Jio यूजर्ससाठी खुशखबर! तुमचे आवडते शो पाहण्याची मजा होणार दुप्पट, या प्लॅन्समध्ये फ्रीमध्ये मिळतंय Netflix सब्सक्रिप्शन
भारतातील आघाडीची टेलिकॉम कंपनी जिओचे करोडो युजर्स आहेत. याच युजर्ससाठी कंपनी नवीन फायदेशीर रिचार्ज प्लॅन घेऊन येत असते. असे रिचार्ज प्लॅन ज्यामध्ये युजर्सना कॉलिंग आणि एसएमएससोबतच इतर फायदे देखील मिळतील. आता आम्ही तुम्हाला जिओच्या अशाच काही प्लॅन्सबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये कॉलिंग आणि एसएमएससोबतच ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सचं सब्सक्रिप्शन देखील ऑफर केले जाते.
नेटफ्लिक्सवर अतिरिक्त पैसे न देता जर तुम्हाला तुमचे आवडते शो आणि चित्रपट पाहायचे असतील, तर रिलायन्स जिओचे हे प्लॅन्स तुमच्यासाठी बेस्ट ठरणार आहेत. यामध्ये तुम्हाला फ्रीमध्ये तुमचे आवडते शो आणि चित्रपट पाहण्याची संधी मिळणार आहे. जिओ त्यांच्या काही प्रीपेड रिचार्ज प्लॅनसह मोफत नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शन ऑफर करतो. अशाच रिचार्ज प्लॅनबद्दल आता जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)
Netflix चे मासिक सब्सक्रिप्शनची किंमत काहीशे रुपयांपासून सुरु होते. जर तुम्हाला Netflix वर तुमचे आवडते शो आणि चित्रपट पाहायचे असतील तर तुम्हाला पैसे खर्च करून सब्सक्रिप्शन खरेदी करावे लागते. मात्र आता असं होणार नाही. कारण आता जिओच्या प्लॅनमध्ये तुम्हाला नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शन ऑफर केलं जात आहे. यासोबतच, तुम्हाला JioTV आणि JioCloud ची सुविधा देखील मिळेल, म्हणजेच तुम्हाला कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय अधिक फायदे मिळतील.
या रिचार्ज प्लॅनची व्हॅलिडिटी 84 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये 168GB (2GB प्रतिदिन) डेटा ऑफर केला जातो. तसेच या प्लॅनमध्ये युजर्सना अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 SMS ची सुविधा दिली जाते. विशेष म्हणजेच या प्लॅनमध्ये युजर्सना Netflix सब्सक्रिप्शन, JioTV आणि JioCloud अॅक्सेस दिला जात आहे. हा प्लॅन अशा यूजर्ससाठी योग्य आहे जे दररोज स्ट्रीमिंग करतात परंतु त्यांना जास्त डेटाची आवश्यकता नाही.
या रिचार्ज प्लॅनची व्हॅलिडिटी 84 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये 252GB (3GB प्रतिदिन) डेटा ऑफर केला जातो. तसेच या प्लॅनमध्ये युजर्सना अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 SMS ची सुविधा दिली जाते. विशेष म्हणजेच या प्लॅनमध्ये युजर्सना Netflix Basic सब्सक्रिप्शन, JioTV आणि JioCloud अॅक्सेस दिला जात आहे. जर तुम्ही जास्त स्ट्रीमिंग, गेमिंग, व्हिडीओ कॉल किंवा मोठ्या फाइल डाउनलोड करत असाल तर हा प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट ठरणार आहे.
MyJio अॅप, जियो वेबसाइट किंवा कोणत्याही पेमेंच अॅपवरून तुम्ही 1,299 रुपये किंवा 1,799 रुपयांचा रिचार्ज करू शकता. रिचार्ज अॅक्टिवेट होताच तुमचे नेटफ्लिक्स अकाउंट लिंक करा (किंवा एक नवीन अकाउंट तयार करा) आणि लगेच स्ट्रीमिंग सुरू करा. इतर जिओच्या प्लॅनमध्ये जिओहॉटस्टार आणि अमेझॉन प्राइम सारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मचे सबस्क्रिप्शन ऑफर केले जाते, त्यामुळे तुमचे मनोरंजन कधीही थांबत नाही. तुम्ही कधीही तुमचे आवडते शो आणि चित्रपट पाहू शकता.
Airtel चा हा बजेट फ्रेंडली प्लॅन फक्त 181 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. यात 30 दिवसांच्या वैधतेसह एकूण 15 जीबी डेटा मिळतो. यासोबतच, एअरटेल एक्सस्ट्रीम प्ले मेंबरशिप उपलब्ध आहे जी Sony Liv, Hoichoi, Lionsgate Play, Sun NXT, Chaupal सारख्या 22 हून अधिक ओटीटी प्लॅटफॉर्मवर मोफत प्रवेश देते.
या प्लॅनमध्ये युजर्सना एकूण 50GB डेटा ऑफर केला जातो, ज्याची व्हॅलिडीटी 30 दिवसांची आहे. यामध्ये JioCinema (Hotstar) चे मोफत सबस्क्रिप्शन देखील समाविष्ट आहे, ज्यामुळे वापरकर्त्यांना क्रिकेट सामन्यांपासून ते बॉलीवूड ब्लॉकबस्टरपर्यंत सर्व काही पाहता येते.