Free Fire Max: प्लेअर्ससाठी आजचे रिडीम कोड्स झाले LIVE, फ्री डायमंड्स आणि स्किन्स मिळवण्यासाठी आत्ताच करा क्लेम
तुम्ही देखील फ्री फायर मॅक्स प्लेअर आहात का? तुम्ही देखील गेममध्ये प्रीमियम आइटम्स खरेदी करण्यासाठी डायमंड किंवा पैसे खर्च करत आहात का? तर आत्ताच थांबा. कारण आता गेमिंग आयटम्स मिळवण्यासाठी तुम्हाला डायमंड आणि पैसे खर्च करण्याची गरज नाही. कारण Garena Free Fire MAX डेवलपर्स त्यांच्या प्लेअर्ससाठी रोज फ्री फायर मॅक्स रिडीम कोड्स जारी करत असते. या कोड्सच्या मदतीने प्लेअर्स डायमंड बंडल्सपासून वेपन स्किन्सपर्यंत खूप काही मिळवू शकतात. यासाठी कोणतेही पैसे किंवा डायमंड खर्च करण्याची गरज नसते. रिडीम कोड्सच्या मदतीने हे सर्व मोफत मिळवलं जाऊ शकतं.
App बनवण्यासाठी कोडिंग नाही, फक्त कल्पना हवी! AI च्या मदतीने करा धमाका आणि कमवा लाखो रुपये!
रिडीम कोड्स अक्षरं आणि अंकांचं मिश्रण असतं. हे कोड्स 12 ते 15 अंकी असतात. या कोड्सच्या मदतीने प्लेअर्स एक्सक्लूसिव रिवॉर्ड्स मोफत मिळवू शकतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे कोड्स मर्यादित काळासाठी लाईव्ह असतात. त्यामुळे हे क्लेम करण्यासाठी प्लेअर्सकडे ठरावीक वेळ असतो. (फोटो सौजन्य – Pinterest)
फ्री फायर मॅक्समध्ये मिळणारी सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय गेमिंग आयटम म्हणजे स्किन. या स्किनच्या मदतीने गनला कूल आणि स्टाइलिश लुकसोबतच पावर देखील मिळते. ज्याच्या मदतीने डॅमेज, रेट ऑफ फायरची शक्ती अधिक वाढते. यामुळे गेममध्ये शत्रूला हरवण्यासाठी मदत होते. पण ही स्किन फ्री कशी मिळवावी, याबाबत आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
फ्री फायर मॅक्समध्ये रोज होणाऱ्या मिशन व्दारे प्लेअर्स वेपन स्किन मोफत मिळवू शकतात. यासाठी मिशनमध्ये मिळणारे काही टास्क पूर्ण करावे लागणार आहेत. हे टास्क पूर्ण केल्यानंतर प्लेअर्सना स्किन मिळते. या स्कीन एक्सेस करण्यासाठी डेली मिशन सेक्शनमध्ये जावं लागणार आहे. जिथे टास्कची संपूर्ण यादी दिलेली असते.
गरेना त्यांच्या गेमर्ससाठी वेळोवेळी नवीन ईव्हेंटचं आयोजन करत असते. यामधीलच एक लक-रॉयल इवेंट आहे. हे लकी-ड्रॉ प्रमाणेच काम करते. हे तुम्हाला डायमंडचा वापर करून स्किन्ससह बक्षिसे मिळविण्यास अनुमती देते.
फ्री फायर मॅक्समध्ये मिळणारे Booyah Pass Premium द्वारे देखील एक्सक्लूसिव स्किन मिळवली जाऊ शकते. स्किनशिवाय पासच्या मदतीने इमोट स्लॉट, बंडल आणि गोल्ड कॉइन सारखे आयटम्स देखील मिळवले जाऊ शकतात.
फ्री फायर मॅक्स प्लेअर्ससाठी रोज रिडीम कोड्स जारी केले जातात. या रिडीम कोड्सच्या मदतीने स्कीन मोफत मिळवल्या जाऊ शकतात.