
हरवलेली वस्तू शोधणं झालं सोपं! Google ने आणला Pixel Tag, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
गुगल पिक्सेल टॅगची किंमत आणि उपलब्धता
भारतात गुगल पिक्सेल टॅगचा एक पिस ३,७९९ रुपयांना विकला जाणार आहे तर चार पिक्सेल टॅगचा बंच १२,९०० रुपये या किमतीला विकला जाणार आहे. भारतात नोव्हेंबरपासून Google India Online Store मधून याला खरेदी करता येईल. पिक्सेल टॅगला सध्या Fog कलरमध्ये सादर करण्यात आलं आहे. या डिव्हाईससोबत एक वर्षाची व्हाॅरंटी दिली जाणार आहे.
Bluetooth आणि Ultra-Wideband च्या मदतीने सहज शोधता येणार वस्तू
गुगल पिक्सल टॅगमध्ये Bluetooth Channel Sounding आणि Ultra-Wideband कनेक्टीव्हीटी देण्यात आली आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने यूजर आपले हरवलेले सामान फार सहजरित्या शोधून काढू शकते. पिक्सेल टॅगला गुगलच्या फाईंड हबमध्ये इंटीग्रेट करण्यात आलं आहे. यूजर फाईंड हबच्या मदतीने पिक्सल टॅगचे स्थान शोधू शकतात आणि त्याच्या जवळ जाण्यासाठी दिशादर्शक मार्गदर्शनाचा वापर करू शकतात. हा ट्रॅकर गुगल पिक्सेल डिव्हाइसेससोबत ‘फास्ट पेअर’लाही सपोर्ट करतो, ज्यामुळे पिक्सेल फोनसोबत त्याला जोडणे सोपे होते.
स्पीकरचा अलार्म म्हणून वापर करता येणार
गुगल पिक्सेल टॅगमध्ये बिल्ट-इन स्पीकर देण्यात आला आहे. जर तुमचे कोणते सामान हरवले तर तुम्ही पिक्सेल डिव्हाईसमधील Find Hub ॲपच्या मदतीने पिक्सेल टॅगवर दूरस्थपणे अलार्म वाजवू शकतात. याशिवाय पिक्सेल टॅगवर एक बटन देखील देण्यात आलं आहे ज्याच्या मदतीने यूजर आपला हरवलेला फोमे देखील शोधून काढू शकतात. जर पिक्सेल टॅगच्या मदतीने फोनवर अलार्म एक्टिवेट केलं गेलं तर फोन सायलंट मोडवर असला तरी त्यातून आवाज ऐकू येईल ज्यामुळे फोन शोधणे सोपे होईल.
Android 9 आणि नंतरच्या डिव्हाईसमध्ये होणार कनेक्ट
गुगल पिक्सेल टॅग त्या डिव्हाईससोबत काम करतो जो Android 9 आणि त्याच्या नंतरच्या व्हर्जनवर कार्यरत आहे. ट्रॅकरमध्ये Accelerometer देखील देण्यात आले आहे. याची बाॅाडी Polycarbonate आणि मेटलपासून तयार करण्यात आली आहे. गुगल पिक्सेल टॅगचा आकार 28×46.1×5.4mm इतका ठेवण्यात आलाय. वजन याचे साधारण ११.८ किलोग्रॅम इतके असल. याच्या पेबल शेपमुळे डिझाइनमुळे तो बॅग, चाव्या किंवा इतर वस्तूंना सहजपणे लावता येतो.