Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Samsung Galaxy S26 सिरीज लाँच, AI अनुभवासह कॅमेरा आणि दमदार फिचर्स, किंमत किती?

सॅमसंगच्या तिसऱ्या पिढीतील एआय स्मार्टफोन म्हणून गॅलेक्‍सी एस२६, एस२६+ आणि एस२६ अल्ट्रा पार्श्वभूमीत जटिल कामे हाताळतात, ज्यामुळे वापरकर्ते केवळ परिणामांवर लक्ष केंद्रित करू शकतात.

  • By श्वेता झगडे
Updated On: Feb 26, 2026 | 05:38 PM
Samsung Galaxy S26 सिरीज लाँच, AI अनुभवासह कॅमेरा आणि दमदार फिचर्स, किंमत किती?

Samsung Galaxy S26 सिरीज लाँच, AI अनुभवासह कॅमेरा आणि दमदार फिचर्स, किंमत किती?

Follow Us
Follow Us:

मुंबई : सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सने आज (26 फेब्रुवारी) गॅलेक्‍सी एस २६ सिरीज सादर केली. या सिरीजमध्ये उत्कृष्ट कार्यक्षमता, उद्योगातील आघाडीची कॅमेरा प्रणाली आणि दैनंदिन कामे अधिक सुलभ करणारे गॅलेक्‍सी एआय अनुभव दिले आहेत. सॅमसंगच्या तिसऱ्या पिढीतील एआय स्मार्टफोन म्हणून गॅलेक्‍सी एस२६, एस२६+ आणि एस२६ अल्ट्रा पार्श्वभूमीत जटिल कामे हाताळतात, ज्यामुळे वापरकर्ते केवळ परिणामांवर लक्ष केंद्रित करू शकतात.

“गॅलेक्‍सी एस२६ सिरीजमध्ये आम्ही एआय अनुभव अधिक सहज आणि नैसर्गिक बनवण्यावर भर दिला आहे. एआय शांतपणे पार्श्वभूमीत कार्य करत राहते, ज्यामुळे लोकांना त्यांच्या महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष देता येते,” असे टीएम रोह, सीईओ, प्रेसिडेंट आणि हेड ऑफ डिव्हाइस एक्सपीरियन्स डिव्हिजन, सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स यांनी सांगितले.

Realme Narzo Power 5G: 10001mAh बॅटरी असलेला सर्वात पातळ फोन, ‘या’ तारखेला होणार लाँच

गॅलेक्‍सी एस२६ अल्ट्रा हा केवळ ७.९ मिमी जाडीचा सॅमसंगचा सर्वात स्लिम अल्ट्रा डिव्हाइस असून, मोबाईल फोनसाठी जगातील पहिल्यांदाच अंगभूत प्रायव्हसी डिस्प्ले सादर करतो. प्रवास, कॅफे किंवा सार्वजनिक ठिकाणी वापरासाठी डिझाइन केलेले हे फीचर हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरच्या समन्वयातून गोपनीयतेचे प्रभावी संरक्षण करते, तेही पाहण्याचा अनुभव कमी न करता. तसेच गॅलेक्‍सी एस२६ अल्ट्रामध्ये स्नॅपड्रॅगन ८ एलाईट जेन ५ मोबाईल प्लॅटफॉर्म फॉर गॅलेक्सी प्रोसेसर देण्यात आला असून, तो आतापर्यंतची सर्वोत्तम कार्यक्षमता प्रदान करतो. तसेच, सुपरफास्ट चार्जिंग ३.० मुळे केवळ ३० मिनिटांत ७५% पर्यंत चार्जिंग शक्य होते.

कॅमेरा विभागातही मोठी सुधारणा करण्यात आली आहे. अधिक रुंद अपर्चरमुळे कमी प्रकाशात उत्कृष्ट छायाचित्रण शक्य होते, तर सुधारित नाइटोग्राफी व्हिडीओमुळे अंधुक प्रकाशातही स्पष्ट आणि जिवंत व्हिडिओ मिळतात. अपग्रेडेड सुपर स्टेडी तंत्रज्ञानामुळे व्हिडिओ शूटिंगदरम्यान स्थिर फ्रेमिंग मिळते. एआय आयएसपी सुधारणा सेल्फी कॅमेऱ्यातही दिसून येतात, ज्यामुळे मिश्र प्रकाशात नैसर्गिक त्वचेचे टोन आणि सूक्ष्म तपशील स्पष्टपणे टिपले जातात. विशेष म्हणजे, अॅडवान्‍स्‍ड प्रोफेशनल व्हिडिओ (एपीव्‍ही) स्टँडर्डला सपोर्ट करणारा हा पहिला गॅलेक्‍सी स्मार्टफोन आहे, ज्यामुळे उच्च-गुणवत्तेच्या व्हिडिओचे कार्यक्षम कॉम्प्रेशन शक्य होते.

एजेंटिक एआयसाठी भक्कम पायाभरणी

नाऊ नज फीचर वेळेवर आणि संबंधित सूचना देऊन वापरकर्त्यांचा कार्यप्रवाह अखंड ठेवते. गॅलेक्‍सी एस२६ सिरीजमध्ये अपग्रेडेड बिक्‍स्‍बी हा संवादक्षम डिव्हाइस एजंट म्हणून अधिक सक्षम झाला असून, नैसर्गिक भाषेतून सेटिंग्ज बदलणे आणि डिव्हाइस नेव्हिगेशन करणे अधिक सोपे झाले आहे.

या सिरीजमध्ये एआय एडिटिंग टूल्समध्ये सुधारणा करण्यात आली असून, नाऊ ब्रिफ आणि एन्हान्स्ड सर्कल टू सर्चसारखी रिअल-टाइम फीचर्स जोडण्यात आली आहेत. तसेच बिक्‍स्‍बी, जेमिनी आणि परप्‍लेक्सिटीसारख्या एआय एजंट्ससोबत अधिक सखोल एकत्रीकरण देण्यात आले आहे. सुरक्षेला प्राधान्य देत प्रायव्‍हेट अल्‍बम, नॉक्‍स मॅट्रिक्‍स संरक्षण, सात पिढ्यांचे ओएस अपग्रेड्स आणि सात वर्षांचे सिक्युरिटी अपडेट्स यांचा समावेश करण्यात आला आहे.

गॅलेक्‍सी बड्स४ सिरीज

नवीन गॅलेक्‍सी बड्स४ प्रो आणि गॅलेक्‍सी बड्स४ हे शक्तिशाली हाय-फाय ऑडिओ आणि संगणकीय डिझाइनवर आधारित एर्गोनॉमिक रचना यांवर केंद्रित आहेत. गॅलेक्‍सी बड्स४ प्रोमध्ये अधिक रुंद वूफर, सुधारित अॅक्टिव्‍ह नॉईज कॅन्‍सलेशन आणि २० हर्ट्झ ते ४० किलोहर्ट्झपर्यंत फ्रिक्वेन्सी रेंजमध्ये स्पष्ट ध्वनी देणारे अॅडप्टिव्‍ह ईक्‍यू देण्यात आले आहे.

दोन्ही मॉडेल्समध्ये सुपर क्‍लीअर कॉल सपोर्ट असून, ते बिक्‍स्‍बी, गुगल जेमिनी व परप्‍लेक्सिटीसारख्या एआय एजंट्ससोबत एकत्रित कार्य करतात. व्हाईट आणि ब्लॅकमॅट फिनिशमध्ये हे उपलब्ध आहेत.

गॅलेक्‍सी एस२6 सिरीजमध्ये सर्व मॉडेल्ससाठी एकसमान डिझाइन भाषा ठेवण्यात आली असून, कोबाल्‍ट व्‍हायोलेट, व्‍हाइट, ब्‍लॅक व स्‍काय ब्‍ल्‍यू हे रंग पर्याय उपलब्ध आहेत.

100 पेक्षा जास्त स्पोर्ट्स मोड्ससह Oppo Watch S बाजारात दाखल; याला खरेदी करायचं म्हणजे खिसा खाली करावाच लागेल

 

Web Title: Samsung galaxy s26 price in india features and specifications details in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 26, 2026 | 05:38 PM

Topics:  

  • mobile
  • smartphone

संबंधित बातम्या

6000mAh बॅटरी अन् 50MP कॅमेरा… HMD Vibe 2 5G चा नवा व्हेरिअंट लाँच; किंमत 15 हजारांहून कमी
1

6000mAh बॅटरी अन् 50MP कॅमेरा… HMD Vibe 2 5G चा नवा व्हेरिअंट लाँच; किंमत 15 हजारांहून कमी

10,000mAh बॅटरी आणि सर्वात ब्राईट स्क्रीन! Honor च्या नव्या स्मार्टफोनचे डिटेल्स लीक… वाचून तुम्हीही व्हाल चकित
2

10,000mAh बॅटरी आणि सर्वात ब्राईट स्क्रीन! Honor च्या नव्या स्मार्टफोनचे डिटेल्स लीक… वाचून तुम्हीही व्हाल चकित

अखेर तो दिवस आलाच! 50MP कॅमेऱ्यासह Samsung च्या नव्या स्मार्टफोनची तुफानी एंट्री… 2032 पर्यंत मिळणार कमाल अपडेट
3

अखेर तो दिवस आलाच! 50MP कॅमेऱ्यासह Samsung च्या नव्या स्मार्टफोनची तुफानी एंट्री… 2032 पर्यंत मिळणार कमाल अपडेट

5200mAh बॅटरी अन् 200MP कॅमेरा… नवा Moto G Max 5G पाहून सर्वांनाच पडली भूरळ! इतकी आहे स्मार्टफोनची किंमत
4

5200mAh बॅटरी अन् 200MP कॅमेरा… नवा Moto G Max 5G पाहून सर्वांनाच पडली भूरळ! इतकी आहे स्मार्टफोनची किंमत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.