Apple iPhone: आगामी iPhone सिरीजची लाँच डेट लीक! नवीन डिझाईन आणि दमदार फीचर्ससह 'या' महिन्यात करणार एंट्री
सर्व अॅपल युजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. अॅपलची आगामी आयफोन 17 सिरीज ज्याची सर्वजण आतुरतेने प्रतिक्षा करत आहेत, या सिरीजची लाँच डेट आता समोर आली आहे. ही सिरीज सप्टेंबर 2025 मध्ये लाँच केली जाणार आहे. खरं तरं आयफोनच्या अनेक आयफोन सिरिज सप्टेंबरमध्ये लाँच केल्या जातात. त्याचप्रमाणे आता ही नवीन सिरीज देखील यावर्षी सप्टेंबरमध्ये लाँच केली जाणार आहे. लाँच डेट समोर आल्याने आता आयफोन 17 सिरीजबद्दलची उत्सुकता अधिकच वाढली आहे.
अशी माहिती समोर आली आहे की, कंपनी त्यांची आगामी आयफोन सिरीज एका वेगळ्या अंदाजात लाँत करू शकते. या सिरीजचं डिझाईन मागील मॉडेल्सपेक्षा वेगळं असणार आहे. इतकंच नाही तर या आगामी सिरीजमध्ये अनेक अपग्रेड फीचर्स दिले जाणार आहेत, ज्यामुळे आयफोन 17 सिरीज इतर मॉडेल्सपेक्षा खास ठरू शकते. असं सांगितलं जात आहे की, अॅपल त्यांच्या फ्लॅगशिप स्मार्टफोन्समध्ये मोठे अपग्रेड देणार आहे, ज्यामध्ये नवीन डिझाइन, चांगले सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर सुधारणांचा समावेश असेल. (फोटो सौजन्य – Pinterest)
आयफोन 17 सिरीजमध्ये 4 मॉडेल्स लाँच केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये iPhone 17 (स्टँडर्ड मॉडेल), iPhone 17 Pro, iPhone 17 Pro Max आणि iPhone 17 Air यांचा समावेश असणार आहे. या सिरीजमधील iPhone 17 Air हे एक नवीन मॉडेल असणार आहे जे iPhone Plus ची जागा घेऊ शकते. या आगामी आयफोन सिरीजचे काही स्पेसिफकेशन्स देखील समोर आले आहेत. ही सिरीज अनेक अपग्रेड फीचर्ससह लाँच केली जाणार आहे, त्यामुळे त्यामध्ये इतर मॉडेल्सपेक्षा नक्कीच खास फीचर्स समाविष्ट असू शकतात.
आयफोन 17 सिरीजमधील सर्व मॉडेल्समध्ये ओएलईडी डिस्प्ले असेल. iPhone 17 Pro Max मध्ये 6.9-इंच स्क्रीन दिली जाऊ शकते. iPhone 17 Pro मध्ये 6.3-इंच स्क्रीन असण्याची शक्यता आहे. iPhone 17 Air मध्ये 6.6-इंच स्क्रीन असण्याची शक्यता आहे. iPhone 17 च्या स्टँडर्ड मॉडेलमध्ये सर्वात छोटा डिस्प्ले असेल पण हा 120 हर्ट्झ प्रोमोशनला सपोर्ट करणार नाही.
iPhone 17 आणि iPhone 17 Air मध्ये Apple A19 चिपसेट असेल. iPhone 17 Pro आणि Pro Max मध्ये A19 Pro चिपसेट दिला जाईल. Pro मॉडेल्समध्ये 12GB RAM असण्याची अपेक्षा आहे, तर स्टँडर्ड मॉडेल्समध्ये 8GB RAM असण्याची अपेक्षा आहे.
iPhone 17 Pro आणि Pro Max: 48MP ट्रिपल कॅमरा असेल ज्यामध्ये 5x टेलीफोटो झूम लेन्स दिली जाऊ शकते. iPhone 17 आणि 17 Air: 48MP ड्युअल कॅमेरा सेटअप उपलब्ध असेल. यावेळी Apple एक हॉरिजॉन्टल कॅमेरा मॉड्यूल आणू शकते, जे आतापर्यंतच्या त्रिकोणी कॅमेरा डिझाइनपेक्षा वेगळे असेल.
Ambrane ने लाँच केली ‘छोटू’ पॉवर बँक, ऑर्डर करताच 10 मिनिटांत होणार डिलीव्हरी! वाचा स्पेसिफिकेशन्स
iPhone 17 Air हा सर्वात हलका आणि पातळ आयफोन असू शकतो, ज्याची जाडी फक्त 5.5mm असेल. यावेळी Apple iPhone 17 मालिकेत अनेक नवीन बदल आणणार आहे, विशेषतः iPhone 17 Air बद्दल बरीच चर्चा आहे. असे मानले जाते की iPhone 17 Air हा कंपनीचा सर्वात पातळ स्मार्टफोन असणार आहे. याशिवाय, जुन्या मॉडेल्सच्या तुलनेत या डिव्हाइसमध्ये अनेक चांगले फीचर्स दिसतील. तथापि, कंपनीने अद्याप या फोनबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.