
Free Fire Max: एक चूक आणि गेम संपला! 'या' कारणांमुळे बॅन होऊ शकतं तुमचं गेमिंग अकाऊंट, सावध व्हा
हेडशॉट हॅक, एइमबॉट, वॉलहॅक सारख्या कोणत्याही चुकीच्या पद्धतीचा वापर केल्यास गेमिंग कंपनी गरेना तुमच्या अकाऊंटवर कारवाई करते आणि अकाऊंट बॅन करण्याचा निर्णय घेते. (फोटो सौजन्य – Pinterest)
गेममध्ये ऑटो-किल, जास्त डॅमेज किंवा परफॉर्मेंस वाढवणाऱ्या अनऑफिशियल अॅप्सचा वापर करणं गेमच्या नियमांविरुद्ध आहे.
परवानगीशिवाय एमुलेटरवर गेम खेळत असाल तर गेमिंग कंपनी तुमचं अकाऊंट बॅन करण्याचा निर्णय घेऊ शकते.
फ्री फायर मॅक्सच्या OBB किंवा डेटा फाइल्स एडिट करणं गंभीर नियमांचे उल्लंघन मानले जाते.
अपशब्द वापरणं, चिटिंगचे खोटे रिपोर्ट, टीममेटला त्रास देणे किंवा चुकीच्या पद्धतीने खेळणे यामुळे देखील तुमचं अकाऊंट बॅन होण्याची शक्यता आहे.
काही तास, काही दिवस किंवा काही आठवड्यांसाठी तुमचा अकाउंट बॅन केलं जातं
तुमचे फ्री फायर मॅक्स अकाऊंट कायमचे बॅन केले जाते. हे अकाऊंट परत मिळवणं अशक्य आहे.