
तब्बल 20 तासांच्या आउटेजनंतर Microsoft ची क्लाउड सेवा पुन्हा सुरू; कंपनीने दिली महत्त्वाची अपडेट
गेल्या 20 तासांपासून सुरु असलेल्या मायक्रोसॉफ्ट सर्विस आऊटेजमुळे जगभरातील तब्बल 74 देशांमधील बिझनेसवर परिणाम झाला आहे. यामुळे करोडो रुपयांचे नुकसान झाले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. 20 तासांनंतर सेवा पुन्हा पूर्वरत झाल्याची माहिती कंपनीने त्यांच्या एक्स अकाऊंटवर पोस्ट शेअर करत दिली आहे. (फोटो सौजन्य: Pinterest)
We’re seeing continued recovery progress across affected regions, with broader improvements in North America, sustained improvements across much of Europe, and encouraging recovery signals in Asia Pacific. Some users may still experience intermittent access issues or delayed email delivery as mitigation continues across remaining affected infrastructure. Our focus remains on stabilizing recovered infrastructure, completing mitigation in remaining impacted areas, and reducing delayed email queues and backlogs while we validate service consistency across connection methods. A more comprehensive update can be found at MO1550821 in the Microsoft 365 admin center, as well as https://t.co/bVoAAh3D2G if the admin center is not available to you. — Microsoft 365 Status (@MSFT365Status) November 13, 2026
We are deeply sorry for the disruption this incident has caused our customers and partners. We know the trust they place in our services and take that responsibility extremely seriously. We are seeing broad recovery and stability across our services. This was a technical issue not related to cyber or AI / agents. The incident was introduced by an issue during an earlier network capacity upgrade that surfaced following a recent network change. We have addressed the underlying issue and continue to restore service to remaining customers and regions. Given the scale of demand, we restored services gradually, validating stability at each stage. While this took longer, it helped ensure a stable restoration. We will provide a full post-incident report once our review is complete. — Microsoft (@Microsoft) November 13, 2026
मायक्रोसॉफ्टने त्यांच्या अधिकृत एक्स अकाऊंटवर पोस्ट शेअर करत अनेक ठिकाणी सेवा पुन्हा पूर्वरत झाल्याची माहिती दिली आहे, तर काही ठिकाणी रिकव्हरी प्रक्रिया सुरु असल्याचे देखील सांगितलं जात आहे. नॉर्थ अमेरिका, यूरोप आणि एशिया पेसिफिकमध्ये अधिक चांगली सुधारणा पाहायला मिळत आहे. तर काही यूजर्सना अजूनही ईमेल किंवा इतर सेवांचा वापर करण्यात अडचण येत आहे. कारण प्रभावित क्षेत्रांमध्ये ईमेल वितरणाशी संबंधित समस्यांचे निराकरण करण्याचे काम अजूनही सुरू आहे. मायक्रोसॉफ्ट 365 ॲडमिन सेंटरसाठी MO1550821 अपडेट जारी करण्यात आले आहे.
मायक्रोसॉफ्ट क्लाउडमधील आयऊटेजमुळे जगभरातील विविध देशांमध्ये कम्युनिकेशन चेनमध्ये अडथळे निर्माण झाले. कारण विविध देशांमध्ये अधिक बिझिनेसमध्ये मायक्रोसॉफ्टच्या क्लाऊड सर्विसचा वापर केला जातो. तर ऑफीस 365 मध्ये आलेल्या समस्येमुळे ई-मेल कम्युनिकेशन पूर्णपणे ठप्प झाले होते. विशेषत: फिनटेक कंपन्यांनवर याचा सर्वाधिक परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले होते. मायक्रोसॉफ्ट सर्विसमध्ये आलेल्या या समस्येचा परिणाम जगभरातील 74 देशांवर झाला, ज्यामध्ये भारत, आशियाई देश, ऑस्ट्रेलिया, न्यूजीलँड, उत्तर अमेरिका आणि यूरोपमधील काही देशांचा समावेश आहे.
Ans: 12 नोव्हेंबर रोजी रात्री उशिरा मायक्रोसॉफ्टची Outlook ईमेल सेवा आणि Microsoft 365 चे सर्व्हर अचानक ठप्प झाले होते.
Ans: या आउटेजचा जगभरातील 74 देशांमधील यूजर्स आणि व्यवसायांवर परिणाम झाल्याचे सांगितले जात आहे.
Ans: मिळालेल्या माहितीनुसार, जवळपास 20 तास या सेवांमध्ये व्यत्यय निर्माण झाला होता.