Oppo चा नवा 5G स्मार्टफोन बाजारात दाखल; 7,000mAh बॅटरी आणि 80W फास्ट चार्जिंगची दमदार साथ... किंमत 38 हजार रुपयांपासून सुरु
नवा स्मार्टफोन 8GB+128GB आणि 12GB + 256GB या दोन रंगांच्या पर्यायांत लाँच करण्यात आला आहे. 8GB+128GB व्हेरिअंटची किंमत JPY 64,800 म्हणजेच सुमारे 38,000 रुपये आणि 12GB + 256GB व्हेरिअंटची किंमत JPY 76,800 म्हणजेच सुमारे 45,000 रुपये ठेवण्यात आली आहे. हा स्मार्टफोन ओप्पो जपानच्या ऑनलाईन स्टोअरवर प्री ऑर्डरसाठी उपलब्ध आहे. ग्राहक हा स्मार्टफोन आफ्टरग्लो पिंक, अरोरा ब्लू आणि ट्वायलाइट नेव्ही या रंगांच्या पर्यायांत खरेदी करू शकतात. (फोटो सौजन्य – X)
Oppo Reno 15A 5G च्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर, या लेटेस्ट लाँच स्मार्टफोनमध्ये 6.6-इंच फुल एचडी+ 10-बिट अमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. यासोबतच या फोनमध्ये 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट सपोर्ट आणि 1,400 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस देखील मिळणार आहे. धूळ आणि पाण्यापासून सुरक्षेसाठी या स्मार्टफोनमध्ये IP68 + IP69 रेटिंग ऑफर केली जात आहे.
फोनमध्ये क्वालकॉमचा ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 6 जेन 1 चिपसेट देखील मिळणार आहे. या नव्या डिव्हाईसमध्ये अॅड्रेनो 710 जीपीयू, 12GB पर्यंत एलपीडीडीआर4एक्स रॅम आणि 256GB पर्यंत यूएफएस 3.1 ऑनबोर्ड स्टोरेज देखील मिळणार आहे.
फोटोग्राफी दमदार व्हावी यासाठी नव्या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये ऑप्टिकल इमेज स्टेबिलाइजेशनसह 50-मेगापिक्सेल (f/1.8) चा प्रायमरी कॅमेरा दिला आहे. यासोबतच फोनमध्ये 112-डिग्री फील्ड ऑफ व्यू वाला 8-मेगापिक्सेल (f/2.2) चे अल्ट्रावाइड लेंस देखील मिळणार आहे. या नव्या फोनमध्ये 2-मेगापिक्सेल (f/2.4) चा मॅक्रो सेंसर देखील देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनच्या समोरील बाजूला 50-मेगापिक्सेल (f/2.0) चा फ्रंट-फेसिंग कॅमेरा दिला आहे.
Oppo Reno 15A 5G मध्ये 80W वायर्ड आणि 50W वायरलेस फास्ट चार्जिंग सपोर्टसह 7,000mAh बॅटरी दिली आहे.






