Google I/O 2025: ईव्हेंटमध्ये झाली Beam ची घोषणा, 3D व्हिडीओ कॉन्फरन्सिंगचं स्वप्न लवकरच सत्यात उतरणार
Google I/O 2025 मध्ये कंपनीने एक नवीन टूल सादर केलं आहे. या नवीन टूलच्या मदतीने 3डी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगचं स्वप्न आता प्रत्यक्षात उतरणार आहे. कंपनीने या ईव्हेंटमध्ये Beam टूल लाँच केलं आहे. Beam हे एक 3D व्हिडीओ कॉन्फरन्सिंग सिस्टम आहे. हे नवीन टूल युजर्सच्या वर्चुअल बोलण्याला रियल-लाइफ मीटिंग्सप्रमाणे आकार देते. यापूर्वी देखील हे टूल युजर्ससाठी उपलब्ध होते. मात्र तेव्हा ते Project Starline नावाने ओळखले जात होते. मात्र आता नवीन अपडेटेड टूल Beam नावाने ओखळलं जाणार आहे.
Beam आता वर्कप्लेस मोडमध्ये देखील सादर करण्यात येणार आहे. हे AI, 3D इमेजिंग आणि स्पेशल डिस्प्लेजचा वापर करते. या
फीचर्समुळे जरी लोकं तुमच्यापासून दूर असले तरी ते तुम्हाला तुमच्या समोर असल्याचा आभास होतो. याचा अनुभव घेण्यासाठी तुम्हाला हेडसेट्स किंवा ग्लासेसची देखील गरज नाही. कंपनीने अपडेट केलेल्या या नवीन टूलचा उद्देश नॅचुरल आय कॉन्टॅक्ट, जेस्चर्स आणि फेस-टू-फेस चॅट असा आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
Beam साधारणा व्हिडीओला AI च्या मदतीने 3D इमेजमध्ये बदलतो. हा व्हिडीओ युजर्स वेगवेगळ्या अँगलने पाहिला जाऊ शकतो. याच्या मदतीने लोकं नॅचुरल पद्धतीने एकमेकांसोबत जोडले जाऊ शकतात. जसे की ते छोटे एक्सप्रेशन्स, व्हॉइस टोन आणि बॉडी लँग्वेजला कॅप्चर करतो, जे सामान्य व्हिडीओ कॉल्समध्ये वगळले जाते. हे प्लॅटफॉर्म Google Cloud वर चालतो आणि विद्यमान बिझनेसच्या साधनांसह कार्य करते.
गूगल HP सह मिळून Beam ला ऑफिसेसमध्ये आणलं जात आहे. या वर्षाच्या शेवटपर्यंत कंपनी पहिले Beam डिव्हाईस लाँच करणार आहे. हे डिव्हाईस येणाऱ्या InfoComm ईव्हेंटमध्ये सादर केलं जाणार आहे. गूगल Beam ला Google Meet आणि Zoom सारख्या कॉमन व्हिडीओ प्लॅटफॉर्म्ससह काम करण्याची योजना बनवत आहे. यामुळे टीम सॉफ्टवेअर बदलल्याशिवाय Beam कॉल्स जॉइन करू शकणार आहे.
याशिवाय गूगल Zoom, Diversified आणि AVI-SPL सारख्या कंपन्यासह Beam ला आणखी ऑर्गनाइजेशन्सपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत केली जाणार आहे. Deloitte, Salesforce, Citadel, NEC, Hackensack Meridian Health आणि Duolingo सारख्या नावाजलेल्या कंपन्या आधीपासून या टूल्सची चाचणी करत आहेत. Deloitte Consulting चे मॅनेजिंग डायरेक्टर Angel Ayala यांनी सांगितलं आहे की, Beam केवळ एक टेक्नोलॉजिकल ब्रेकथ्रू नाही तर कनेक्शनची एक नवीन पद्धत आहे.
एवढंच नाही तर गूगल त्यांच्या व्हिडीओ सर्विसमध्ये एक लाईव्ह स्पीच ट्रांसलेशन देखील जोडणार आहे. Google Meet मध्ये हे फीचर सध्या सुरु केलं जाणार असून ते लवकरच भविष्यात Beam साठी देखील आणलं जाणार आहे. हे फीचर वेगवेगळ्या भाषांमध्ये बोलण्याची परवानगी देते, ज्यामध्ये रियल-टाइम ट्रांसलेशन्स ओरिजिनल व्हॉईस आणि टोनला कायम ठेवलं जातं. यामध्ये इंटरनेशनल मीटिंग्स अधिका पर्सनल आणि क्लियर होतात. Beam च्या मदतीने गूगल व्हिडीओ कॉल्स अधिक रिअल बनते. जगभरातील व्यवसायांमध्ये Beam ची उपलब्धता वाढत असताना येत्या काही महिन्यांत त्यात अधिक अपडेट्स अपेक्षित आहेत.