App बनवण्यासाठी कोडिंग नाही, फक्त कल्पना हवी! AI च्या मदतीने करा धमाका आणि कमवा लाखो रुपये!
यापूर्वी एक अॅप तयार करण्यासाठी अनेक महिन्यांचा कालावधी लागत होता. अॅप तयार करण्यासाठी डेव्हरलपरची मदत घ्यावी लागत होती, तसेच कोडिंग, टेस्टिंग आणि डिजाइनिंगसाठी देखील बरेच पैसे खर्च करावे लागत होते. मात्र आता AI मुळे ही संपूर्ण प्रक्रिया अगदी सोपी झाली आहे. तुम्हाला केवळ AI ला तुमच्या अॅपची कल्पना सांगायची आहे, जसं फूड डिलीवरी अॅप, एजुकेशन अॅप, किंवा ई-कॉमर्स प्लेटफॉर्म. त्यानंतर AI आपोआप कोड, लेआउट आणि फंक्शन्स जनरेट करते. काही मिनिटांतच, तुमचे अॅप डाउनलोड किंवा शेअर करण्यासाठी तयार होते. (फोटो सौजन्य – Pinterest)
आज असे अनेक AI प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत, जे अॅप तयार करण्यासाठी मदत करतात. हे अॅप “No Code App Builder” या नावाने ओळखले जातात. जसे Appy Pie, Glide, Adalo, Bubble, Thunkable, आणि Zoho Creator. या टूल्समध्ये युजर्सना ड्रॅग आणि ड्रॉप इंटरफेस मिळतो. म्हणजेच तुम्ही कोणत्याही प्रोग्रामिंग भाषेशिवाय फक्त माऊसने घटक जोडून अॅप डिझाइन करू शकता. या टूल्समधील AI तुमची कल्पना समजून घेते आणि सर्वात योग्य डिझाइन आणि कार्यक्षमता सुचवते. उदाहरणार्थ, जर तुम्हाला तुमच्या अॅपने पेमेंट स्वीकारायचे असेल, तर AI आपोआप पेमेंट गेटवे जोडते.
जेव्हा तुमचा अॅप तयार होईल, तेव्हा तुमच्यासाठी कमाईचे अनेक रस्ते उघडणार आहेत. तुम्ही तुमचे अॅप गुगल प्ले स्टोअर किंवा अॅपल अॅप स्टोअरवर लाँच करू शकते. त्यानंतर तुम्ही अॅपमधील जाहिराती, प्रीमियम सबस्क्रिप्शन किंवा सशुल्क डाउनलोडद्वारे पैसे कमवू शकता. याशिवाय असे अनेक लोकं आहेत जे त्यांचं अॅप विकून देखील लाखो रुपयांची कमाई करतात. उदारहणार्थ, जर तुम्ही एखाद्या रेस्टॉरंट किंवा शाळेसाठी कस्टम अॅप तयार केले तर तुम्ही त्यासाठी 50,000 ते 2 लाख रुपयांपर्यंत शुल्क आकारू शकता.
AI-आधारित अॅप बिल्डर्स छोटे व्यापारी आणि स्टार्टअप्ससाठी कोणत्याही वरदानापेक्षा कमी नाहीत. ज्या लोकांकडे डेवलपर टीम किंवा बजेट नाही, त्यांना स्वत:च्या ब्रँडसाठी अॅप तयार करायचा आहे, त्यांच्यासाठी AI फायदेशीर ठरणार आहे.






