स्मार्टफोनपासून ते स्मार्ट ग्लासेसपर्यंत... आठवडभरात टेक क्षेत्रात काय काय घडलं? एका क्लिकवर जाणून घ्या सर्वकाही
टेक क्षेत्रात या आठवड्यात काय काय घडलं आहे, या सर्वांचा सरांश आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. विवो स्मार्टफोन, शाओमी स्मार्ट ग्लासेस आणि सोनी इअरबड्स या सर्वांबद्दल आज आम्ही तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहोत.
शाओमी कंपनीने त्यांचे नवीन स्मार्ट ग्लासेस शाओमी मिजिया स्मार्ट ऑडिओ ग्लासेस 2 लाँच केला आहे. हे स्मार्ट ग्लासेस नेहमीपेक्षा अधिक सडपातळ आणि हलके आहेत. त्यांचे वजन फक्त 27.6 ग्रॅम आहे. या स्मार्ट ग्लासेसमध्ये फोल्डेबल फ्रेम आणि क्विक रिलीज यंत्रणा आहे ज्यामुळे युजर्स सहजपणे लेन्स बदलू शकतात. कंपनीने त्याची फ्रेम पूर्वपिक्षा पातळ केली आहे. टेम्पल आर्म्स फक्त 5 मिमी जाड आहेत, जे 26% ते 30% बारीक आहे. कंपनीचे म्हणणे आहे की हे चष्मे जास्त वेळ घातल्यानंतरही नाक आणि कानांवर जास्त दबाव पडत नाही. (फोटो सौजन्य – Pinterest & X)
चष्याच्या टेम्पलवर जास्त वेळ दाबल्याने वन-टच व्हॉइस रेकॉर्डिंग चालू होते. रेकॉर्डिंग सक्रिय असताना, नोटिफिकेशन लाईट चालू होते, जेणेकरून युजर्सची गोपनीयता राखली जाते. या स्मार्ट ग्लासेसमध्ये व्हॉइस असिस्टंट सपोर्ट, रिअल टाइम ऑडिओ ब्रॉडकास्टिंग आणि IP54 रेटिंग आहे, जे ते धूळ आणि पाण्याच्या थेंबांपासून संरक्षित ठेवते. चांगल्या ऑडिओ गुणवत्तेसाठी आणि आवाज कमी करण्यासाठी यात एक नवीन ध्वनिक रचना आहे. चार मायक्रोफोन सेटअप आणि बुद्धिमान अल्गोरिदम कॉलिंग अनुभव वाढवतात. यात एक नवीन प्रायव्हसी मोडदेखील आहे. हे फीचर मिजिया ग्लासेस अॅपद्वारे चालू करता येते. ते 12 तासांपर्यंत संगीत प्लेबॅक, 9 तास कॉलिंग आणि 12 दिवसांचा स्टँडबाय टाइम देतात. यात रसी मॅग्नेटिक चार्जिंग तंत्रज्ञान आहे, जे 1 तासात पूर्ण चार्ज करते आणि फक्त 10 मिनिटांच्या चार्जिंगमध्ये 4 तासांचा बॅकअप देते.
सोनी कंपनीने त्यांचे नवीन वायरलेस पारदर्शक इयरबडस सोनी WF-C७१०N लाँच केले आहेत. यात दोन मायक्रोफोनसह ड्युअल नॉइज सेन्सर तंत्रज्ञान समाविष्ट आहे, जे सभोवतालचा आवाज कमी करते. युजर्स सोनी साउंड कनेक्ट अॅपद्वारे सराउंड साउंड सेटिंग्ज समायोजित करू शकतात, जे 20 स्तरांचे नियंत्रण किवा व्हॉइस पासयू देते. त्याचे अॅडॉप्टिव्ह साउंड कंट्रोल स्थान आणि क्रियाकलापांवर आधारित ऑडिओ सेटिंग्ज बदलते. 500 दशलक्षाहून अधिक व्हॉइस नमुन्यांवर प्रशिक्षित त्याची एआय-आधारित अचूक व्हॉइस पिकअप तंत्रज्ञान, कॉल दरम्यान बोलणे वेगळे करण्यास आणि पार्श्वभूमी आवाज कमी करण्यास मदत करते.
प्रत्येक इअरबड 5 मिमी ड्रायव्हर्सने सुसज्ज आहे आणि डिजिटल साउंड एन्हांसमेंट इंजिन (DSEE) ला सपोर्ट करतो, जो कॉम्प्रेस्ड ऑडिओ गुणवत्ता सुधारतो. अॅपमध्ये EQ कस्टम समाविष्ट आहे, जे युजर्सना त्यांच्या पसंतीनुसार ध्वनी प्रोफाइल समायोजित करण्याची परवानगी देते. हे इअरबडस हलके आहेत आणि पाण्याच्या प्रतिकारासाठी IPX4 रेटेड डिझाइनमध्ये येतात. इअरबडसमध्ये दंडगोलाकार केस आहे आणि संगीत, कॉल आणि व्हॉल्यूमसाठी टच कंट्रोल्ससह येतात. चार्जिंग केससह, इअरबडस एकूण 30 तासांपर्यंत बॅटरी लाइफ देतात. कंपनीचा दावा आहे की ते फक्त पाच मिनिटे चार्जिंग करून 60मिनिटे चालू शकते.
विवो एक्ह 200 अल्ट्रा स्मार्टफोन लवकरच जागतिक बाजारात लाँच होणार आहे. हा विवो फोन विवो एक्स 200 सिरीजमधील प्रमुख डिव्हाइस असेल. हा विवो स्मार्टफोन प्रगत कॅमेरा क्षमतेसह लाँच केला जाईल. हा फोन थानोस 2.0 या कोड नेमसह स्पॉट झाला आहे. यासोबतच, विवो एक्स 200 अल्ट्रा स्मार्टफोनसोबत आणखी एक फोन दिसला आहे, जो विवो एक्स 200 एस असल्याचे वृत्त आहे.
चार्जिंग क्षमतेबद्दल बोलायचे झाले तर, आगामी X200 अल्ट्रा स्मार्टफोनमध्ये 100W वायर्ड चार्जिंग असू शकते. यामुळे, युजर्सना त्यांचा फोन चार्ज करण्यासाठी खूपच कमी वेळ लागेल. हा स्मार्टफोन क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगन 8 एलिट प्रोसेसरसह लाँच केला जाईल. कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाले तर, फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा मॉड्यूल असेल. त्याचा प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सेलचा असेल, त्यासोबत 50 मेगापिक्सेल अल्ट्रा वाइड कॅमेरा आणि 200 मेगापिक्सेल पेरिस्कोप टेलिफोटो लेन्स दिला जाईल.
कंपनी या विवो फोनमध्ये प्रगत कॅमेरा वैशिष्ट्यांसह एक नवीन इमेजिंग चिप देईल. या विवो फोनमध्ये V4 चिप मिळण्याची अपेक्षा आहे. या फोनमध्ये 2K क्वाड-कर्व्ह डिस्प्ले असेल. बहुतेक स्मार्टफोन कंपन्या आता फ्लॅट डिस्प्ले देत आहेत. अशा परिस्थितीत, विवो काहीतरी वेगळे ऑफर करत आहे. या स्मार्टफोनची भारतात लाँचिंग तारीख अद्याप जाहीर झालेली नाही.