन आणि फ्लशची जोडी ठरत आहे ‘घातक’! नव्या अभ्यासाने उघड केले धक्कादायक सत्य, डॉक्टरांनी दिलाय इशारा