Google I/O 2025: ईव्हेंटमध्ये अॅडव्हान्स AI इमेज आणि व्हिडिओ जनरेशन टूल्स केले सादर, आता ऑटोमॅटिकली जनरेट होणार ऑडिओ
टेक जायंट कंपनीच्या 2025 च्या सर्वात मोठ्या ईव्हेंटला सुरुवात झाली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही कंपनीने Google I/O 2025 ईव्हेंटचे आयोजन केले आहे. यंदा आयोजित करण्यात आलेल्या Google I/O 2025 कीनोटमध्ये अनेक नवीन टूल्स आणि सॉफ्टवेअर जगासमोर सादर करण्यात आले आहेत. कंपनीने आतापर्यंतचे सर्वात अॅडव्हान्स AI इमेज आणि व्हिडिओ जनरेशन टूल्स या ईव्हेंटमध्ये सादर केलं आहे. इमेज जेनरेशनसाठी Imagen 4 आणि व्हिडीओ जेनरेशनसाठी Veo 3। हे नवीन AI मॉडल्स टेक्स्ट किंवा इमेज प्रॉम्प्ट्सच्या आधारावर शॉर्ट वीडियो क्लिप्स आणि इमेज जनरेट करू शकणार आहेत.
ट्रॅवल व्लॉगर ज्योती मल्होत्रा करत होती या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर, पोलीस तपासात समोर आलं सत्य
व्हिडीओसोबतच, Veo 3 त्याच्या क्लिप्समध्ये ऑटोमॅटिक आणि रिलेवेंट ऑडियो देखील जनरेट करू शकणार आहे. कंपनीने म्हटलं आहे की, Veo 3 आत्ताचे लेटेस्ट व्हिडीओ जेनरेशन मॉडेल आहे, जो टेक्स्ट किंवा इमेज प्रॉम्प्ट्सच्या मदतीने शॉर्ट व्हिडीओ क्लिप्स तयार करू शकतो. कंपनीने सांगितलं आहे की, Veo 3 मॉडल मोशन, एनवायरनमेंटल इंटरॅक्शन आणि सीन कंसिस्टेंसीला अधिक चांगल्या पद्धतीने हँडल करू शकतो. ज्यामुळे व्हिडीओ अधिक वास्तववादी वाटू लागतो. (फोटो सौजन्य – X)
कंपनीने दिलेल्या माहितीनुासर, Veo 3 आता US मध्ये Google AI Ultra प्लॅन सब्सक्राइबर्ससाठी बीटामध्ये उपलब्ध आहे. हे टूल युजर्स Gemini अॅप आणि गूगल च्या AI फिल्ममेकिंग प्लॅटफॉर्म Flow च्या मदतीने अॅक्सेस करू शकतात. हे टूल I/O मध्ये देखील सादर करण्यात आलं आहे. एंटरप्राइज अॅक्सेस Vertex AI च्या मदतीने केले जाऊ शकते. यासोबतच कंपनीने आधीच्या जेनरेशन Veo 2 मध्ये साठी देखील काही अपडेट्स सादर केले आहेत. या अपडेट्मध्ये रेफरेंस इनपुट्स, कॅमेरा कंट्रोल्स, आउटपेंटिंग आणि ऑब्जेक्ट अॅड आणि रिमूव यांचा समावेश आहे.
रेफरेंस इनपुट्स: यूजर्स आता लोकं, ऑब्जेक्ट्स किंवा स्टाइल्सच्या इमेज अपलोड करून सीनमध्ये कंसिस्टेंसी ठेऊ शकतात.
कॅमरा कंट्रोल्स: नव्या मॉडेलमध्ये पॅन, झूम आणि रोटेट सारखे ऑप्शन्स देण्यात आले आहेत. ज्याला प्रॉम्प्टमध्ये डिफाइन केलं जाऊ शकतं.
आउटपेंटिंग: व्हिडिओ मूळ फ्रेमच्या पलीकडे देखील वाढवता येतो, जो फॉरमॅट एडजस्ट करताना उपयुक्त ठरतो.
ऑब्जेक्ट अॅड आणि रिमूव: Veo 2 मॉडेल यूजर्सना फ्रेम्समध्ये ऑब्जेक्ट्स जोडण्याची आणि हटवण्याची सुविधा देण्यात आली आहे. मॉडेल लाइटिंग आणि शॅडोजला कंसिस्टेंट ठेवतो.
व्हिडीओ AI मॉडेलसह, गूगलने नवीन AI इमेज जेनरेटर देखील सादर केलं आहे, या टूलचं नाव Imagen 4 आहे. नवीन मॉडेल 2K रेजोल्यूशनला सपोर्ट करताे, ज्यामध्ये फॅब्रिक टेक्सचर्स, रिफ्लेक्शन्स आणि फर सारखे डिटेल्स अधिक चांगल्या पद्धतीने हँडल केले जाऊ शकतात. Imagen 4 ची खासियत अशी आहे की, हे इमेजमध्ये टेक्स्टला हँडल करू शकते. म्हणजेच अचूक स्पेलिंग – कस्टम टायपोग्राफीसह पोस्टर्स, स्लाईड्स किंवा कार्ड तयार करण्यासाठी ते उपयुक्त बनते.