Google I/O 2025: Gemini 2.5 मध्ये झाला मोठा बदल! AI ला मिळाला मानवी अंदाज आणि Deep Think ची ताकद
Google I/O 2025 ईव्हेंट काल 20 मे आणि आज 21 मे अशा दोन दिवसांसाठी आयोजित करण्यात आला आहे. या ईव्हेंटमध्ये कंपनीने आतापर्यंत अनेक टूल्स सादर केले आहेत. कंपनीने घोषणा केली होती की, या ईव्हेंटनंतर युजर्सचा अनुभव पूर्णपणे बदलणार आहे. कारण नवीन टूल्स युजर्सना मजेदार आणि अधिक चांगला अनुभव देण्यासाठी तयार करण्यात आले आहेत. ईव्हेंटमध्ये सादर करण्यात आलेले काही टूल्स येत्या महिन्यात युजर्ससाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत. तर काही टूल्स या वर्षाच्या अखेरीस युजर्ससाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
कंपनीने आतापर्यंत ईव्हेंटमध्ये सादर केलेल्या अपडेट्स आणि टूल्समध्ये आता आणखी एक नवीन अपडेट जोडलं जात आहे. कंपनीने या ईव्हेंटमध्ये Gemini 2.5 AI साठी देखील नवीन अपडेट आणले आहेत. आयोजित करण्यात आलेल्या Google I/O 2025 ईव्हेंटमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजेंस मॉडेल Gemini 2.5 साठी अनेक तगड्या फीचर्सची घोषणा करण्यात आली आहे. टेक दिग्गजने चॅटबॉटसाठी एक ऑल न्यू Deep Think नावाचे एक अॅडवांस रीजनिंग मोड सादर केलं आहे, जे Gemini 2.5 Pro मॉडेलसाठी लवकरच लाँच केलं जाणार आहे. या फीचरला ChatGPT च्या ‘Think For Longer’ फीचर्स प्रमाणे समजले जाऊ शकते. कंपनी त्यांच्या प्रतिस्पर्धी ChatGPT सोबत स्पर्धा करण्यासाठी हे नवीन फीचर लाँच करण्याच्या तयारीत आहे, असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. (फोटो सौजन्य – Pinterest)
एवढंच नाही तर कंपनीने Gemini मॉडेलमध्ये नेटिव्ह ऑडियो आउटपुट फीचर देखील जोडलं आहे. ही एक नवीन आणि अॅडवांस टेक्नोलॉजी आहे, जी AI ला अधिक नॅच्युरल आणि माणसांप्रमाणे बोलण्याची ताकद देतात. हे फीचर लाईव्ह API द्वारे उपलब्ध केलं जाणार आहे. विशेष म्हणजे या नवीन फीचरमध्ये युजर्स त्यांच्या पद्धतीने टोन, प्रोनन्सिएशन आणि स्टाइलवर नियंत्रण ठेऊ शकणार आहेत.
यासोबतच कंपनी गूगल डेव्हलपर्ससाठी देखील नवीन कॅपेबिलिटीज घेऊन आली आहे. यामध्ये कंपनीने थॉट समरी असं एक फीचर जोडलं आहे. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर, आता एआय मॉडेल प्रत्येक उत्तरासह त्याच्या विचार प्रक्रियेचा तपशीलवार सारांश दर्शवेल. एवढंच नाही तर गुगलने नुकतेच Gemini 2.5 Pro चे एक अपडेटेड वर्जन सादर केलं आहे, ज्यामध्ये अधिक चांगली कोडिंग कॅपेबिलिटीज देण्यात आली आहे. हे मॉडेल WebDev Arena आणि LMArena सारख्या बेंचमार्क लीडरबोर्ड्समध्ये टॉपवर होते.
नवं Deep Think मोड Gemini 2.5 Pro ला कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी अनेक बाबतीत विचार करण्याची क्षमता देत आहे. कंपनीचं असं म्हणणं आहे की, जुन्या मॉडेल्सच्या तुलनेत नवीन रिसर्च टेक्नोलॉजीचा वापर अधिक फायदेशीर ठरणार आहे. चाचणी दरम्यान, हे देखील उघड झाले की Gemini 2.5 Pro ने 2025 UAMO सारख्या कठीण मॅथ्स बेंचमार्कवर 49.4 टक्के गुण मिळवले.