Garmin Fenix 8 Pro: LTE आणि सॅटेलाईट कनेक्टिव्हिटी.... असे आहेत Garmin च्या नव्या स्मार्टवॉचचे फीचर्स, किंमत वाचून उडतील होश
Garmin ने अमेरिकेत Fenix 8 Pro लाँच केले आहे. हे एक प्रिमियम रेंजमधील स्मार्टवॉच आहे. या स्मार्टवॉचची किंमत लाखोंच्या घरात आहे. या डिव्हाईसमध्ये असं फीचर आहे, ज्याच्या मदतीने स्मार्टवॉच स्वत:च वॉईस कॉल्स आणि टेक्स्ट मेसेज हँडल करू शकते, यासाठी वॉचला फोन कनेक्ट करण्याची देखील गरज नाही. हे थेट LTE द्वारे लाइव्हट्रॅक लोकेशन शेअरिंग आणि हवामान अपडेट्स देखील प्रदान करते. म्हणजेच हे स्मार्टवॉच पूर्णपणे स्वतंत्र आहे. याशिवाय या वॉचमध्ये Garmin च्या InReach सर्विसद्वारे ऑन-रिस्ट सैटेलाइट कम्युनिकेशनचा देखील सपोर्ट देण्यात आला आहे.
Garmin Fenix 8 Pro ची सुरुवातीची किंमत 1,199.99 डॉलर्स म्हणजेच सुमारे 1,05,800 रुपये आहे. ही किंमत घड्याळाच्या 47mm AMOLED व्हेरिअंटसाठी आहे. तर डिव्हाईसच्या 51mm MicroLED ची किंमत 1,999.99 डॉलर्स म्हणजेच सुमारे 1,76,300 रुपये आहे. 8 सप्टेंबरपासून या डिव्हाईसची विक्री सुरु होणार आहे. (फोटो सौजन्य – X)
Garmin Fenix 8 Pro AMOLED वर्जन 47mm आणि 51mm या दोन आकारात लाँच करण्यात आले आहे. MicroLED वर्जन केवळ 51mm आकारात उपलब्ध असणार आहे. AMOLED वर्जनमध्ये 27 दिवसांपर्यंत चालणारी बॅटरी लाईफ देण्यात आली आहे. तर MicroLED वर्जनमध्ये 10 दिवसांपर्यंत चालणारी बॅटरी लाईफ देण्यात आली आहे.
Garmin Fenix 8 Pro चा MicroLED डिस्प्ले 4,00,000 हून अधिक LEDs चा वापर करते आणि 4,500 निट्स ब्राईटनेस ऑफर करते. ज्यामुळे ते कंपनीचे आतापर्यंतचे सर्वात तेजस्वी स्मार्टवॉच बनले आहे. यामध्ये डिटेल आणि कलर्स अधिक वाइब्रेंट दिसतात. 51mm मॉडल्समध्ये 1.4-इंच डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्यामध्ये 454×454 पिक्सेल्स रेजोल्यूशन आहे. या मॉडेलमध्ये ऑलवेज-ऑन डिस्प्ले मोड देखील देण्यात आला आहे. स्मार्टवॉचमध्ये LTE आणि सॅटेलाइट कनेक्टिविटी देण्यात आली आहे. ज्यामुळे कम्युनिकेशन अधिक सोपं होतं. सॅटेलाइट सपोर्टद्वारे यूजर्स गार्मिन मेसेंजरद्वारे लोकेशन चेक-इन आणि टेक्स्ट मेसेज पाठवण्याची परवानगी देतो. LTE द्वारे Garmin Fenix 8 Pro च्या मदतीने Garmin Messenger संपर्काना व्हॉईस कॉल केला जाऊ शकतो.
LTE लाइव्हट्रॅक शेअरिंग, रिअल-टाइम हवामान अपडेट्स आणि गार्मिन रिस्पॉन्स इमरजेंसी असिस्टेंस देखील सक्षम करते, ज्यामुळे ते कनेक्टिव्हिटी आणि सुरक्षिततेसाठी एक विश्वसनीय टूल बनते. Garmin Fenix 8 Pro मध्ये कंपनीच्या संपूर्ण रेंजमधील परफॉर्मेंस, नेव्हिगेशन, आरोग्य, निरोगीपणा आणि कनेक्टेड फीचर्स समाविष्ट आहेत. यात एंडुरेंस स्कोर, हिल स्कोर, डेली सजेस्टेड वर्कआउट्स, प्रीलोडेड TopoActive मॅप्स आणि डायनॅमिक राउंड-ट्रिप रूटिंग सारखी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. याशिवाय वॉचमध्ये Garmin ECG ऐप, स्लीप कोच, Garmin Pay, सेफ्टी आणि ट्रॅकिंग फीचर्स देखील आहेत.