Realme 15x 5G: सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणाऱ्या किंमतीत भारतात आला Realme चा तगडा स्मार्टफोन, 50MP कॅमेऱ्याने सुसज्ज
Realme ने भारतात एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. हा स्मार्टफोन सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये आहे. कंपनीने दसऱ्याच्या मुहूर्तावर भारतात Realme 15x 5G हा नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीने लाँच केलेल्या या नवीन स्मार्टफोनची किंमत 20 हजारांहून कमी आहे. सध्या हा स्मार्टफोन कंपनीची वेबसाईट आणि इतर ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर खरेदीसाठी उपलब्ध आहे. कंपनीने हा नवीन बजेट स्मार्टफोन वेगवेगळ्या स्टोरेज ऑप्शंसमध्ये सादर केला आहे. या डिव्हाईसची जाडी 8.28mm आहे आणि हा स्मार्टफोन मीडियाटेक चिपसेट आणि अँड्रॉइड 15 ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित आहे.
Realme 15x 5G हा स्मार्टफोन 6GB रॅम + 128GB स्टोरेज, 8GB रॅम + 128GB स्टोरेज आणि 8GB रॅम + 256GB स्टोरेज या तीन व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनच्या 6GB रॅम + 128GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 16,999 रुपये, 8GB रॅम + 128GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 17,999 रुपये आणि 8GB रॅम + 256GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 19,999 रुपये आहे. (फोटो सौजन्य – X)
कंपनी या स्मार्टफोनच्या खरेदीवर खास बँक ऑफर्स देखील देत आहे. म्हणजेच UPI किंवा क्रेडिट आणि डेबिट कार्डद्वारे खरेदी केल्यास 1,000 रुपयांचे डिस्काऊंट मिळणार आहे. यासोबतच डिव्हाईसवर सहा महिन्यांचा नो कॉस्ट ईएमआय आणि 3,000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस देखील दिला जात आहे. Realme 15x 5G सध्या भारतात कंपनीच्या वेबसाइट आणि फ्लिपकार्टवर अॅक्वा ब्लू, मरीन ब्लू आणि मरून रेड रंगांमध्ये उपलब्ध आहे.
स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर, कंपनीच्या रियलमी डिव्हाईसमध्ये 6.8 इंचाचा सनलाइट डिस्प्ले देण्यात आला आहे, जो एक HD+ डिस्प्ले आहे. डिव्हाईसमध्ये 144hz पर्यंत रिफ्रेश रेट आणि 1200 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस देण्यात आले आहे. हे डिव्हाईस Android 15 बेस्ड Realme UI 6.0 वर चालते. फोनमध्ये आई प्रोटेक्शन मोड, स्लीप मोड, स्क्रीन रिफ्रेश रेट स्विचिंग आणि स्क्रीन कलर टेम्परेचर एडजस्टमेंट सारखे फीचर्स देखील आहे.
Realme 15x launched in India 🇮🇳 at Rs 16,999. Key specs:
– 7,000mAh battery
– MediaTek Dimensity 6300
– 50MP cameras
– 144Hz display pic.twitter.com/TtkfJGw6xw — Harshit Gangyan (@yantra_verse) October 1, 2025
फोनला पावर देण्यासाठी 6nm वर बेस्ड ऑक्टा-कोर मीडियाटेक 6300 प्रोसेसर देण्यात आला आहे. डिव्हाईसमध्ये ARM माली-G57 MC2 GPU देखील देण्यात आला आहे. एवढंच नाही तर फोनमध्ये 400 परसेंट अल्ट्रा वॉल्यूम ऑडियो, AI कॉल नॉइज रिडक्शन 2.0 आणि AI आउटडोर मोड आहे. फोनमध्ये IP69 रेटिंग आहे.
डिव्हाईसमध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप आहे. डिव्हाईसमध्ये f/1.8 अपर्चर वाला 50-मेगापिक्सेलचा Sony IMX852 AI कॅमेरा आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये 50-मेगापिक्सेलचा OmniVision OV50D40 कॅमेरा आहे. याशिवाय, डिव्हाइसमध्ये 60W SuperVOOC वायर्ड फास्ट चार्जिंग आणि 7,000mAh बॅटरी आहे.