Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tech Tips: किती असतं Gaming Laptop चे आयुष्य? खरेदी करण्यापूर्वी वाचा सत्य, नाहीतर कराल पश्चाताप

Gaming Laptop Tips: ईलेक्ट्रॉनिक गॅझेटचे आयुष्य त्याच्या वापरावर अवलंबून असते. आपण एखादे गॅझेट किती चांगल्या पद्धतीने वापरतो, यानुसार त्या गॅझेटचे आयुष्य वाढते किंवा कमी होते. गेमिंग लॅपटॉपच्या बाबतीत देखील असेच आहे. तुम्ही गेमिंग लॅपटॉप खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आधी त्याचे आयुष्य किती असते जाणून घ्या.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 01, 2026 | 11:10 AM
Tech Tips: किती असतं Gaming Laptop चे आयुष्य? खरेदी करण्यापूर्वी वाचा सत्य, नाहीतर कराल पश्चाताप

Tech Tips: किती असतं Gaming Laptop चे आयुष्य? खरेदी करण्यापूर्वी वाचा सत्य, नाहीतर कराल पश्चाताप

Follow Us
Follow Us:
  • चांगल्या दर्जाच्या गेमिंग लॅपटॉपचे सरासरी आयुष्य 5 ते 7 वर्षे असते, मात्र ते वापरण्याच्या पद्धतीवर अवलंबून असते.
  • ओव्हरहिटिंग, धूळ, निकृष्ट चार्जर आणि सॉफ्टवेअर अपडेट्सकडे दुर्लक्ष केल्यास लॅपटॉपचे आयुष्य कमी होऊ शकते.
  • नियमित स्वच्छता, योग्य कूलिंग आणि योग्य चार्जिंगच्या सवयींमुळे गेमिंग लॅपटॉपची कार्यक्षमता आणि बॅटरी लाइफ वाढवता येते.
Gaming Laptop Life Tips: आजकालच्या तरूणांमध्ये गेमिंग लॅपटॉपची क्रेझ मोठ्या प्रमाणात आहे. गेमिंग लॅपटॉपमध्ये यूजर्सना जास्त रॅम तर मिळतोच पण यासोबतच दमदार परफॉर्मंस देखील ऑफर केला जातो. खरं तर, जास्त अवघड कामं, ऑनलाईन गेम किंवा व्हिडीओ एडीटींग सारख्या कामांसाठी गेमिंग लॅपटॉप एक चांगला पर्याय ठरतो. कारण यामध्ये लोकांना जास्त चांगला परफॉर्मंस मिळतो आणि कामं सोपी होतात. तुम्ही देखील असाच एक गेमिंग लॅपटॉप खरेदी करण्याचा विचार करताय का? गेमिंग लॅपटॉपच्या रॅम आणि परफॉर्मंसबद्दल सतत चर्चा असते. पण गेमिंग लॅपटॉपच्या आयुष्याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? गेमिंग लॅपटॉप खरेदी करण्यापूर्वी त्याच्या आयुष्याबद्दल जाणून घेणं गरजेचं आहे.

फीचर्सचा जलवा अन् बॅटरीची कमाल! नवा Redmi स्मार्टफोन चीनमध्ये धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज; किंमत पाहताच वाढला टेक प्रेमींचा उत्साह

किती असतं गेमिंग लॅपटॉपचं आयुष्य?

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, सहसा एका चांगल्या गेमिंग लॅपटॉपचे आयुष्य 5 ते 7 वर्षांचे असते. पण नेहमी लक्षात ठेवा की कोणत्याही डिव्हाईसचे आयुष्य यूजर्सच्या वापरावर अवलंबून असते. तुम्ही कशी पद्धतीने लॅपटॉपचा वापर करता, यावर गेमिंग लॅपटॉपचे आयुष्य अवलंबून असतं. सहसा लोकं गेमिंग लॅपटॉपचा नेहमी वापर करतात, मात्र वेळोवेळी लॅपटॉपच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करतात. यासोबतच अनेकदा लोकं गेमिंग लॅपटॉप पलंगावर किंवा अशा ठिकाणी ठेवतात, जिथे हवेचा प्रवाह योग्य नसतो. यामुळे डिव्हाईसचे आयुष्य कमी होऊ शकते.  (फोटो सौजन्य: Pinterest)

गेमिंग लॅपटॉपचे आयुष्य केवळ त्याची किंमत ठरवत नाही. यामागे अनेक कारणं असतात. याबद्दल आता जाणून घेऊया.

  • रोज अनेक तास हेवी गेमिंग करणं.
  • लॅपटॉप गरजेपक्षा जास्त गरम झाल्यानंतर देखील त्याचा वापर करणं.
  • लॅपटॉप धूळ आणि घाणं साचणं
  • लॅपटॉप चार्ज करण्यासाठी खराब क्वालिटीच्या चार्जरचा वापर करणं.
  • वेळोवेळी लॅपटॉपचे सॉफ्टवेअर आणि ड्रायव्हर अपडेट न करणं
जर तुम्ही या सर्व गोष्टींकडे लक्ष दिले आणि योग्य पद्धतीने लॅपटॉपचा वापर केला तर मोठी बॅटरी लाईफ, चांगला परफॉर्मंस आणि डिव्हाईसला दिर्घायुष्य देखील लाभणार आहे.

लॅपटॉपची बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

तुम्ही काही सोप्या टिप्सचा वापर करून गेमिंग लॅपटॉपचे आयुष्य आणखी काही वेळासाठी वाढवू शकता. लॅपटॉपचे व्हेंट्स आणि फॅन्स नियमितपणे स्वच्छ करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तसेच, सिस्टिम नेहमी एका कठीण, सपाट पृष्ठभागावरच वापरली पाहिजे. लॅपटॉपचा वापर करताना हवेचा प्रवाह योग्य असेल याची खात्री करा. आवश्यक असल्यास, कूलिंग पॅडचा वापर करणं डिव्हाईससाठी फायदेशीर ठरू शकते. बॅटरी सतत 100% चार्ज करू नये. यामुळे डिव्हाईसची बॅटरी लाईफ खराब होऊ शकते, परिणाम गेमिंग लॅपटॉपचे आयुष्य देखील कमी होऊ शकते.

8000mAh बॅटरी अन् 50MP कॅमेरा… नव्या Oneplus स्मार्टफोनने उडवली सर्वांची झोप; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

गेमिंग लॅपटॉप खरेदी करण्यापूर्वी महत्त्वाच्या गोष्टी तपासा

जर तुम्ही नवीन गेमिंग लॅपटॉप खरेदी करण्याचा विचार करत असाल, अशा मॉडेलची निवड करा ज्यामध्ये तुम्हाला लेटेस्ट प्रोसेसर, चांगली कूलिंग सिस्टिम, जास्त रॅम आणि एसएसडी स्टोरेज मिळेल. यासोबत, भविष्यात डिव्हाईसचे रॅम किंवा स्टोरेज अपग्रेड करण्याच्या पर्याय मिळणार असल्याची खात्री करा. यामुळे तुमच्या लॅपटॉपची कार्यक्षमता पुढील अनेक वर्षे टिकून राहील याची खात्री होईल.

Web Title: How long does a gaming laptop last tips to extend performance and battery life

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2026 | 11:10 AM

Topics:  

  • laptop tips
  • Tech News
  • TECH TIPS

संबंधित बातम्या

JIO Recharge Plan: वारंवार रिचार्ज करण्याची चिंता संपली! जिओचा ‘हा’ प्लॅन ऑफर करणार दिर्घकाळ व्हॅलिडीटी आणि बरेच फायदे
1

JIO Recharge Plan: वारंवार रिचार्ज करण्याची चिंता संपली! जिओचा ‘हा’ प्लॅन ऑफर करणार दिर्घकाळ व्हॅलिडीटी आणि बरेच फायदे

Flipkart Sale 2026: Vivo च्या 5G स्मार्टफोनवर बंपर डिस्काऊंट! 6500mAh बॅटरी आणि पावरफुल फीचर्सने सुसज्ज… खरेदीची संधी सोडू नका
2

Flipkart Sale 2026: Vivo च्या 5G स्मार्टफोनवर बंपर डिस्काऊंट! 6500mAh बॅटरी आणि पावरफुल फीचर्सने सुसज्ज… खरेदीची संधी सोडू नका

Zoom कॉलवर सायबर हल्ल्याचा धोका; AIच्या मदतीने होऊ शकते ‘Zero-Click’ हॅकिंग, सुरक्षेसाठी आत्ताच फॉलो करा ‘या’ स्टेप्स
3

Zoom कॉलवर सायबर हल्ल्याचा धोका; AIच्या मदतीने होऊ शकते ‘Zero-Click’ हॅकिंग, सुरक्षेसाठी आत्ताच फॉलो करा ‘या’ स्टेप्स

iQOO यूजर्सना झटका! कंपनीने वाढवल्या ‘या’ स्मार्टफोनच्या किंमती, खरेदीसाठी मोजावे लागणार तब्बल इतके पैसे
4

iQOO यूजर्सना झटका! कंपनीने वाढवल्या ‘या’ स्मार्टफोनच्या किंमती, खरेदीसाठी मोजावे लागणार तब्बल इतके पैसे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.