Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Google ने रोलआऊट केलं Android 17 चे स्टेबल अपडेट! नव्या फीचर्समुळे बदलणार यूजर्सचा अनुभव… वाचा सविस्तर

गुगलने त्यांच्या पात्र पिक्सेल डिव्हाईसेससाठी Android 17 चे स्टेबल अपडेट अधिकृतपणे रोलआउट करण्यास सुरुवात केली आहे. या अपडेटमध्ये मल्टीटास्किंग, गेमिंग, प्रायव्हसी आणि स्क्रीन रेकॉर्डिंगचा अनुभव अधिक चांगला करणारी अनेक नवीन फीचर्स देण्यात आली आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 19, 2026 | 01:31 PM
Google ने रोलआऊट केलं Android 17 चे स्टेबल अपडेट! नव्या फीचर्समुळे बदलणार यूजर्सचा अनुभव... वाचा सविस्तर

Google ने रोलआऊट केलं Android 17 चे स्टेबल अपडेट! नव्या फीचर्समुळे बदलणार यूजर्सचा अनुभव... वाचा सविस्तर

Follow Us
Follow Us:
  • Android 17 मध्ये कोणतेही अ‍ॅप फ्लोटिंग विंडोमध्ये वापरण्यासाठी नवीन बबल फीचर सादर करण्यात आले आहे.
  • स्क्रीन रिअ‍ॅक्शन्स फीचरमुळे यूजर्स स्क्रीन रेकॉर्डिंगसोबत स्वतःची लाईव्ह प्रतिक्रिया देखील रेकॉर्ड करू शकणार आहेत.
  • फोल्डेबल डिव्हाईसेससाठी खास गेमिंग मोड आणि अधिक मजबूत प्रायव्हसी कंट्रोल्सही अँड्रॉईड 17 मध्ये देण्यात आले आहेत.
गूगलने सर्व पात्र पिक्सेल डिव्हाईससाठी त्यांच्या लेटेस्ट अँड्रॉईड 17 अपडेटचे स्टेबल वर्जन रोल आउट करण्यास सुरुवात केली आहे. याबाबत कंपनीने अधिकृतपणे घोषणा देखील केली आहे. अँड्रॉईड 17 अपडेटमध्ये नवीन फीचर्स जोडणयात आले आहेत. मल्टीटास्किंग आणि गेमिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, यासाठी नव्या अपडेटमध्ये काही फीचर्सचा समावेश करण्यात आला आहे. तसेच यामध्ये सिक्योरिटी आणि प्रायव्हसी अपग्रेड्स देखील देण्यात आले आहेत.

अरेच्चा! Apple ची ही कसली जाहिरात? गाणं नाही, बीट्स नाहीत… ऐकू येतोय फक्त गोंधळ

नवीन बबल फीचर

गूगलने मंगळवारी त्यांच्या लेटेस्ट अँड्रॉईड 17 अपडेटचे पहिले स्टेबल वर्जन लाँच केले आहे, जे सध्या पात्र पिक्सेल डिव्हाईससाठी रोलआऊट करण्यात आले आहे. अँड्रॉईड 17 मध्ये नवीन बबल फीचर सादर करण्यात आले आहे. ज्यामुळे यूजर्सना कोणतेही अ‍ॅप एका फ्लोटिंग विंडोमध्ये बदलण्याची सुविधा मिळणार आहे. यामध्ये यूजर्सना अ‍ॅप आयकॉनवर लाँग-प्रेस करावे लागणार आहे, त्यानंतर कोणतेही अ‍ॅप एक ‘कॉम्पॅक्ट’ फ्लोटिंग विंडोमध्ये बदलले जाऊ शकते. फोल्डेबल्स आणि टॅबलेट्सारख्या मोठ्या स्क्रीन असणाऱ्या डिव्हाईसवर हे बबल्स स्क्रीनच्या उजव्या बाजूला खालच्या कोपऱ्यात एक डेडिकेटेड बबल बारमध्ये दिसणार आहे. यूजर्स डॉकमध्ये उपलब्ध अ‍ॅप आयकॉनवर क्लिक केल्यानंतर थेट वेगवेगळ्या बबल्समध्ये स्विच करू शकतात.

स्क्रीन रिअ‍ॅक्शन्स फीचर

अँड्रॉईड 17 अपडेट डिव्हाईसमध्ये स्क्रीन रिअ‍ॅक्शन्स फीचर देखील सादर करणार आहे. यामध्ये यूजर्स त्यांच्या फोनच्या फ्रंट कॅमेऱ्यामधून त्यांची स्क्रीन आणि स्वत:ला एकाच वेळी रेकॉर्ड करू शकणार आहेत. यामुळे स्क्रीनवर दिसणाऱ्या गोष्टींबाबत लाईव्ह रिअ‍ॅक्शन देता येतं. कॅमेरा फीड स्क्रीन रेकॉर्डिंगवर सुपरइम्पोज केले जाते, ज्यामुळे दोन्ही रेकॉर्डिंग एकच क्लिप म्हणून दिसतात. गूगलने एक नवीन टूलबार आणण्यासाठी स्क्रीन रेकॉर्डिंग आणि एनोटेशन टूल्स देखील अपडेट केले आहेत.

फोल्डेबल गेमिंग मोड

अँड्रॉईड 17 अपडेट फोल्डेबल अँड्रॉईड हँडसेट्ससाठी एक डेडिकेटेड ‘फोल्डेबल गेमिंग’ मोड घेऊन आला आहे. हे फीचर ऑन केल्यानंतर ऑन-स्क्रीन गेमिंग कंट्रोल्स स्क्रीनच्या खालील भागात एक डेडिकेटेड गेमिंग पॅड स्वरुपात दिसते. गूगल येणाऱ्या काही महिन्यांत फोल्डेबल फोन्ससाठी हे नवीन गेमिंग मोड रिलीज करण्याची तयारी करत आहे. अँड्रॉईड 17 अपडेटमधील नव्या फीचरमुळे आता यूजर्स अ‍ॅप्सना त्यांच्या लोकेशनचा तात्पुरता अ‍ॅक्सेस देऊ शकतात. याशिवाय, हे ओएस यूजर्सना संपर्काची संपूर्ण यादी शेअर करण्याऐवजी अ‍ॅप्ससह निवडक संपर्क शेअर करण्याची परवानगी देतात.

Oppo चा नवा 5G स्मार्टफोन बाजारात दाखल; 7,000mAh बॅटरी आणि 80W फास्ट चार्जिंगची दमदार साथ… किंमत 38 हजार रुपयांपासून सुरु

या गुगल पिक्सेल डिव्हाईसना मिळणार अँड्रॉईड 17 अपडेट

गुगल पिक्सेल फोन्स

  • गुगल पिक्सेल 6 / 6 Pro / 6a
  • गुगल पिक्सेल 7 / 7 Pro / 7a
  • गुगल पिक्सेल 8 / 8 Pro / 8a
  • गुगल पिक्सेल 9 / 9 Pro / 9 Pro XL / 9a
  • गुगल पिक्सेल 10 / 10 Pro / 10 Pro XL

गुगल पिक्सेल फोल्डेबल्स आणि टॅबलेट्स

  • गुगल पिक्सेल फोल्ड
  • गुगल पिक्सेल 9 फोल्ड
  • गुगल पिक्सेल 10 फोल्ड
  • गुगल पिक्सेल टॅबलेट

Web Title: Google roll out android 17 stable update users will get better experience with new features

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 19, 2026 | 01:31 PM

Topics:  

  • Android
  • google
  • Tech News

संबंधित बातम्या

boAt Projector Launch: टीव्हीला पर्याय? boAt ची CineHead F1 सिरीज बाजारात; मिळणार घरच्या घरी सिनेमागृहाचा अनुभव
1

boAt Projector Launch: टीव्हीला पर्याय? boAt ची CineHead F1 सिरीज बाजारात; मिळणार घरच्या घरी सिनेमागृहाचा अनुभव

Vivo यूजर्सना झटका! कॉम्पॅक्ट फ्लॅगशिप 5G फोन महागला, खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या नवी किंमत
2

Vivo यूजर्सना झटका! कॉम्पॅक्ट फ्लॅगशिप 5G फोन महागला, खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या नवी किंमत

Jio Recharge Plan: 3 नव्या रिचार्ज प्लॅन्ससह जिओचा धमाका! वर्षभराच्या व्हॅलिडीटीसह मिळणार जबरदस्त फायदे, जाणून घ्या किंमत
3

Jio Recharge Plan: 3 नव्या रिचार्ज प्लॅन्ससह जिओचा धमाका! वर्षभराच्या व्हॅलिडीटीसह मिळणार जबरदस्त फायदे, जाणून घ्या किंमत

Google Job Offer: ५५ लाखांच्या गुगलच्या ऑफरसाठी ४० लाखांची नोकरी सोडावी का? नोएडाच्या टेक प्रोफेशनलची सोशल मीडियावर चर्चा!
4

Google Job Offer: ५५ लाखांच्या गुगलच्या ऑफरसाठी ४० लाखांची नोकरी सोडावी का? नोएडाच्या टेक प्रोफेशनलची सोशल मीडियावर चर्चा!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.