Flipkart Big Billion Days Sale 2025: अशी डील पुन्हा मिळणार नाही! 68000 रुपयांच्या डिस्काऊंटसह खरेदी करा फोल्डवाला स्मार्टफोन
ई कॉमर्स प्लॅटफॉर्म Flipkart चा पॉपुलर Big Billion Days Sale आता लाईव्ह आहे. प्रत्येक सेलप्रमाणेच या सेलमध्ये देखील स्मार्टफोन्सवर मोठ्या ऑफर्स उपलब्ध आहेत. या ऑफर्ससह नवीन स्मार्टफोन खरेदी केल्यास ग्राहकांचा मोठा फायदा होणार आहे. फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये प्रीमियम स्मार्टफोन्सवर देखील मोठं डिस्काऊंट ऑफर केलं जात आहे. त्यामुळे या प्रिमियम स्मार्टफोनच्या किंमती देखील बऱ्याच कमी झाल्या आहेत. आता आम्ही तुम्हाला अशाच एका डिलबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये प्रिमियम स्मार्टफोनची किंमत हजारो रुपयांनी कमी झाली आहे. तुम्ही एक प्रीमियम फोल्डेबल स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर अशी संधी पुन्हा मिळणं कठीण आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
फ्लिपकार्ट बिग बिलीयन डेज सेलमध्ये Google Pixel 9 Pro Fold या प्रिमियम स्मार्टफोनवर आतापर्यंतच सर्वात मोठं डिस्काऊंट ऑफर केलं जात आहे. कंपनीने Google Pixel 9 Pro Fold स्मार्टफोन भारतात 1,72,999 रुपयांच्या किंमतीत लाँच केला होता. मात्र आता फ्लिपकार्ट बिग बिलीयन डेज सेलमध्ये हा स्मार्टफोन केवल 1,14,999 रुपयांना उपलब्ध आहे. म्हणजेच या स्मार्टफोनवर फ्लॅट 58,000 रुपयांचे डिस्काऊंट दिलं जात आहे. तसेच ICICI Bank क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास ग्राहकांना आणखी 10,000 रुपयांचे डिस्काऊंट मिळणार आहे. या स्मार्टफोनच्या खरेदीवर एकूण 68,000 रुपयांचे डिस्काऊंट दिले जात आहे. जर जुना स्मार्टफोन एक्सचेंज केला तर स्मार्टफोनची किंमत आणखी कमी होऊ शकते.
Google Pixel 9 Pro Fold एक प्रीमियम बुक-स्टाइल फोल्डेबल स्मार्टफोन आहे. यामध्ये 6.3 इंचाचा OLED कवर डिस्प्ले देण्यात आला आहे, ,ज्याचे रेजॉल्यूशन 1080×2424 पिक्सेल आणि रिफ्रेश रेट 120Hz आहे. स्क्रीनच्या मजबूतीसाठी डिव्हाईसमध्ये Gorilla Glass Victus 2 प्रोटेक्शन देण्यात आले आहे. त्याचा मुख्य 8-इंचाचा LTPO OLED फोल्डेबल डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट आणि 2700निट्स पीक ब्राइटनेसला देखील सपोर्ट करतो.
फोनला पावर देण्यासाठी यामध्ये Google Tensor G4 चिपसेट देण्यात आला आहे. फोनच्या बॅटरीबद्दल बोलायचं झालं तर यामध्ये 4650mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 45W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. यामध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. ज्यामध्ये 48MP मेन सेंसर (OIS सपोर्टसह), 10.5MP अल्ट्रा-वाइड लेंस, 10.8MP टेलीफोटो लेंस आहे. तसेच यामध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी आत आणि बाहेर दोन्ही डिस्प्लेवर10MP फ्रंट कॅमेरा आहे. या स्मार्टफोनमध्ये या फोनमध्ये अॅड मी, ऑटो फ्रेम, मॅजिक लिस्ट, पिक्सेल स्टुडिओ आणि क्लिअर कॉलिंग सारख्या अनेक एआय-संचालित वैशिष्ट्यांसह येते, ज्यामुळे तो आणखी स्मार्ट बनतो.