BGMI खेळण्याची मजा आणखी वाढणार, 4.0 Update रिलीज डेटवरून उठला पडदा! नव्या फीचर्स आणि थीमसह होणार एंट्री
तुम्ही देखील पॉपुलर बॅटलरॉयल गेम बॅटलग्राउंड्स मोबाइल इंडिया (BGMI) प्लेअर आहात का? मग नक्कीच तुम्ही गेममधील आगामी अपडेटची वाट बघत असणार… सर्व बॅटलग्राउंड्स मोबाइल इंडिया प्लेअर्सससाठी एक महत्त्वाची बातमी आहे. गेमच्या आगामी अपडेटची तारीख आता समोर आली आहे. येत्या काहीच दिवसांत म्हणजेच 11 सप्टेंबर रोजी BGMI 4.0 Update रिलीज केलं जाणार आहे. आगामी अपडेट BGMI यूजर्सचा गेमिंग एक्सपीरियंस पूर्णपणे बदलणार आहे. आगामी अपडेटमध्ये कंपनीने अनेक बदल केले आहेत.
BGMI गेमचे डेवलपर क्राफ्टन वेळोवेळी त्यांच्या प्लेअर्ससाठी नवीन अपडेट रिलीज करत असते. आता देखील कंपनी लवकरच नवीन अपडेट रिलीज करणार आहे. या अपडेटमुळे गेममध्ये अनेक बदल केले जाणार आहेत, तसेच यामुळे प्लेअर्सचा अनुभव देखील पूर्णपणे बदलणार आहे. आता आम्ही तुम्हाला आगामी अपडेटमधील नवीन गाड्या, वेपन, आउटफिट आणि मॅपसह अपडेटमधील ईव्हेंट्सबद्दल माहिती देणार आहोत.(फोटो सौजन्य – pinterest)
क्रॉफ्टन 11 सप्टेंबर रोजी BGMI 4.0 अपडेट रिलीज करणार आहे. हे अपडेट भारतात संध्याकाळी 7 वाजता डाऊनलोड केले जाऊ शकते. BGMI 4.0 अपडेट सर्वात आधी अँड्रॉईड युजर्ससाठी रिलीज केले जाणार आहे. यानंतर हे अपडेट iOS यूजर्ससाठी रिलीज केलं जाणार आहे. तसेच युजर्स बीजीएमआईच्या वेबसाइटवरून देखील हे अपडेट डाऊनोड करू शकतात.
क्रॉफ्टन प्रत्येक अपडेटसह बीजीएमआई प्लेअर्ससाठी नवीन अनुभव देखील घेऊन येत असते. यावेळी कंपनी बीजीएमआईला Spooky Soiree थीम ऑफर करणार आहे. या थीमसह प्लेअर्सना गेममध्ये अनेक बदल पाहायला मिळणार आहेत. रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, या गेममध्ये तुम्हाला रथमूर मॅन्शन नावाची एक मोठी हवेली देखील मिळेल. ती थोडी वेगळी आहे आणि त्याची रचना अनोखी आहे. त्यात एक भूलभुलैया देखील आहे. यासोबतच, या हवेलीमध्ये एक जादुई आरसा देखील दिला जाईल.
OpenAI ची भारतात होणार एंट्री, या शहरात सुरु करणार ऑफीस! हायरिंग झाली सुरु, CEO अल्टमॅन म्हणला….
एवढंच नाही तर बंगल्यात प्लेअर्सना महागड्या लूटसह भूत देखील मिळणार आहेत. जर प्लेअर्सनी भूताला मुक्त केले तर हवामान बदलते. नवीन अपडेटमध्ये, प्लेअर्सना हॅरी पॉटरसारखा जादुई झाडू देखील मिळेल. या झाडूमध्ये दोन प्लेअर्स बसून प्रवास करू शकतात. प्लेअर्स जेव्हा गरज पडेल तेव्हा या झाडूला बोलावू शकतात. या सर्व अपडेटमुळे असा अंदाज लावला जाऊ शकतो की गेमचा अनुभव पूर्णपणे बदलणार आहे. त्यामुळे गेम खेळताना प्लेअर्सना पूर्वापेक्षा आणखी मजा येणार आहे.
BGMI गेमच्या ऑरिजनल PUBG Mobile साठी क्राफ्टन PUBG 4.0 Update आधीच रिलीज करण्यात आले आहे. या अपडेटमध्ये प्लेअर्सना Spooky Soiree थीम देण्यात आली आहे. भारतात PUBG मोबाईल गेमवर बंदी घातल्यानंतर BGMI लाँच करण्यात आला. भारतात बंदी असल्याने प्लेयर्स तो खेळू शकत नाहीत.