Honor GT: पावरफुल बॅटरी आणि दमदार कॅमेरा, लाँच झाला Honor चा नवीन स्मार्टफोन
टेक कंपनी Honor चा नवीन स्मार्टफोन Honor GT अखेर लाँच करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन भारतात नाही तर चीनमध्ये लाँच करण्यात आल आहे. कंपनीने Honor 90 GT चा उत्तराधिकारी म्हणून Honor GT स्मार्टफोन लाँच केला आहे. Honor GT हा एक परफॉर्मन्स सेन्ट्रिक फोन आहे. फोनमध्ये अनेक नवीन आणि उत्तम फीचर्स देण्यात आले आहेत.
Honor GT स्मार्टफोन क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन 8 जनरल 3 प्रोसेसरने सुसज्ज आहे. फोनमध्ये जलद चार्जिंग सपोर्टसाठी 5,300mAh बॅटरी देण्यात आली आहे. Honor GT स्मार्टफोनमध्ये अशा अनेक वैशिष्ट्यांचा समावेश आहे, जी इंडस्ट्री फर्स्ट आहेत. फोनमध्ये काय स्पेसिफिकेशन्स दिले आहेत आणि चीनमध्ये त्याची किंमत काय आहे, याबद्दल जाणून घेऊया. तसेच हा स्मार्टफोन भारतात होण्याची शक्यता आहे का, याबद्दल देखील जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – X)
चीनमध्ये Honor GT फोन आइस क्रिस्टल व्हाइट, फँटम ब्लॅक आणि अरोरा ग्रीन कलर पर्यायांमध्ये लाँच करण्यात आला आहे. Honor GT स्मार्टफोन चीनमध्ये 2,199 युआन म्हणजेच अंदाजे 25,625 रुपयांच्या सुरुवातीची किंमतीत लाँच करण्यात आला आहे. त्याची विक्री 24 डिसेंबरपासून लाईव्ह सुरू होणार आहे. Honor GT भारतात लाँच होणार का याबाबत अनेकांना शंका आहे. तर आम्ही तुम्हाला सांगतो की, Honor 90 GT भारतात लाँच झाला नाही. त्यामुळे नवीन स्मार्टफोन Honor GT देखील भारतात लाँच होण्याची शक्यता फार कमी आहे.
डिस्प्ले- Honor GT फोनमध्ये 6.7-इंचाचा OLED डिस्प्ले देण्यात आला आहे जो 120 Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. यात 4000 nits आणि FHD+ रिझोल्यूशनची शिखर ब्राइटनेस आहे.
परफॉर्मंस- यात क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन 8 जनरल 3 चिपसेट बसवण्यात आला आहे, जो पूर्वीपेक्षा अधिक शक्तिशाली आहे.
स्टोरेज- Honor GT स्मार्टफोनमध्ये 16 GB LPDDR5x रॅम आणि 1 TB UFS 4.0 स्टोरेज आहे.
बॅटरी आणि चार्जिंग- Honor GT स्मार्टफोनमध्ये 5,300mAh बॅटरी आहे, जी 100W जलद चार्जिंगला सपोर्ट करते.
कॅमेरा- स्मार्टफोनमध्ये 50+8MP चा ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. सेल्फीसाठी फ्रंटमध्ये 16MP सेंसर देण्यात आला आहे.
इतर वैशिष्ट्ये- यात WiFi 6, Bluetooth 5.3, इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर, 5G, USB पोर्ट आणि स्टिरीओ स्पीकर आहेत.
POCO C75: POCO चा नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करताय? थांबा, हे अपडेट ठरेल डोकेदुखी
मागील Honor 90 GT पेक्षा यात अधिक शक्तिशाली परफॉर्मन्स आहे. आधीच्या फोनमध्ये Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर होता, पण आता यात Snapdragon 8 Gen 3 चिप आहे, जी अधिक शक्तिशाली आहे. फोन मॅजिक UI 9.0 आधारित Android 15 OS सह येतो. इंडस्ट्री फर्स्ट थ्रीडी वॉटरफॉल व्हेपर कूलिंग सोल्युशनही यामध्ये देण्यात आले आहे. यात एआय फोटो एडिटिंग, आय प्रोटेक्शन आणि एआय रेंडरिंग सारखे फीचर्स आहेत.