
Free Fire Max: यूनिक Gloo Wall Skin फ्रीमध्ये मिळवण्याची हीच योग्य संधी, नवीन कोड्स क्लेम करताच मिळणार भरगोस रिवॉर्ड्स
गेम डेवलपर कंपनी गरेना पुन्हा एकदा त्यांच्या फ्री फायर मॅक्स प्लेअर्ससाठी रिडीम कोड्स घेऊन आली आहे. गरेनाने जारी केलेले रिडीम कोड्स म्हणजे प्लेअर्सना फ्री फायरमधील इन गेम आयटम्स जिंकण्याची सुवर्णसंधी आहे. ज्या प्लेअर्सना डायमंड खर्च करून इन गेम आयटम्स खरेदी करणं शक्य नसतं किंवा ज्या प्लेअर्सना डायमंड खरेदी करणंं देखील शक्य नसतं, अशा प्लेअर्ससाठी गेम डेवलपर कंपनी गरेना रोज रेडिम कोड्स जारी करत असते. या रिडीम कोड्समध्ये प्लेअर्सना आकर्षित रिवॉर्ड्स मिळतात. या रिवॉर्ड्ससाठी कोणतेही डायमंड देखील खर्च करण्याची गरज नसते.
गरेना प्रत्येक प्रदेशासाठी मर्यादित काळासाठी रिडीम कोड्स जारी करत असते. हे कोड्स 12 ते 16 अंकी असतात. या कोड्सच्या मदतीने प्लेअर्सना वेपन्स, कॅरेक्टर, पेट्स, बंडल, स्किन, ग्लू वॉल व इमोट्स इत्यादी रिवॉर्ड्स जिंकण्याची संधी मिळते. याशिवाय काही दुर्मिळ रिवॉर्ड्स देखील रेडिम कोड्सच्या मदतीने जिंकू शकतात. हे असे रिवॉर्ड्स असतात जे मिळवण्यासाठी शेकडो डायमंड खर्च करावे लागतात. गरेनाने जारी केलेल्या आजच्या रेडिम कोड्सबाबत जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)