OTP न मागताच स्कॅमर्स रिकामं करणार तुमचं बँक अकाऊंट! लोकांना फसवण्याची ही आहे नवी पद्धत, असा होतो फ्रॉड
स्कॅमर्स लोकांची फसवणूक करण्यासाठी सतत नवनवीन पद्धती शोधत असतात. कधी ओटीपी स्कॅम तर कधी तुमच्या व्हाट्सअपवर आमंत्रण पत्रिका येते. आता देखील स्कॅमर्सनी लोकांना फसवण्यासाठी नवीन पद्धत शोधली आहे आणि या पद्धतीमध्ये ओटीपीची देखील गरज भासत नाही. ओटीपीशिवाय स्कॅमर्स तुमचे बँक अकाउंट रिकामं करू शकतात. यापूर्वी अशा अनेक घटना घडल्या आहेत ज्यामध्ये स्कॅमर्स लोकांकडून ओटीपी मागतात आणि लोकांचे बँक अकाउंट रिकामं करतात. मात्र आता असं होणार नाही. तुमचं बँक अकाउंट रिकामं करण्यासाठी ओटीपीची देखील गरज नाही.
ऑफीस लॅपटॉपमध्ये WhatsApp Web चा वापर करताय, थांबा! सरकारने दिली चेतावणी, कारण वाचून उडतील तुमचे होश
गेल्या काही दिवसात अशा अनेक घटना समोर आल्या आहेत, ज्यामध्ये स्कॅमर्सनी ओटीपीशिवाय लोकांची फसवणूक केली आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने घोटाळ्यांबाबत लोकांना सतर्क करण्यासाठी काही सूचना देखील जारी केल्या आहेत. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने लोकांना या स्कॅमपासून सावध राहण्यास सांगितले आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
सामान्यतः जेव्हा स्कॅमर्स लोकांची फसवणूक करतात तेव्हा ते लोकांकडून ओटीपीची मागणी करतात आणि वेगवेगळ्या पद्धतीने हा ओटीपी मिळवतात. मात्र असं होणार नाही. आता स्कॅमर्सनी अशी पद्धत शोधली आहे ज्यामध्ये लोकांचा कॉल मर्ज केला जातो आणि स्कॅमर्सना ओटीपी सापडतो. या स्कॅमला कॉल मर्जींग स्कॅम असं म्हटलं जातं. यामध्ये ओटीपीशिवाय लोकांची फसवणूक केली जाते. याची सुरुवात मिस्ड कॉलपासून होते.
स्कॅमर्स तुम्हाला जॉब इंटरव्यूसाठी किंवा एखाद्या इव्हेंटसाठी कॉल करतात आणि असं सांगतात की तुमचा नंबर तुमच्या मित्राने किंवा एखाद्या नातेवाईकांनी दिला आहे. यानंतर स्कॅमर त्या संबंधित व्यक्तीला कॉल मर्ज करण्यास सांगतात, त्यामुळे समोरच्याला असं वाटतं की खरंच आपल्या एखाद्या मित्राने किंवा नातेवाईकाने हा नंबर दिला आहे आणि समोर तोच फक्त बोलत आहे. पण खरंतर समोर क्रेडिट कार्ड कंपनी किंवा एखादी बँक कंपनी असते जिथे तुमचा ओटीपी दिला जातो. स्कॅमर्सने सांगितल्याप्रमाणे जसं तुम्ही कॉल मर्ज करता त्याचवेळी तुमचा ओटीपी स्कॅमरकडे जातो. यामुळेच स्कॅमर्स अगदी सहज तुमच्या बँक अकाउंटमधून पैसे काढू शकतात.
हा स्कॅम अत्यंत धोकादायक आहे. यापासून कसं वाचावे यासाठी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया काही सूचना दिल्या आहेत. या सूचनांचे पालन करून सामान्य माणसं स्कॅमर्सपासून आपली सुरक्षा करू शकतात. कोणत्याही अनोळखी नंबरवरून कॉल किंवा मेसेज आला तर त्याकडे लक्ष देऊ नका. जर एखाद्या नंबरवरून कॉल करून तुमच्याकडे ओटीपीची मागणी केली जात असेल तर फोन लगेच कट करा आणि नंबर ब्लॉक करा. तुमच्यासोबत एखादी फ्रॉईडची घटना घडली तर तात्काळ पोलिसात किंवा तुमच्या जवळील सायबर क्राईममध्ये तक्रार करा. तसेच जर तुम्ही अँड्रॉइड युजर असाल तर तुमच्या फोनमध्ये स्कॅम डिटेक्शन फीचर ऑन करा. यामुळे अनोळखी नंबरवरून येणारे कॉल प्रचंड कमी होतील आणि तुमची सुरक्षा टिकून राहील.