Mahakumbh ला जायचं पण ट्रॅफीकची चिंता? अहो, Google Maps आहे ना! या ट्रीकने प्रवास होईल मजेदार
प्रयागराजमध्ये महाकुंभ सुरु झाला आहे. पुढील काही दिवसांतच या महाकुंभाची सांगता होणार आहे. प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यात जगभरातून लाखो भाविक दाखल झाले आहेत. असा अहवाल समोर आला होता की सुमारे 40 कोटी भाविकांनी यंदा महाकुंभाला उपस्थित लावली आहे. काही भाविक ट्रेनने आले आहेत तर काही त्यांच्या गाडीने. मोठ्या संख्येने भाविक आणि त्यांच्या गाड्यांमुळे अनेक राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे.
विशेषतः मध्य प्रदेशातील जबलपूर, कटनी आणि सिवनी जिल्ह्यांमध्ये वाहतुकीवर वाईट परिणाम झाला आहे, कारण हे जिल्हे प्रयागराजजवळ आहेत. वृत्तानुसार, रेवा-जबलपूर महामार्ग पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. हा जाम सुमारे 500 किलोमीटर लांब असल्याचे म्हटले जाते, जो जगातील सर्वात लांब ट्रॅफिक जामपैकी एक मानला जातो. हजारो वाहने रस्त्यावर अडकली आहेत, त्यामुळे लोकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
वाहतुक कोंडीमुळे भाविकांना महाकुंभाला पोहोचण्यासाठी बराच वेळ लागत आहे. त्यामुळे भाविकांना मोठ्या प्रमाणात समस्यांचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत तुम्ही देखील तुमच्या गाडीने महाकुंभाला जाण्याचा विचार करत असाल तर तुम्ही गुगल मॅपची मदत घेऊ शकता. गुगल मॅपच्या मदतीने तुमचा प्रवास अधिक सोपा आणि मजेदार होऊ शकणार आहे.
जर तुम्हीही महाकुंभमेळ्यासाठी प्रयागराजला जाण्याचा विचार करत असाल तर वाहतुकीच्या परिस्थितीची आधीच माहिती घ्या. यामुळे तुम्हाला लांब ट्रॅफिक जाममध्ये अडकणे आणि यासारख्या इतर समस्या टाळण्यासाठी मदत होईल. महाकुंभला जाण्यासाठी तुम्ही गुगल मॅप्स वापरू शकता, जे तुम्हाला रिअल-टाइम ट्रॅफिक अपडेट्स आणि पर्यायी मार्गांबद्दल माहिती देईल.
गुगल मॅप्स अँड्रॉइड आणि आयओएस दोन्ही उपकरणांवर उपलब्ध आहे. हे तुम्हाला रस्त्यावरील सध्याच्या रहदारीच्या परिस्थितीबद्दल माहिती देईल आणि सर्वात जलद मार्ग शोधण्यात मदत करेल. याद्वारे तुम्ही तुमच्या प्रवासाची नेमकी वेळ देखील ठरवू शकता.
प्रवासाला निघण्यापूर्वी गूगल मॅप्सवरून ट्रॅफीक अपडेट जाणून घ्या, ज्यामुळे तुम्हाला या प्रवासासाठी किती वेळ करावा लागणार आहे आणि कुठे ट्रॅफीकचा सामना करावा लागणार आहे, याबद्दल माहिती मिळणार आहे.
गुगल मॅप्समधील ट्रॅफिक आयकॉन (चौकोनी ट्रॅफिक बटण) वर क्लिक करून तुम्ही ही सर्व माहिती पाहू शकता. यामुळे तुम्हाला तुमचा प्रवास अधिक चांगल्या प्रकारे प्लॅन करण्यास मदत होईल आणि तुम्ही अनावश्यक त्रास टाळू शकाल.