Google Pixel Update: लाँचिंगपूर्वीच लिक झाली Google Pixel 9a ची किंमत! कसा असेल तुमच्या ड्रीम स्मार्टफोनचा कॅमेरा?
Google चा नवीन आणि आगामी स्मार्टफोन लाँच होण्यासाठी अवघे काहीच दिवस शिल्लक आहेत. आगामी Google Pixel 9a स्मार्टफोन मार्चमध्ये लाँच होणार असल्याचं सांगितलं जात आहे. हा स्मार्टफोन 19 मार्च रोजी युरोप आणि अमेरिकेत एकाच वेळी लाँच केला जाईल आणि त्याची विक्री 26 मार्चपासून सुरू अशी अपडेट समोर आली आहे. युरोप आणि अमेरिकेतील लाँचिंगपूर्वीच या आगामी स्मार्टफोनची किंमत आणि इतर काही डिटेल्स समोर आले आहेत.
गुगलने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये Pixel 9 सीरीजमध्ये Pixel 9, Pixel 9 Pro, Pixel 9 Pro XL आणि Pixel 9 Pro Fold हे स्मार्टफोन्स लाँच केले होते. मात्र आता लाँच होणाऱ्या आगामी स्मार्टफोन सिरीजमधील मॉडेलबाबत अद्याप माहिती देण्यात आली नाही. (फोटो सौजन्य – Pinterest)
एका अहवालानुसार, Pixel 9a (128 GB) मॉडेलची युरोपमध्ये किंमत EUR 549 म्हणजेच अंदाजे 50,000 रुपयांपासून सुरू होईल, तर 256GB व्हेरिएंटची किंमत EUR 649 म्हणजेच अंदाजे 58,000 रुपये असू शकते. यूकेमध्ये, हा फोन GBP 499 म्हणजेच अंदाजे 54,000 रुपयांमध्ये उपलब्ध असेल, तर 256GB मॉडेलची किंमत GBP 599 म्हणजेच अंदाजे 65,000 रुपये असेल.
Android Headlines च्या एका अहवालानुसार, अमेरिकेत Pixel 9a (128GB) ची किंमत $499 म्हणजेच अंदाजे 43,200 रुपये आणि 256GB मॉडेलची किंमत $599 म्हणजेच अंदाजे 51,900 रुपये असू शकते. जर एखाद्या वापरकर्त्याने Verizon चे mmWave मॉडेल निवडले तर त्याला अतिरिक्त $50 द्यावे लागतील. भारतात लाँच होताना या स्मार्टफोनच्या किंमती बदलू शकतात. गुगलच्या या नवीन स्मार्टफोनबद्दल वापरकर्त्यांमध्ये खूप उत्साह आहे. आता भारतात त्याची किंमत काय असेल आणि भारतीय बाजारपेठेत त्याला किती लोकप्रियता मिळते हे पाहणे बाकी आहे.
प्रोसेसर: Google Tensor G4
रॅम: 8GB LPDDR5X
स्टोरेज: 128GB / 256GB
सिक्योरिटी: Titan M2 चिप
डिस्प्ले: 6.3-इंच AMOLED, 120Hz रिफ्रेश रेट, Gorilla Glass 3
कॅमेरा: 48MP प्रायमरी सेंसर, 13MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा
बॅटरी: 5,100mAh, 23W वायर्ड चार्जिंग, 7.5W वायरलेस चार्जिंग
वॉटर आणि डस्ट रेजिस्टेंस: IP68
128 जीबी मॉडेल चार रंगांमध्ये उपलब्ध असेल, ज्यामध्ये Iris, Obsidian, Peony, आणि Porcelain यांचा समावेश असणार आहे. तसेच 256GB मॉडेल फक्त Iris आणि Obsidian या रंगात उपलब्ध असेल.
boAt ने लाँच केले बजेट फ्रेंडली ईयरबड्स, प्रिमियम लूक आणि जबदरस्त ऑडियो क्वालिटी केवळ इतक्या किंमतीत
गुगलच्या आगामी Pixel 9a स्मार्टफोनसह, कंपनी युट्यूब प्रीमियम, गुगल वन आणि फिटबिट प्रीमियमचे सबस्क्रिप्शन ऑफर करणार आहे. रिपोर्ट्सनुसार, या फोनसोबत येणाऱ्या गुगल वन प्लॅनमध्ये एआय प्रीमियम फीचर्स येणार नाहीत.