FUJIFILM ची नवी वाइड अँगल PL माऊंट झूम लेन्स लाँच, ब्रॉड कास्ट इंडिया ईव्हेंटमध्ये केली घोषणा
प्रक्षेपण, सिनेमा चित्रीकरण आणि इलेक्ट्रोनिक इमेजिंग यासाठीची लेन्स लाँच करणाऱ्या FUJIFILM इंडियाने FUJINON HZK14-100mm – ‘डुवो पोर्टेबल’ ही लेन्स लाँच केली आहे. ब्रॉड कास्ट इंडियाच्या 33 व्या अधिवेशनात याची माहिती देण्यात आली. डुवो सिरीजमध्ये FUJINON HZK25-1000mm आणि FUJINON HZK24-300mm या लेन्स लाँच करण्यात आल्या आहेत. त्यामुळे FUJINON HZK14-100mm – ‘डुवो पोर्टेबल’ ही डुवो सिरीजमधील तिसरी आणि वाइड झूम मधील पहिली लेन्स आहे.
हेदेखील वाचा- Samsung Galaxy A16 भारतात लाँच, 6 वर्षांचे OS अपडेट आणि 5000 mAh बॅटरीसह झाली एंट्री
चित्रपट निर्माते आणि ब्राॉडकास्ट प्रक्षेपण व्यावसायिकांसाठी ही लेन्स उपयोगी ठरणार आहे. प्रतिमेची गुणवत्ता आणि वापरातली व्यवहार्यता यांमध्ये समतोल राखत FUJINON HZK14-100mm विविध दृश्यनिर्मिती साठीचे एक अत्यंत उपयुक्त साधन ठरेल. FUJINON HZK14-100mm ही एक आटोपशीर लेन्स असून लार्ज इमेज सेन्सरशी सुसंगत अशी तिची रचना आहे. ती Super 35 मध्ये 7.1x झूम सह 14-100mm फोकल लेंग्थ मिळवून देते.1.5x एक्सपांडरमुळे तिची व्याप्ती 21-150mm पर्यंत वाढू शकते ज्यामुळे, लार्ज फॉरमॅट कॅमेरामध्ये 16:9 या प्रमाणात कव्हरेज मिळू शकते. (फोटो सौजन्य – pinterest)
या लेन्सचे वजन फक्त 2.54 किलो आणि लांबी 266.9mm मिमी असल्यामुळे, डुवो सिरीजमधील ही लेन्स अगदी सहज प्रवासात वापरली जाऊ शकते. प्रगत वैशिष्ट्यांच्या आणि सुपर इ डीच्या आधारे ही लेन्स चित्रपटाच्या दर्जाचे छायाचित्रण करण्यास सज्ज आहे. या लेन्सचे कार्य प्रक्षेपण शैलीचे आहे आणि ती अन्य सिनेमा उपकरणांशी जोडली जाऊ शकत असल्यामुळे प्रक्षेपण आणि चित्रपट निर्मिती या दोन्हीसाठी तिचा फायदा होतो.
FUJINON HZK14-100mm मध्ये अनेक प्रगत वैशिष्ट्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे प्रक्षेपण आणि चित्रपट निर्मिती या बाबतीत ती वरचढ ठरते. चित्रपटसारखी दृश्ये टिपण्याची ताकद असल्यामुळे ही लेन्स अचूक काम करते आणि T2.9 या अपरचरला सुद्धा आश्चर्यकारक ‘बोके इफेक्ट’ मिळवून देते. प्रसिद्ध दिग्दर्शक लीना यादव आणि मान्यवर सिने छायाचित्रणकार असीम बजाज यांच्या उपस्थितीत डुवो सिरीजमधील पहिली वाइड झूम लेन्स लाँच करण्यात आली.
हेदेखील वाचा- गुगल चॅटमध्ये नोटिफिकेशन कसं मेनेज कराल? या सोप्या स्टेप्स तुम्हाला करतील मदत
प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक लीना यादव म्हणाल्या, प्रेक्षकांची अभिरुचि विकसित होत असल्यामुळे चित्रपट हे कलामाध्यम अधिक परिपक्व होत आहे आणि चित्रपटकर्त्यांसाठी कला स्वातंत्र्याची नवी दारे खुली होत आहेत. मला Fujinon 14-100mm Duvo ही लेन्स माझ्या कल्पकतेला पोषक वाटते. इथे जमलेल्या तज्ज्ञांचे विचार ऐकल्यावर मला असे वाटते की या लेन्समुळे मला मंद प्रकाशात अधिक व्यापक परिसर टिपता येईल. या मालिकेतील लेन्स भारतीय चित्रपट उद्योगाच्या निर्मितीकौशल्याला बळ देतील अशी मला खात्री आहे.
सिने छायाचित्रणकार असीम बजाज यांनी FUJIFILM च्या लेन्सच्या बहुगुणी स्वरूपाची नोंद केली आणि “बिकमिंग” या त्यांच्या चित्रपटाच्या चित्रणात फुजिनॉन प्रेमीस्टा (19-45mm; 28-100mm; 80-250mm) लेन्सचा कसा फायदा झाला ते सांगितले. ते म्हणाले की, फुजिनॉनचा वापर केल्यामुळे प्रतिमेची गुणवत्ता आणि खोली कमालीची सुधारली. फुजिनॉन लेन्स आणि GFX सीरिज यांच्या अबाधित कामामुळे आणि थक्क करणारी बारकावे टिपण्याची ताकद मिळाल्यामुळे मला ‘बिकमिंग’ चा आत्मा नेमकेपणाने, उत्तम रंगसंगतीने साध्य झाला. नव्या डुवो मालिकेतील 14-100mm उत्तम कामगिरी करेल अशी मला खात्री आहे. या लेन्सच्या वैशिष्ट्यांमुळे प्रतिमा चित्रणाचे विश्वच बदलेल आणि मंद प्रकाशातील चित्रण अधिक उठावदार होईल. या लेन्सचा लवकर वापर करण्यास मी उत्सुक आहे.
FUJIFILM इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक कोजी वादा म्हणाले, FUJIFILM इंडिया नवनवीन उत्पादने आणि प्रणाली निर्माण करणे त्यातून ग्राहकाचा अधिकाधिक फायदा करून देणे यासाठी वचनबद्ध आहे. वैविध्यपूर्ण कल्पना, विशेष क्षमता आणि असाधारण कर्मचारीवर्ग या आधारावर आम्ही जगभरातल्या प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य उमटवण्याचा प्रयत्न करतो. नवीन FUJINON HZK14-100mm लेन्स मधून आमचे हे प्रयत्न अधोरेखित होतात आणि प्रक्षेपण क्षेत्रातील व्यावसायिकांना भरपूर मोकळीक आणि गुणवत्ता मिळू शकते ज्यामुळे ते विविध वातावरणात उत्तम कामगिरी दाखवू शकतात.