YouTube वरून तगडी कमाई करण्याचा हा आहे खरा फॉर्म्युला; 2025 मध्ये व्हा कंटेंट क्रिएटर आणि कमवा लाखो रुपये
सध्याच्या डिजीटल काळात सोशल मीडिया हे कमाईचे साधन बनले आहे. सोशल मीडियावर एंटरटेनमेंटसोबतच कमाई देखील केली जाते. डिजीटल काळात लोकं सोशल मीडियावरून प्रचंड पैसे कमावत आहे. या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सपैकी एक असलेलं YouTube देखील कमाईचे साधन आहे. भारतातील लोकं युट्यूबवरून हजारो आणि लाखो रुपये कमावत आहेत. तरूणपिढी देखील युट्यूबच्या मदतीने पैसे कमावण्याचा विचार करत आहे. तुम्ही देखील युट्यूबवरून पैसे कमावण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. 2025 मध्ये, YouTube वरून कमाई करणे पूर्वीपेक्षा सोपे झाले आहे. तथापि, यासाठी तुमच्याकडे चॅनेलची कल्पना आणि नियोजन असणे आवश्यक आहे. यानंतर तुम्हाला व्हिडिओ बनवायला सुरुवात करावी लागेल.
YouTube वर व्हायरल व्हायचंय? यावेळी पोस्ट करा तुमचा व्हिडीओ आणि मिळवा अधिक व्ह्युज
यूट्यूबवरून पैसे कमावण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे यूट्यूब पार्टनर प्रोग्राम. यूट्यूब पार्टनर प्रोग्रामद्वारे पैसे कमावण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला तुमचं युट्यूब चॅनेल तयार करावं लागणार आहे आणि तुमच्या चॅनेलवर 1000 सब्सक्राईबर आणि 4000 तासांचा वॉच टाईम पूर्ण करावा लागणार आहे, यानंतर तुम्ही यूट्यूब पार्टनर प्रोग्रामसाठी अप्लाय करू शकता. यानंतर तुमच्या व्हिडीओमध्ये जाहिराती दिसतील आणि तुमची कमाई सुरु होणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
जर तुम्ही युट्यूबवर टेक, फॅशन, फिटनेस किंवा एखाद्या दुसऱ्या विषयावरील व्हिडीओ बनवत असाल तर तुम्ही एफिलियेट मार्केटिंगच्या मदतीने देखील पैसे कमावू शकता. यासाठी, तुम्हाला तुमच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये Affiliate Links टाकाव्या लागतील आणि जेव्हा एखादा व्यूअर तुमच्या लिंकवरून काहीतरी खरेदी करेल तेव्हा तुम्हाला त्यासाठी कमिशन मिळेल.
जेव्हा तुमच्या युट्यूबवर सब्सक्राइबर आणि व्यूजची संख्या वाढेल, तेव्हा वेगवेगळे ब्रँड्स तुम्हाला संपर्क करणार आहेत. प्रोडक्ट्स प्रमोट करण्यासाठी तुम्हाला पैसे दिले जाणार आहेत.
जर तुम्ही युट्यूबवर लाईव्ह स्ट्रिम करत असाल तर तुम्ही सुपर चॅटद्वारे चांगली कमाई करू शकता. भारतात मोठ- मोठे गेमर्स लाईव्ह स्ट्रिम करून सुपर चॅटद्वारे प्रचंड पैसे कमावतात.
जर तुम्हाला असं वाटतं असेल की तुमचा कंटेट लोकांना प्रचंड आवडत आहे तर तुम्ही Channel Membership सुरु करून एक्सक्लूसिव कंटेंट पाहण्यासाठी युजर्सना मंथली सब्सक्रिप्शन खरेदी करण्यास सांगू शकता. यामुळे देखील तुमची चांगली कमाई होणार आहे.