अरेच्चा! Apple ची ही कसली जाहिरात? गाणं नाही, बीट्स नाहीत... ऐकू येतोय फक्त गोंधळ
आता अनेकांच्या मनातील सामान्य प्रश्न म्हणजे ही तर अतिशय सामान्य जाहिरात आहे. पण असं नाही. व्हिडीओमध्ये विनी ज्युनियर डान्स करताना तर दिसत आहे, पण प्रेक्षकांना कोणतेही गाणं ऐकू येत नाही. विनी ज्युनियर वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन डान्स करत आहे. पण प्रेक्षकांना मात्र केवळ बाहेरील गोंधळ आणि आवाज व्हिडीओमध्ये ऐकायला मिळत आहे.
जाहिरातीमध्ये प्रेक्षकांना आजूबाजूचा आवाज आणि रस्त्यावरील गोंधळ ऐकू येत आहे. मात्र या सर्व आवाजाचा विनी ज्युनियरवर कोणताही परिणाम होत नाही. याचे कारण आहे एअरपॉड्स प्रो 3 मधील फीचर. अॅपलने दिलेल्या माहितीनुसार, एअरपॉड्स प्रो 3 मध्ये उत्तम ऑडिओ क्वालिटीसह जगातील सर्वात चांगले इन-ईयर अॅक्टिव नॉइस कँसलेशन फीचर देण्यात आले आहे. हे ओरिजीनल एअरपॉड्स प्रो च्या तुलनेत 4 पट अधिक बाहेरील आवाज कमी करण्यासाठी मदत करू शकतो. विनी ज्युनियर त्याच्या गोल सेलिब्रेशनवेळीचा डान्स आणि टीमसोबतच्या कोरिओग्राफ केलेल्या परफॉर्मन्ससाठी ओळखला जातो. त्याची हीच ओळख लक्षात ठेऊन ॲपलने या नवीन मोहिमेद्वारे चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे.
या जाहिरातीबाबत विनी ज्युनियरने सांगितलं की, एअरपॉड्स साठी म्युझिक नसलेला डान्स व्हिडीओ पाहणं अतिशय मजेशीर वाटतं. यामुळे मी कोणत्या गाण्यावर डान्स करत आहे, याबाबत जाणून घेण्यासाठी लोकांच्या मनात उत्सुकता निर्माण होते. कारण प्रत्येक व्यक्ती म्युझिक वेगवेगळ्या प्रकारे अनुभवते. मला हे खूप आवडते की हा चित्रपट लोकांना त्यांच्या स्वतःच्या आवडीच्या साउंडट्रॅकची कल्पना करण्याचे स्वातंत्र्य देतो.
हे कँपेन 11 जून 2026 पासून जगभरात सुरु झाले आहे. टिव्ही आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर 30, 15 आणि 6 सेंकदांच्या जाहिराती स्वरुपात व्हिडीओ जारी केला जाणार आहे.






