HMD Fuse: आता स्मार्टफोनमध्ये मिळणार खास पॅरेंटल कंट्रोल फीचर, या कंपनीने केली कमाल! 108MP कॅमेऱ्यासह लाँच केलं डिव्हाईस
HMD ने नवीन आणि लेटेस्ट फीचर्स HMD Fuse स्मार्टफोन लाँच केला आहे. हा स्मार्टफोन निवडक बाजारात लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनमधील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच या स्मार्टफोनमध्ये 6.56-इंच HD+ 90Hz डिस्प्लेसह लाँच करण्यात आला आहे. यामध्ये Qualcomm चा Snapdragon 4 Gen 2 चिपसेट आहे, जो 6GB रॅमसह जोडण्यात आला आहे. HMD फ्यूजमध्ये 5,000mAh बॅटरी आहे, जी 33W चार्जिंगला सपोर्ट करते.
Grok Chat Leaked: एलन मस्कची हत्या कशी करू… गुगलवर लिक झाले Grok युजर्सचे चॅट, सर्वत्र उडाला गोंधळ!
HMD Fuse सध्या UK मध्ये केवळ Vodafone द्वारे उपलब्ध आहे. याचे कॉन्ट्रॅक्ट GBP 33 म्हणजेच सुमारे 3,877 रुपये प्रति महिना आहे. याशिवाय ग्राहकांना फोन खरेदी करण्यासाठी GBP 33 म्हणजेच सुमारे 3,500 रुपये ही सुरुवातीची किंमत भरावी लागणार आहे. कंपनीने सांगितलं आहे की, HMD Fuse लवकरच ऑस्ट्रेलिया आणि दूसऱ्या मार्केट्समध्ये देखील लाँच होणार आहे. (फोटो सौजन्य – X)
डुअल सिम (nano + eSIM) HMD Fuse Android 15 वर चालतो. याला तीन वर्षांपर्यंत क्वॉर्टरली सिक्योरिटी अपडेट्स दिले जाणार आहेत. या हँडसेटमध्ये 6.56-इंच HD+ (720 x 1,612 पिक्सेल) डिस्प्ले आहे, ज्यामध्ये 90Hz रिफ्रेश रेट, 600 निट्स पीक ब्राइटनेस आणि 20:9 आस्पेक्ट रेश्यो आहे. याचे डायमेंशन 164.15 x 75.5 x 8.32mm आहे आणि वजन 202.5 ग्रॅम आहे. HMD Fuse मध्ये ऑक्टा-कोर Snapdragon 4 Gen 2 प्रोसेसर आहे, ज्याला 6GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह जोडण्यात आलं आहे. ब्रँडचं असं म्हणणं आहे की, रॅम वर्चुअली 6GB पर्यंत वाढवली जाऊ शकते.
फोटोग्राफीबद्दल बोलायचं झालं तर या स्मार्टफोनमध्ये डुअल रियर कॅमेरा युनिट देण्यात आले आहे, ज्यामध्ये 108-मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेरा (ऑटोफोकस आणि EIS सपोर्टसह) आणि 2-मेगापिक्सेल डेप्थ सेंसर आहे. कॅमेरा सिस्टमसह LED फ्लॅश देखील देण्यात आले आहे. फ्रंटला 50-मेगापिक्सेल कॅमेरा सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी आहे.
HMD Fuse मध्ये कंपनीने चाइल्ड सेफ्टीवर जास्त फोकस दिला आहे. या डिव्हाईमध्ये HarmBlock+ पॅरेंटल सूट देण्यात आला आहे. हे एक प्री-ट्रेंड ऑन-डिवाइस AI मॉडल HarmBlock AI वर काम करते, जे एक्सप्लिसिट फोटो आणि व्हिडीओला डिस्प्ले होण्यापासून रोखतो. HMD ने सांगितलं आहे की, कॅमेरा व्यूफाइंडरमध्ये देखील एक्सप्लिसिट इमेजरी डिटेक्ट करू शकतो आणि त्याला क्लिक किंवा स्ट्रिम होण्यापासून थांबवू शकतो.
पालक किंवा गार्जियंस कॉन्टॅक्ट्स व्हाइटलिस्ट करू शकतात, जेणेकरून कॉल किंवा मेसेज फक्त मान्यताप्राप्त संपर्कांकडूनच करता येतील. पालक किंवा गार्जियंस 10 सेफ झोन तयार करू शकतात, जेव्हा मुलगा त्या झोनमध्ये प्रवेश करेल किंवा त्यातून बाहेर येईल, तेव्हा पालकांना नोटिफिकेशन मिळणार आहे.
कनेक्टिविटी ऑप्शन्समध्ये 5G, 4G LTE, Bluetooth 5.1, Wi-Fi 6, NFC, GPS, OTG आणि 3.5mm हेडफोन जॅक यांचा समावेश आहे. या स्मार्टफोनमध्ये 5,000mAh बॅटरी आहे, जी 33W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे.