अशा प्रकारे झाली ताजमहालची निर्मिती, मजदूरांनी केले अफाट कष्ट! AI चा अद्भुत व्हिडीओ पाहून तुम्हीही दंग व्हाल
आग्रामध्ये स्थित असणाऱ्या ताजमहालबद्दल आपण लहानपणापासून विविध कथा ऐकल्या असतील. ताजमहालची निर्मिती कशी झाली, कोणी केली, का केली, याबाबत आपल्या सर्वांनाच माहिती आहे. ताजमहाल केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे. जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेल्या ताजमहालला पाहण्यासाठी जगभरातून लोक येतात. ताजमहालची सुंदरता पाहून तुमचेही डोळे दिपतील.
संगमरवरी दगडांपासून बनलेला हा ताजमहाल फार प्रसिद्ध आहे. मुगल सम्राट शाहजहांने त्याची पत्नी मुमताज महलच्या स्मरणार्थ ताजमहालची उभारणी केली होती. ताजमहलचे बांधकाम 1632 मध्ये सुरु झाले होते आणि 1643 मध्ये ताजमहालची उभारणी पूर्ण झाली. ताजमहालचे बांधकाम पूर्ण होण्यासाठी तब्बल 22 वर्षांचा कालावधी लागला होता. ताजमहाल बांधण्यासाठी सुमारे 20,000 मजूर, कारागीर, वास्तुविशारद दिवसरात्र कष्ट करत होते. ताजमहाल बांधण्यासाठी लाल दगड, पांढरा संगमरवरी, पितळ, सोने, नीलम, मोती, मकरानी दगड आणि इतर रत्ने वापरण्यात आली. (फोटो सौजन्य – Instagram Bharath FX)
ताजमहालच्या बांधकामाची प्रक्रिया जगाला दाखवता येईल असे कोणतेही साधन त्या काळात उपलब्ध नव्हते. परंतु AI निर्मित व्हिडीओ सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये त्या वेळी ताजमहालची बांधकाम प्रक्रिया कशी असेल याची झलक दाखवण्यात आली. आजकाल, सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे, ज्यामध्ये ताजमहाल कसा बांधला गेला असावा हे दाखवले आहे. हा व्हिडीओ AI निर्मित आहे.
इंस्टाग्रामवर शेअर केला जाणारा हा व्हिडिओ डिजिटल रिक्रिएशन टेक्नोलॉजीच्या मदतीने तयार करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये, AI च्या मदतीने, बांधकामादरम्यान वातावरण कसे असेल आणि कामगार दगड फोडण्यासाठी कसे एकत्र जमतील हे दाखवण्यात आले आहे. व्हिडिओमध्ये ताजमहालचे बांधकाम जवळजवळ पूर्ण झाल्याचे आणि मिनार बांधले जात असल्याचे दाखवले आहे. हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की हा एक AI जनरेटेड व्हिडिओ आहे. यामध्ये तथ्यांच्या अचूकतेचा दावा करता येत नाही.
सोशल मीडियावर असे वेगवेगळे व्हिडिओ शेअर केले जात आहेत. ताजमहालच्या बांधकाम प्रक्रियेचे अनेक AI -जनरेटेड व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्याचप्रमाणे, गिझाचे पिरॅमिड आणि चीनची ग्रेट वॉल यासह इतर आश्चर्यांचे AI -जनरेटेड व्हिडिओ शेअर केले जात आहेत. बरेच लोक हे खरे समजून शेअर करत आहेत. तथापि, AI च्या आगमनाने, वास्तविक आणि AI -जनरेटेड व्हिडिओंमध्ये फरक करणे कठीण झाले आहे.
भारतातील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्यांची SpaceX सोबत पार्टनरशिप, लवकरच सुरु केली जाणार Starlink ची सेवा
AI व्हिडिओ ओळखण्यासाठी, तो काळजीपूर्वक पाहणे आवश्यक आहे. जर व्हिडिओमध्ये कोणी बोलत असेल तर त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि ओठांच्या हालचालींवर लक्ष ठेवा. जर तो AI व्हिडिओ असेल तर त्यात काहीतरी चूक दिसेल. व्हिडिओच्या पार्श्वभूमीकडे आणि त्यात दिसणाऱ्या सावल्यांकडे लक्ष द्या. यामध्ये कोणतीही समस्या असल्यास ती सहज ओळखता येते.